वादनाचा कीबोर्ड कसा खरेदी करावा?

Submitted by अश्विनीमामी on 13 November, 2014 - 06:02

छंदोपासना करा असे सर्व सांगतच आहेत म्हणून अत्यंत आवडीचे असे वाद्यसंगीत ह्याची उपासना करायची असे ठरवले आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड नवा किंवा वापरलेला घ्यायचा आहे. जुनी/ नवी हिंदी गाणी वाजवता यावीत, अरेंजमेंट्स थोड्या बहुत इतकेच. वाजवलेले रेकॉर्ड करता यावे. इथे एका दुकानात १२५०० परेन्त एक बघितला आहे तो आवडला आहे पण अजून काही माहिती असल्यास बरे पडेल. मुंबईत बीट्स ९९ किंवा फुर्टाडोज मध्ये बघणार. अजून कोणी माहीत आहे का? नवी मॉडेल्स वगैरे सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅसिओ आणि यामाहा ह्या दोन कंपन्या की बोर्ड बनवतात ते माहीत आहे. ऑनलाईन युज्ड गोष्टी विकत मिळतात अशा संकेतस्थळांना भेटी द्या आणि ठरवा.

रोनाल्ड, कोंग नावाचे कंपन्या अतिउत्तम सिंथेसायझर बनवतात. मुंबईत सीएसटीला मॅकडॉनाल्ड च्या रस्त्यावर चांगले दुकान आहे तिथे सगळ्या कंपन्यांचे मिळतात.

कॅसिओ हे आता लहान मुलांचे झाले आहे. प्रोफेश्नल्स लोक रोनाल्ड कोंग हीच ब्रँड वापरतात.

आता नविन रोली सीबोर्ड नावाचा प्रकार आला आहे तो देखील गुगलुन बघावा

बरोबर कॅसिओ माझ्याकडे बरीच वर्षे आहे. पण ते फक्त गिमिकी वाटते. सिरीअस काही वाजवता येत नाही. तसेच आयपॅड वर पियानो वगैरे पण वाजवून पाहिले ते काही खरे वाटत नाही.

@ अमा - हार्मोनियम घ्या. नैसर्गीक आवाजाची मजाच न्यारी.
बरोबर इलेट्रोनिक तबला घ्या, तालाची पण सोय झाली.

मला पण कीबोर्ड घ्यायचा आहे
सध्या मोबिले वर शिकते आहे आणि क्लास मधे आठवड्या तुन एक्दाच जाते तेव्हा तिथे प्रॅक्टीस करते

अमा मिड रेंज मधला घ्या म्हणजे त्यात रेकॉर्डिंग वगैरेची सोय मिळेल.. अगदीच साधे असतात त्यात विशेष काही मिळणार नाही. आणि यामाहा किंवा रोलँड... दोनच कंपनीपैकी कुठला तरी घ्या..

हार्मोनियम बरीच वर्षे वाजवला आहे. पन कीबोर्डच हवा आहे. आता नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात केलेचि पाहिजे. त्यात बरेच रिधम असतात ऑलरेडी. त्याने मजा येते.

अमा, कॅसिओ तसेच यामाहाचे भारतीय ताल व आवाज असलेली मॉडेल आहेत. ती बहुतेक १२-१८००० च्या दरम्यान आहेत. जसे YAMAHA PSR-I425

भाई, इलेक्ट्रॉनिक कीबोर्डवर ट्रान्स्पोज नावाचे फंक्शन असते. समजा मी दोन नोट्स ट्रान्स्पोजकेल्या तर पांढरी एक (मिडल सी) च्या जागी डी वाजेल (सी आणि डी मायनर उडी मारून सीच्या जागी डी वाजेल)
तुम्हाला हेच अपेक्षित आहे का?

भाई हे बघा. http://faq.yamaha.com/us/en/article/musical-instruments/keyboards/stagep...

एक आख्खा सप्तक पण ट्रान्स्पोज करता येईल की (लिमिट काय असते माहिती नाही).

पण तुमच्यासारखा जाणकार विचारतोय म्हणजे माझी खेचता आहात अशी शंका येतेय मला

हो हो. हेच पाहिजे होत. सगळ्या किबोर्ड मधे असत का हे?.
खेचत नाही रे. नविन किबोर्ड नाही आहे माझ्याकडे. खुप जुना आहे त्यात हे नाही.

भाई, बीकासुराच्या गोळ्या घेता की काय आजकाल? Happy

बहुतेक सगळ्या मिड लेवल (६१की) पासून पुढच्या कीबोर्डमध्ये मिळेल ही सुविधा

अमा, मी ३ वर्षांपुर्वी olxवरून घेतला होता जुना की-बोर्ड. मस्त पिस मिळाला. अनेकांनी हौसेने घेतलेला असतो आणि हौस भागली की विकायचा असतो.

भाई...
स्केल चेंजर कीबोर्ड असतो का?. हार्मोनियम सारखा...>>>... असतो. बहुतेक प्रोफेशनल की-बोर्ड्स ना ही सोय उपलबध असते...
फक्त दोन नोट्स ट्रान्स्पोज करता येतात का?. फुल कीबोर्ड होत नाही का?...>>>... तुमचा प्रश्न लक्षात आला नाही. तरीही उपलब्ध असलेली माहिती देतोय. समजा तुम्हाला काळी-दोन (D#)चा सूर पांढरी-एक (C) वर ट्यून करुन हवा असेल तर ती सोय बहुतेक सर्व प्रोफेशनल की-बोर्ड्स मधे उपलब्ध असते. मात्र त्याच प्रमाणात संपूर्ण सप्तक आणी पूर्ण की-बोर्ड ट्यून होऊन जातो. पूर्वी ही सोय CASIO च्या सुरुवातीच्या Toy-Models (VL-2, VL-6... जी आता खरोखर ईतीहास जमा झालीत) मधे उपलबध होती. त्या नंतरच्या CASIO/ YAMAHA च्या की-बोर्ड्स मधे (Toy-Model असली तरी 'की'ची लांबी 'पीयानो'च्या की पेक्षा अर्धा-पाऊण इंचाने कमी असणारी) Octave-Transpose ही सोय उपलब्ध होती (ज्यात फक्त एकादाच सूर हवा तसा ट्यून करुन पूर्ण की-बोर्ड ट्यून होण्याची सोय नव्हती). यामधे पूर्ण Octave आपल्याला हवा तसा (मागे-पुढे) साधून घेणे शक्य होते... Happy

... त्यासाठी इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड नवा किंवा वापरलेला घ्यायचा आहे. जुनी/ नवी हिंदी गाणी वाजवता यावीत ... >>> ...
सुरुवात 'हार्मोनिअम'ने केलीत तर, तुम्हाला(च) त्याचा खूप फायदा होऊ शकेल. अगदी ईलेक्ट्रॉनीक की-बोर्ड(च) घ्यायचा असेल तर, तुमचे बजेट लक्षात घेऊन मिड-रेंज Toy-Model घ्या. ज्या मधे भरमसाठ वाद्यांचे आवाज नसतील. जेणे करुन तुम्हाला अपेक्षीत असलेली 'संगीत-साधना' करणे शक्य होईल. भरमसाठ वाद्यांचे आवाज असल्यावर 'संगीत-साधने'साठी आवश्यक असणारे 'स्वर-ज्ञान' बाजुला राहून, या वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज ऐकण्यातच सुरुवातीचे दिवस निघुन जातात. नंतर त्यावर आपले आणि इतरांचे प्रयोग करणे सुरु होते. करता-करता काही दिवसांनी 'संगीत-साधने'तला इंटरेस्ट कमी होऊन घेतलेले वाद्य अडगळीत पडुन जाते. हे सगळं स्वानुभवावरुन लिहितोय. सुरुवातीला हे सगळे प्रयोग YAMAHA (PSS-270) की-बोर्ड वर करुन झाले. त्यानंतर काही वर्षे अक्षरशः गप्प बसलो. आता गेल्या तीन वर्षां पासुन 'गिटार' शिकतोय, ज्यात प्रयोग करायचे(च) झाले तर फक्त तारांच्या ट्यूनिंगवर(च) करता येतात... Happy
एकदा स्वर-ज्ञान पक्के झाले की, तुम्हाला आवडणारी जुनी/नवी हिंदी/मराठी गाणी तुम्ही स्वतः (च) वाजवू शकाल. हार्मोनियम वर फक्त जूनी गाणी आणि नव्या गाण्यांसाठी ईलेक्ट्रॉनीक की-बोर्ड लागतो... असा जर काही समज तुमच्या मनात असेल तर, तो अगोदर काढून टाका... Happy

मला सुद्धा माझ्या सहा वर्शाच्या मुलासाठी येत्या मे एप्रिल मध्ये कीबोर्ड घ्यायचा आहे. म्हणजे क्लास त्३एव्हा सुरू करणार. कीबोर्ड त्यापूर्वी घेऊन त्याला हाताळायला द्यावा का? का क्लास सुरू झाल्यावर त्याच्या क्लासचे शिक्षक सांगतील तोच घ्यावा?

अमा, तुम्ही गाणी वाजवतांना दोन्ही हातांचा वापर करू शकत असाल तर किबोर्ड घ्या, नाहीतर पेटी चांगलीच Happy
जर तुम्हाला पेटी सदृष्य आवाज पाहिजे असल्यास यामाहा पीएसाअर आय ४२५ उत्तम.
भारतीय वाद्ये, पिच बेंडर, -१२-०-१२ ट्रान्सपोज आणि बाकी नेहमीची फिचर्स आहेत. कॅसिओ पेक्षा यामाहा चा आवाज चांगला आहे.
मुम्बईमध्ये बरीच चांगली दुकाने आहेत उदा. फर्ताडोज, हरिभाऊ विश्व्नाथ वगैरे.

हार्मोनियम वर फक्त जूनी गाणी आणि नव्या गाण्यांसाठी ईलेक्ट्रॉनीक की-बोर्ड लागतो... असा जर काही समज तुमच्या मनात असेल तर, तो अगोदर काढून टाका... >> असा काहीच समज नाही आहे. पेटी घरी होतीच अनेक वर्षे. टॉय मॉडेल नको आहे ते खूप फ्रस्ट्रेटिंग आणि लिमिटिंग वाटते. जुनी गाणी पेटीवर वाजवली आहेत त्याहून काही अ‍ॅडव्हान्सड करायची इच्छा आहे.

ओलेक्स आणि साइट्स व मुंबईतील दुकानात शोधते. आणि इथे अपडेट देते. ऑडिओ फाइल पण!!!

Roland , KORG यांचे उत्तम दर्जाचे Keyboard येतात.. बहुतेक व्यावसायिक तेच वापरतात..