आरोग्य व्यापारी !!

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 November, 2014 - 11:23

ते ठरवणार
आम्ही
कुठले औषध वापरायचे ते !

ते ठरवणार
आम्ही
कुठले तपास करायचे ते !

ते ठरवणार
आम्ही
आम्ही लोकांना कसे
वाचवायचे ते !

ते ठरवणार
कुणी मेल्यावर
आम्हापैकी कुणाला
बकरा बनवायचे ते !

त्यांच्या अथवा
त्यांच्या कुणाच्या
कंपण्या अश्याच
चालू राहतील

ठरलेल्या ओझ्याची
ठरलेली खोकी
ठरलेली पाकीट
ठरलेल्या ठिकाणी
अचूक
पोहचत राहतील

फार काही झाल तर
मेडीयात आल तर
ते ब्लॅकलिस्ट होतील
अन बाजारात
नव्या नावानं
पुनःपुन्हा
अवतरतील
....
त्यांच्या मते
जीणे गरिबाचे
फार महाग नसते
रडणाऱ्याचे रडू
हजार लाखात
सहज थांबते
(काहीजनासाठी तर
ती ही एक
लॉटरी असते!)

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users