वैराण वाटतो श्वास..

Submitted by सुशांत खुरसाले on 11 November, 2014 - 02:03

वैराण वाटतो श्वास
कुठे नेलास
तुझा तू भास ?
कैकदा तुझी आरास
दिपवते खास
तरी हव्यास !

पडतात प्रश्न सामान्य
तरीही मान्य
कसा मी चुकलो ..
डोळ्यांत कसा रुजणार
नवा अंधार
तुझ्याने दिपलो !

नाजूक तुझी धुसफूस
वळवणे कूस
नको इतक्यात ..
बोलून झिंगलो फार
तरी श्रुंगार
उरे मौनात !

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाजूक तुझी धुसफूस
वळवणे कूस
नको इतक्यात ..
बोलून झिंगलो फार
तरी श्रुंगार
उरे मौनात !

छान

एकजिनसीपणा यायला हवा होता कवितेत!

अतीशय उत्तम !! परफेक्टच अगदी !!
वृत्ताला पुरेपूर न्याय दिला आहेत . हे वृत्त लावणीसाठी परफेक्ट आहे असे माझे निरीक्षण !
अभिनंदन Happy

धन्यवाद .

वैवकु ,
हे वृत्त
लावणीसाठी परफेक्ट आहे असे माझे निरीक्षण ! << हो, काही लावण्यांमध्ये जाणवलं . Happy

वृत्ताच्या माहितीबद्दल धन्यवाद संतोषजी .

इथे मी १३-८- ८ अशा मात्रा हाताळल्या आहेत . Happy

चांगला प्रयत्न आहे, आवडली.
मी व संतोषनेही काही दिवसांपूर्वी या वृत्तात लिहून पाहण्याचा प्रयत्न केला होता.

इथेही १३ ८ ९ आहे असेच वाटतेय. मधल्या कडव्यात स्पष्ट आहेच.

या वृत्तात विशेषत: मध्य यमके असतील तर ओळ सलग लिहिल्यावर जास्त नादमय आणि प्रभावी वाटते असे वै.म.

ग्रेसांची "कंठात दिशांचे हार....." ही कविता या बांधणीत आहे.

पेटली दिव्याची वात जाहली रात कधीची काळी
कानात गुंजते दूर अशी बेसूर कुणाची हाळी
पेरून थेंब डोळ्यात झोंबते रात रिकाम्या पोटी
हुंदके दाबुनी खोल जराशी ओल लागते ओठी...

झोपड्यात खुरटे श्वास खुळा विश्वास झोपला आहे
मोडक्या छतावर घास कुण्या देवास ठेवला आहे
आलीत वादळे जरी मनाने तरी दडपली भीती
घेऊन तनी आभाळ मनाचा जाळ पसरली माती....

सळसळ होता वार्‍यात थांबली रातकिड्यांची नांदी
ढेकळामधे रंगते कधी भंगते नभाची मेंदी
अंधार दाटला फ़ार वादळे गार धावली रानी
डोळ्यात असा आकांत नदीतुन शांत चालले पाणी.....

तळपेल सुर्य अंबरी कधी भूवरी तेज सांडावे
नाहीच मिळाला भाव रडीचे डाव तिथे मांडावे
बांधून दुःख अंगणी रडे घरधनी झोपडीमागे
पायात लेकरु क्षीण वेदनाहीन खायला मागे.....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)