Ring Around the Rosie

Submitted by असामी on 20 November, 2014 - 15:38

'Ring Around the Rosie' हे nursery rhyme बहुतेकांना माहित असेल. त्यातली शेवटची ओळ 'We all fall down' मला नेहमी विचित्र वाटत असे. थोडी शोधाशोध केल्यावर कळले कि हे युरोपमधे ब्लॅक प्लेगच्या वेळी जन्माला आले. ह्यातले rosie म्हणजे अंगावर उठणारी पुरळ नि शेवटचे वाक्य मरण दाखवते. Basically it describes fatalism and it's surreal acceptance by kids.

त्यावरून अजून शोधाशोध केली तेंव्हा अजून काही नर्सरी र्‍हाईमचा उगम सापडला
http://www.huffingtonpost.com/2014/11/20/nursery-rhymes-real-stories_n_6...

पुढे ग्रिमच्या परीकथा शोधल्या तेंव्हा सगळ्यात मोठा धक्का बसला. मूळ पुस्तकाची एक प्रत माझ्याकडे आहे पण त्या एरवी वाचल्यात असे म्हणून पुढे वाचले नव्हते पण खालची लिंक बघितल्यावर वाचून बघायला हवे हे जाणवले.
http://www.theguardian.com/books/2014/nov/12/grimm-brothers-fairytales-h...

आपल्या भारतीय लोककथा नि बालगीतांना पण असा काही संदर्भ आहे का ? मागे दीपावली दिवाळी अंकामधे 'चल रे भोपळ्या' मधला वाघ नि म्हातारी हे माणसाचे मरणापासून पळण्याचे रुपक आहे अशा अर्थाची बहुधा भरत सासणेंची कथा वाचलेली ती ह्या निमित्ताने आठवली.

ह्या बहुतेक कथा/ गाण्यांना तत्कालीन सामाजिक संदर्भांच्या, इतिहासाच्या चौकटी आहेत तेंव्हा त्यांना आजच्या योग्याग्यतेच्या पारड्यात तोलण्याची चूक करायचे कृपया टाळा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या तरी हॅलोविन एकदम आनंदाचा सण म्हणूनच साजरा होताना दिसतो. >> तो सण cocolate maker companies नि hijack केलेला आहे. बहुतेक सगळेच केलेत असेही म्हणायला हरकत नाही.

आमच्या शेजारी एक कुर्गी लहान मुलगी रहात असे.. तिला पिगी पिगी ऑन द रेल.. वाचताना रडूच यायचे.
रेन रेन गो अवे पण तिला आवडायची नाही. आय कॅन प्ले इन द रेन, व्हाय कांट जॉनी ? असे विचारायची.

वर बस्के ने लिहिल्याप्रमाणे, बहुतेक बडबडगीत तशीच असायची.

मालगुडी डेजचे शीर्षक गीत ( ता ना ना त ना ना ना ) खुप आवडायचे तिला.

वाचलं की ऐकलं होतं रिंगा रिंगा रोजेस बद्दल. पण हॅन्स अँडरसनच्या परिकथा मुळातल्या अ‍ॅडल्ट स्टोर्‍यांची डायल्युटेड वर्जन्स आहेत हे ऐकून दचकलेच मी!

आपली अंगाईगीतं करूण आहेत याबद्दल प्रचंड अनुमोदन. पोरांना असं करूण रसात बुचकाळून काढलं नाही तर ती झोपत नाहीत असं वाटलं की काय? मी लेकीकरता 'कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली ती धाऊन' हे गाणं म्हणायचे. त्यातही कधीकधी इंग्रजी शब्द वापरायचे.

उदा. 'आई मला मून दे आणून, त्याचा बॉल दे करून' किंवा 'आई मला टायगर दे आणून, त्याचा हॉर्स दे करून' असं. Happy

सांस्कृतिक फरक म्हणजे आपण म्हणतो 'ये रे ये रे पावसा' तर इंग्लंडातली मुलं म्हणतात 'रेन रेन गो अवे'.

आता तर कस्टमाईज्ड र्‍हाईम्स निघालेत. मी मागे कुठेतरी वाचलं की मदरशांमध्ये 'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, अल्ला मेड यु व्हॉट यु आर' असं शिकवतात (म्हणे).

मागे एका बिग बॉसच्या सीझनमध्ये जॅक अँड जिल चं बिहारी वर्जन ऐकलं :

जॅकवा और जिलवा
गये उपर हिलवा
पनिया भरन के वास्ते
जॅकवा गिर गवा
खोपडी फूट गवा
जिलवा आयी लडखडाते पूरे रास्ते Lol

माझे आईबाबा (वय ७७ आणि ८३) नातवंडांसाठी त्यांच्या लहानपणीच्या कविता म्हणतात. बर्याचश्या छान आणि गेय असतात.
"किती मौज दिसे हि पहा तरी, हे विमान उडते अधांतरी"
"आला हा दारी उभा वसंत फेरीवाला"
वगैरे वगैरे...
पण एक जरा असच क्रूर वर्णनाचे आहे, पण जेव्हा ते चालीत म्हणतात तेव्हा तेव्हढे क्रूर वाटत नाही..
"बुलबुल गवयी कुणी मारिला, चिमणा म्हणतो मी
का रे चिमण्या उगा मारिला बुलबुल तो गवयी
कारण कसले पुसता हरकामी, नवी धनुकली पाहिली...
...
चिमण्यालागी देई शिक्षा देहांत"

त्यांनी त्यांच्या लहानपणी ह्या बडबडगीतातून आनंदच मिळवला आणि त्यांच्या डोक्यात असे क्रूरता वगैरे काही विचार तेव्हाही आणि आताही आले नाहीत. Happy आणि कुठल्याही नातवंडांनी अजून कधी तसे त्यांना विचारले नाही. Happy

Pages