मॉडर्न आर्ट

Submitted by नितीनचंद्र on 26 November, 2014 - 23:01

मला चित्रकलेची फारशी जाण नाही. जेव्हा मी म्हैसुर पॅलेस मधे दसरा प्रोसेशन किंवा हातात दिवा धरलेल्या स्त्रीचे बहुदा राजा रविवर्मा यांचे चिंत्र पाहीले तेव्हा खुप चांगले वाटले.

दसरा प्रोसेशन मधे आपण जिथे उभे राहु तिथे त्या चित्रातले कलाकार आपल्याकडे पहात आहेत असा जिवंतपणा या चित्रात होता. अनेक वर्ष हे चित्र माझ्या मनात घर करुन आहे.

तसेच दुसर्‍या चित्रात एक स्त्री हातात तेलाचा दिवा घेऊन उभी आहे. वारा लागु नये म्हणुन एकाहाताने दिव्याला आडोसा केलेला आहे. बोटांच्या फटीतुन येणारा दिव्याचा प्रकाश. बोटांच्या कडांचा दिव्याच्या प्रकाशाने झालेला गुलाबी रंग आणि त्या स्त्रीच्या चेहेर्‍यावर पसरलेला दिव्याचा प्रकाश त्यातुन त्या स्त्रीचे प्रकट होणारे भाव आजही डोळ्यासमोर आहेत.

प्रश्न असा पडतो की या पार्श्वभुमीवर मॉडर्न आर्ट या कलेचा आस्वाद कसा घ्यावा. बजाज अ‍ॅटोत असताना बजाज मॅनेजमेंट ने १९८५ साली २२ लाख रुपये खर्चुन विकत घेतलेले एका तुकड्यात बसणार नाही म्हणुन चार तुकडे एकत्र करुन साकारलेले हुसेन यांचे ब्रह्मा विष्णु महेश हे चित्र अनेक वेळा पाहीले. मला त्या चित्रातले रंग कधी भावले नाहीत ना कधी भाव दिसले. होत्या फक्त रेषा.

कशी पहावी ही मॉडर्न आर्ट ? यातली कला कशी समजुन घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users