मन आता

Submitted by जयदीप. on 18 November, 2014 - 11:37

मन आता हे कळल्यावरती उदास नाही..
रस्ता संपत आला आहे, प्रवास नाही!

फूल उमलले आहे..कुठले मनात त्याच्या
रंग जराही नाही...त्याला... सुवास नाही!

स्थान किती छोटेसे त्याला नभात आहे...
कळले सूर्यालाही आता..... मिजास नाही!

त्यांनी घोषित केले की तो पळून गेला! 
केला ज्यांनी थोडा सुद्धा तपास नाही

शहर तुझे हे बघता बघता कळून आले
बदल जरासा झाला आहे, विकास नाही

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन आता हे कळल्यावरती उदास नाही..
रस्ता संपत आला आहे, प्रवास नाही!

वा

मनात त्याच्या - अशा लयीत अडथळा आणणार्‍या अक्षरांच्या काँबीनेशनवर विचार केला गेल्यास अजून ओघवत्या ओळी होण्यास मदत होईल असे वैयक्तिक मत.

बाकीच्या द्विपदीही छानच अजून इम्प्रुव्ह होण्यास वाव!

आत्ममग्न ह्यांचा मुद्दा बारकाईचा आहे जोशी तो लक्षात घ्या ! आवर्जून शिकण्यासारखा आहे तो
बरका , सुचलेल्या शब्दांची मांडणी ..अगदी प्रत्येक काना-मात्रा इत्यादी ह्यास अतोनात महत्त्व असते गझलेत
आत्ममग्न ह्यांचे आभार मानायला विसरू नका आणि !! Happy