आयुष्य घेत आहे ही कोणती परीक्षा

Submitted by जयदीप. on 3 December, 2014 - 15:18

जितका जमेल तितका धरणार ताल आहे..
कण्हण्यास आज माझ्या देणार चाल आहे!

आयुष्य घेत आहे ही कोणती परीक्षा
उत्तर तपासण्याच्या आधी निकाल आहे!

अव्यक्त राहिल्याने होईल त्रास त्याला
शब्दांविना कधीचा झुरतो खयाल आहे

जागा नसेल त्याच्या डोळ्यात आसवांना..
डोळे पुसून ज्याचा भिजला रुमाल आहे

अंधार वाढण्याच्या आधी इथून जाऊ..
हातातली तुझ्याही विझते मशाल आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जितके जमेल तितके आज टंकणार आहे..
छळण्यास आज माबोकरांना मी तय्यार आहे!

कवितेला आज माझ्या हवी आहे एक समीक्षा
कविता टंकण्याच्या आतच विडंबन तय्यार आहे.

भुकेजलेला राहिलो जरी मी समीक्षेविना
टीकेला मात्र मी तय्यार आहे.

जागाच असेन मी आज झोपल्याविना
कधी न्हवे ते नीट नेटका कळफलक तय्यार आहे... .

विडंबने अज्जुन यायच्या आत झोपून जावू
माबोकरांच्या सहनशीलतेचा अंत बघायला मी तय्यार आहे.....

अंधार वाढण्याच्या आधी इथून जाऊ..
हातातली तुझ्याही विझते मशाल आहे<<< सुंदर

(तुझ्याही - ह्या शब्दावर पुन्हा विचार व्हावा अशी विनंती)

आयुष्य घेत आहे ही कोणती परीक्षा
उत्तर तपासण्याच्या आधी निकाल आहे!

अव्यक्त राहिल्याने होईल त्रास त्याला
शब्दांविना कधीचा झुरतो खयाल आहे >>>>>>>.....व्वाह !

जयंतजी, विडंबनही वृत्तात असतं तर मजा आली असती वाचायला.
बाकी तुमच्या भावना पोचल्या.
पण पोस्ट करण्याआधी validation नसल्याने सगळे युझर पोस्ट करू शकतात आणि प्रतिसादही देऊ शकतात.

इतर मान्यवरांचे मनापासून आभार
Happy

जितके जमेल तितके मी टंकणार आहे
माबोकरांस आता मी पकवणार आहे

असे काहीतरी.

करा हवे तितके विडंबन!

Happy
शुभेच्छा! Happy