तिसरी मुंबई : good for real estate ?

Submitted by काउ on 24 November, 2014 - 17:32

सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.

सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.

पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..

sea link शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.

सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.?

बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग

नवे अएर्पोर्ट

सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.

फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१० लाखात १००० स्क्वेफू = शंभर रुपये स्क्वेअरफुटाचा जमीनीचा भाव होतो. त्यावर किमान १० मजले बांधतात. यातल्या प्रत्येक मजल्याच्या स्क्वेअरफुटाचआ भाव आजच २-६ हजार सांगताहात तुम्ही.

एक गुंठा जागेत (३३x३३) मस्त ३-४ खोल्यांचं टुमदार घर प्लस आजूबाजूला छोटी बाग होते. बांधकाम ३० एक लाख पकडा. शिवाय नुसती ओपीडी चालवायला एक व्हरांडा पुरेल. नव्या जागेत दुकानही उत्तम चालायला हरकत नाही. एकादा मेडिकलवाला स्पॉन्सर पकडा. बिनखर्चात होईल >>>>>>>

१ गुंठा घेतल्यावर खरेदी खत होते का ते कन्फर्म करा. बहुतेक प्लॉट कमीत कमी २२०० का ४००० स्क्वेफुट हवा.........
दुसरे म्हणजे १ गुंठ्यावर १ चटईक्षेत्र धरले तर १००० स्क्वे फुट बांधू शकाल. १००० मधे एक ३बीएचके कसाबसा बसतो......बाग वगैरे कशी करणार ?

सहा लाख नव्हे, साठ ते सत्तर लाख रुपये गुंठा!>>>>>
ईतका भाव नक्की आहे? पुण्यात बाणेर मधे ३५ लाखा पर्यंत १ गुंठ्याचा भाव चालू आहे.

शेताच्या दहा टक्के भागावर घर बांधु शकता>>>>>>>

माझ्या माहिती प्रमाणे ४% आहे.

माझ्या माहिती प्रमाणे खरेदीखत एकट्याच्या नावावर होत नाही. आजुबाजुचे १ गुंठ्याचे तीन ते चार प्लॉट मिळून खरेदी खत केले जाते. ७/१२ च्या उतार्‍यावर पण सगळ्यांचे नाव लागते. जमीन विकताना सगळ्यांना मिळून विकावी लागते, किंवा ज्यांच्या सोबत खरेदी केली त्यांना विकावी लागते.

एकदा वकिलाचा सल्ला घेतलेला बरा.

आँ ! सव्वा गुंटा आकाराचे प्लॉट आहेत. ते एकेकाच्या नावावरच होणार आहेत. प्रत्येकाचे क्गरेद पत्र स्वतंत्रच होणार ना ?

हुश्श् !

बील्डरला फोन केला.

तुमचे बरोबर आहे.. आसपासच्या भागात तुकडाबंदी आहे. त्यामुळे १६ गुंते आकाराची खरेदी खते होतात.

पण , खरेदी खतातच कुठल्याही एका मनुष्याला त्याचा हिस्सा कधीही कुणालाही विकता येईल हेही इतर लोकांकडुन आधीच लिहुनघेतलेले आहे. त्यामुळे एकदा अलॉटमेंट झाली की कुणीही कधीही आपला प्लॉट डेवलप किंवा कुणालाही विकु शकतो.

७/१२ च्या उतार्‍यावर जितक्या लोकांचे नाव आहे त्या सगळ्याच्या सह्या तुम्हाला प्लॉट विकताना सेल डिड/ अ‍ॅग्रीमेंट वर घ्याव्या लागणार. हे पण माहिती असू द्या

कोणतीही जमीन घेताना वकिल हाच सल्ला देतात कि सेल डिड/ अ‍ॅग्रीमेंटवर सगळ्यांच्या सह्या असाव्या म्हणजे ते फुलप्रुफ होते. नंतर कटकट होत नाही.

हो. Proud

मटामधील लेख.

http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/property/articleshow/46...

मुंबई महानगर विभागाचा विचार केला तर गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यापैकी सर्वात जवळचा, चांगला आणि फायदा मिळवून देणारा पर्याय कोणता, असं विचारल्यास 'उरण' हे उत्तर समोर येतं. नवी मुंबई भागातलं उरण हे गुंतवणुकीसाठी सध्याचं सर्वाधिक आकर्षक ठिकाण आहे. आज उरण परिसराचं स्वरूप बरंचसं ग्रामीण असलं तरी भविष्यात ते आधुनिक बनणार आहे. उरण पट्ट्याचं भौगोलिक स्थान हे मुंबईच्या अगदी जवळ आहे. पण तरीही मुंबईहून उरणला जाण्यासाठी पूर्ण नवी मुंबईला वळसा घालून जावं लागतं. पण शिवडी-न्हावाशेवा सीलिंक हा प्रस्तावित सागर सेतू बांधल्यावर मुंबईहून उरण भागात अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येईल. उरण, उलवे, द्रोणागिरी, चिरले आणि नवी मुंबई मुंबईच्या खूप जवळ येईल. मुंबईच्या अन्य उपनगरांपेक्षाही जवळ.

प्रस्तावित शिवडी-न्हावाशेवा सीलिंक हा सहा पदरी समुद्री मार्ग २२ कि.मी.चा आहे. १६ कि.मी.चा मार्ग हा खोल समुद्रात असेल तर उर्वरित ५.५ किमी नवी मुंबईच्या जमिनीवर. एमएमआरडीएचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून गेल्या अनेक वर्षांपासून तो रखडलेला आहे. परंतु अलिकडे या प्रकल्पासंदर्भात शासकीय पातळीवर हालचाली होताना दिसते. शिवडी-न्हावा शेवा सीलिंकसाठी लागणारी जमीन संपादित करण्यासंदर्भात पावलं उचलण्यात येत आहेत. उरण तालुक्यातल्या जासई, चिरले आणि पनवेल तालुक्यातल्या गव्हाण आणि शेलघर भागातल्या शेतकऱ्यांना भू-संपादन कायद्याच्या अधिनियमानुसार कलम ९च्या नोटिसा नुकत्याच बजावण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ शिवडी-न्हावाशेवा सीलिंक प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शिवडी-न्हावा शेवा सीलिंक सुरू झाल्यावर मुंबईहून नवी मुंबईत येणं आणि पुढे मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्ग तसंच अलिबाग आणि कोकणात जाणंही सरळ आणि सोपं होईल. राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ आणि चिरलेदरम्यान काही रस्त्यांचे प्रस्ताव आहेत. हे मार्ग झाल्यावर चिरले इथून जेएनपीटी आणि पनवेल एकमेकांशी जोडलं जाईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाणं हे नवी मुंबईकरांसाठी अगदी सोपं आहे. पण भविष्यात जेव्हा शिवडी-न्हावाशेवा सीलिंक होईल, तेव्हा मुंबईकरांसाठीही विमानतळ गाठणं सुलभ बनेल. या सीलिंकमुळे वेळ, पैसा, इंधन आणि श्रम वाचतील. पहिल्या टप्प्यात शिवडी-न्हावाशेवा सीलिंक तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाइनचा मेट्रो मार्गही बांधण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय नवी मुंबई म्हणजे उरण, रेवस आणि मुंबई म्हणजे भाऊचा धक्का, गेटवे ऑफ इंडियादरम्यान प्रवासी जलवाहतूक मार्ग सुरू करण्याचा प्रस्तावही सरकारच्या विचाराधीन आहे.

देशातली समुद्रमार्गे जी काही आयात-निर्यात होते, त्यात उरण भागातल्या जेएनपीटी बंदराचा वाटा ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भविष्यात ही वाहतूक आणखी वाढणार आहे. उरण भागाचा भविष्यात होणारा निवासी आणि व्यावसायिक विकास लक्षात घेऊन रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं धोरण सरकारने ठरवलं आहे. म्हणूनच जेएनपीटी परिसरातल्या ४ व ६ पदरी रस्त्यांचा विस्तार करून ते १२ पदरी करण्यात येणार आहेत, अशी माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष एन.एन.कुमार यांनी दिली आहे.

Happy

१२ मार्च २०१. म. टा. ठाणे आवृत्ती पुरवणी.

mum airport.jpghttp://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/46535738.cms

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 'टेक ऑफ' होईल की नाही याबाबत बराच संभ्रम होता. परंतु, गेल्या दीड तपापासून या विमानतळ उभारणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. अनंत अडचणी मागे टाकत सिडकोच्या प्रयत्नांनी 'टेक ऑफ' घेतले आहे. विमानतळ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या १० परवानग्या गेल्या सात वर्षांच्या पाठपुराव्यानंतर सिडकोच्या हाती आल्या आहेत. ६७१ हेक्टर जमिनीच्या हस्तांतरणाचे दिव्यही जवळपास पार झाले आहे. हा प्रवास असाच सुरू राहिला तर, २०१९ साली इथून विमाने भरारी घेताना दिसतील, अशी सिडकोला आशा आहे.

सध्या ३१ दशलक्ष प्रवाशांची ने- आण करण्याची क्षमता मुंबई विमानतळांची आहे. देशातील हवाई वाहतुकीचा वाढता वेग लक्षात घेता २०३० सालापर्यंत या विमानतळांवरील संभाव्य प्रवाशांची संख्या प्रतिवर्षी १०० दशलक्षावर झेपावणारी आहे. मुंबई विमानतळांना कितीही अत्याधुनिक करायचं म्हटलं तरी विस्तारासाठी तेथे जागाच उपलब्ध नाही. तेथील वार्षिक प्रवासी क्षमता ४० दशलक्षपेक्षा पुढे नेणे केवळ अशक्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी तेथील हवाई दळणवळणाची समस्या भीषण झाली आहे.

मुंबई भोवतालच्या वाणिज्य केंद्रात झपाट्याने विकास होतोय. भविष्यात इथे विशेष आर्थिक क्षेत्र विकसित होईल. मुंबईला पर्याय म्हणून सुनियोजित पध्दतीने विकसित होणाऱ्या नवी मुंबईसह ठाणे शहराची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. जेएनपीटी, ठाणे- बेलापूर व तळोजा औद्योगिक क्षेत्रही या भागात आहे. भविष्यात येथील हवाई वाहतुकीची निकडही वाढतच जाणार आहे. मुंबई विमानतळावरील हा ताण लक्षात घेऊनच सार्वजनिक- खासगी भागीदारीतून नवी मुंबईत विमानतळ उभारण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले होते. त्यातून २० वर्षांपूर्वी नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा विचार सुरू झाला. नवी मुंबई शहराच्या केंद्रस्थानी, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ बी जवळ आणि मुंबईत असलेल्या सध्याच्या विमानतळापासून केवळ ३५ कि.मी. अंतरावर पनवेल तालुक्यातील जागा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्चित करण्यात आली.

जागा शेतजमीन आहे.

माझ्या नावे शेती नाही . बायकोच्या नावाने शेती आहे. बिल्डर म्हणतो की प्लॉट बायकोच्या नावाने घ्या.

नंतर बायको पाचशे रुप्यांचा स्टाम्प करुन प्लॉट मला बक्षीसपत्र करुन देऊ शकते.

केवळ पाचशे रुप्यात असे करता येते का ? की अजुन काही छुपे चार्ज लागतात ? ब्लड रिलेशन असेल तर ट्ञाक्सेस नसतात. पण नवरा बायको हे कायद्याने ब्लड रिलेशन होऊ शकते का ?

प्लॉट तिच्याच नावे ठेवला तरी प्रॉब्लेम नाही. ती मुलीला देऊ शकेल. पण एक शेत जमीन प्लॉट माझा झाला की मी अजुन घेऊ शकेन. म्हणुन प्लॉट माझ्याच नावे हवा आहे.

Pages