डास चावता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 November, 2014 - 12:28

मला चावून
रक्त पिवून
माझ्या हातून
मेला डास ||

जरी तो सुटला
चिंता मजला
देवून गेला
नको नको ती ||

टम्म फुगला
होता साला
नकळे आला
होता कुठूनी ||

हे रक्त माझे
का आणि कुणाचे
असतील कश्याचे
जंतू त्यात ||

रोग येतात
लोक मरतात
काय हातात
या लोकांच्या ||

मरणे आमुचे
जगणे आमुचे
चक्र जगाचे
राम भरोसे ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच आशयगर्भ लिहीले आहे.
अणुबांम्बाची भिती बाळगून जगायचं आणि साला डास चावून मरायचं? भूतलावरचा सर्वशक्तीमान जीव कोण? माणूस की डास? दोन हात तलवारी उरातून आरपार झाल्या तरी धिरानं लढणार्यांच्या वारसांच्या कानामागे नकडाभर सोंड घुसली की हाहाकार होतो? जगण्याला डासाची किंमत राहीली नाही.?

वा! खरोखरच सखोल विचार मांडलात.