सुपारी

Submitted by डॉ.सतीश अ. कानविंदे on 25 November, 2014 - 10:24

सुपारी
(१९ ऑक्टोबर १९९७ च्या 'महाराष्ट्र टाइम्स' मध्यें प्रकाशित)

एक उंदीर न चुकता
आमच्या घरात रात्री येतो
फ्ळीवरचे डबे आणि
भांडी खाली पाडून देतो

गाढ झोपेत आम्ही असता
पायाला तो घेतो चावा
रक्तबंबाळ होऊन आम्ही
देवाचा मग करतो धावा

आम्ही सर्वांनी कितीदा तरी
त्याला मारण्याचा प्रयत्न केला
सगळ्यांच्या काठ्या चुकवित
प्रत्येक वेळी तो सटकून गेला

गोळ्या ठेवल्या विषाच्या
पिंजरा सुद्धा लावून पाहीला
उंदीर मात्र आम्हालाच
हुलकावण्या देत राहीला

सगळे उपाय करून थकलो
उंदीर येतो रोज रात्री
शेजारी म्हणतात "आमचं मांजर
उंदीर मारेल याची देतो खात्री"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सुपारी' ही कविता चुकून दोन वेळा टाकली गेली आहे. एक कविता Delete करायची आहे. एखादे लिखाण Delete कसे करावे त्याबद्दल कोणीतरी माहिती द्यावी.