अखेर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले...

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2014 - 06:27

"कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा.." या विचाराने जीव टांगणीला लागलेल्या महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना अखेर दिलासा मिळाला. सर्व रुसवेफुगवे संपून अखेर युतीतील मित्रपक्षांच्या वादावर पडदा पडत महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले.

महाराष्ट्रातील सर्व जनतेचे अभिनंदन आणि सेना-भाजपा युती सरकारला शुभेच्छा!

सत्तेसाठी झालेल्या नेत्यांच्या या मनोमीलनानंतर मधल्या काळात एकमेकांवर टिकास्त्र सोडणारे सैनिक आणि भाजपा समर्थक आता याला कसे स्विकारतात हे बघणे रोचक. याचे सोशल साईटवर काय पडसाद उमटतात याबाबत मी स्वत: उत्सुक.

माझ्या स्वत:पुरते सांगायचे झाल्यास भाजपापाठोपाठ आता शिवसेनाही माझ्या मनातून थोडीफार का होईना उतरली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकारने निविदा मागवून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कंत्राट दिले असेल असे वाटते. त्यामुळे याविषयी तज्ञ/ जाणकारांचे मत वाचायला आवडेल. कारण एका कॅमेर्‍यासाठी १६ लाख खुपच जास्त आहेत.

जयंत, हो ना. दळभद्री लोकं काहीही चोरतात. किंग्ज सर्कल स्टेशनातल्या ब्रीजवरचा कॅमेरा चोरीला गेलाय बहुतेक. मी कधी तिकडे तिनसांजेची गेले तर त्या ब्रिजवर चिटपाखरूही नसले तरी कॅमेरा आहे म्हणून बरं वाटे. मध्यंतरी गेले अशीच काळोख पडल्यावर तर कॅमेराच गायब. वायरी लटकत होत्या नुसत्या. तो चोरतानाचं रेकॉर्डिंग झालंय की नाही कुणास ठाऊक!

जयंत, प्रत्येक छोट्या गोष्टीत एनर्जी वाया घालवु नका, जस्ट लेट गो
मोठ्या इश्यू मधला मिस्सिंग डेटा शोधयचा प्रयत्न करा, खूप गम्मत जम्मत सापडते Happy

नरेश, टेक्निकल बिड आणि प्राईस बिडची तुलना करुन लोएस्ट प्राईस बिड व हव्या तश्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्स व इतर सेवा वगैरे गृहित धरुनच ऑर्डर प्लेस झाली असेल.

अहो मुंबईत गर्दुल्ले . इत्यादी लोक गटारावरची लोखंडाची झाकण चोरून धारावीमधल्या चोरबाजारात विकतात.
हे तर लाखांमधले कॅमेरे आहे. त्यामुळे इतके प्रचंड महागाचे कॅमेरे नसतील असे मला वाटते जास्तीत जास्त ५० हजाराच्या आतील असतील आणि त्यांचा विमा सुध्दा उतरवला असेल.

जयंत, कदाचित सगळे कॅमेरे सारखे नसतील. आवश्यकतेनुसार कमी जास्त प्रतीचे असतील. विम्याबद्दल +१

माझ्या मित्राकडे एका शहरात कॅमेरा लावण्याचे कंत्राट आहे. सर्व कॅमेरे एकाच क्वालिटीचे निविदांमधे लिहिलेले असतात अन्यथा निविदा भरणार कसे? ६ महिन्याचे रेकॉर्डींग जपणे हे सर्वत्र कंपल्सरी आहे. ६ महिन्यानंतर डिलिट करण्याकरीता पोलिसांची आणि सरकारची परवाणगी आवश्यक असते. एक हॉलमधे प्रत्येकी २ या ४ कॅमेरांसाठी १ मोनिटर असतो. ( कॅमेरे जास्त असतील तर एकाच मोनिटरवर जास्त कॅमेरा ऑपरेट केले जातात) ३०० कॅमेरांसाठी ४० जनांचा स्टाफ त्याने ठेवला आहे रात्रपाळीमधे कमी आहे (अर्थात ते शहर मुंबई इतके मोठे नाही आणि गजबजलेले नाही) तरी त्याचा खर्च इतका नाही आहे. गेली २ वर्ष तो या कामाचे कंत्राट बघत आहे

भ्रमर माहीत आहे. त्यानेच मला इतका खर्च ? असा प्रश्न केला आहे. तो सुद्धा या निविदेमधे सहभागी होणार होता परंतू अतिप्रचंड काम आणि बरेच अटी त्यात समाविष्ट केलेल्या होत्या. वर सुरक्षित अमानत रक्कम सुध्दा त्याच्यामानाने अतिप्रचंड होती. त्यामुळे त्याने निविदा घेतली नाही या प्रयत्नही केला नाही अन्यथा त्यात अजुन कशाकशाचा समावेश केलेला आहे हे कळाले असते.
लार्सन अँड टर्बो यांचे काम सर्वोकृष्ट असते. बहुदा रिलायंस कंपनी पण उत्सुक्त होती.

या सर्व कॅमेर्‍यातून मुबंईच्या विविध भागांचे लाईव टेलीकास्ट कधीपासून आणि कोणत्या चॅनेलवर सुरु होणार आहे?

जगातल्या सर्व महत्वाच्या शहरात गेले दोन दशकापेक्षा जास्त काळ कॅमेरे लावलेले आहेत. मुंबईला त्यामानाने
खुपच उशीरा जाग आलेली आहे.

काल मुख्य मंत्र्यांच्या हस्ते "मुंबई शहर सरव्हीयालांस प्रकल्प फेज १" चे उद्धाटन झाले.
१३८१ कॅमेरे ४३४ जागी लावण्याच काम पुर्ण झाले. ह्या प्रकल्पाच्या नावा प्रमाणेच फक्त कॅमेरे लावुन काम भागणार नव्हते तर ह्या कॅमेर्या द्वारा लाईव्ह देखरेख करण्यात येईल व आवश्यकता असेल तसे व आपात्काली पोलिस यंत्रणाही कंट्रोल करण्यासाठी ह्यात सहभागी होईल.
अश्या कामासाठी वापरण्यात येणारे कॅमेरे घरात , दुकानात वापरात येणार्या कॅमेर्यापेक्षा वेगळे असतात, उच्च
दर्ज्याचे असतात. उघड्या जागी उन्हा पावसात कित्येक वर्षे व्यवस्थीत उपयोगात येऊ शकणारे असतात.
असे कॅमेरे २७० अंशात आजुबाजुला व १८० अंशात वरखाली वळणारे असतात व त्यांचे रेझल्युशन HD असते.
असे कॅमेरे वापरल्याने त्यासा ठी लागणारे DV, Memory Banks व Monitors सुद्धा HD क्वालीटीचेच लागतात. त्या शिवाय UPS, Camera Control System, DDC (Direct Digital Control System) लागते,
हे सिग्नल पोलिस कंट्रोल रुमला शेअर करता येण्या साठी वेगळी सिस्टीम लागते.

http://indianexpress.com/article/cities/mumbai/cm-devendra-fadnavis-inau...

Pages