sinapore badal mahiti havi ahe

Submitted by पूनम पाटिल on 9 November, 2014 - 12:41

hello friends....me ya weekendla Singapore la shift hoat ahe for 1 year...tari
1)long term sathi kuthe appartment changle ahet
2)sobat kay saman anave karan mazya sobat 2 varshachi mulgi ahe...
3)indian grocery milate kay etc etc
thanks for all ur help

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिन्गापुरमध्ये भरपुर भारतीय आहेत.

मायबोलीकर "बी" सिन्गापुरमध्ये असतात. ते नक्कीच मदत करु शकतील तुम्हाला. त्यांच्या विपुची लिन्क http://www.maayboli.com/user/65

एक मैत्रीण,

सिंगापूरमधे आपले स्वागत आहे.

इथे भरपुर मराठी लोक आहेत. तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. फेसबुकवर देखील तसा मराठी लोकांचा ग्रुप आहे सिंगापुरच्या.

तुमची वा तुमच्या यजमानांची जिथे नोकरी असेल तिथे तुम्हाला घर रेन्ट करता येईल. इथे एच. डी. बी. ची घरे थोडी स्वस्त असतात आणि प्रायवेट कॉन्डो ची घरे महाग असतात.

इथे लिटल ईंडिया नावाचा एक भाग आहे तिथे तुम्हाला हवी ती भारतीय वस्तू पदार्थ मिळतो. इथे पेशवाई नावाचे एक दुकाण आहे तिथे खास मराठी पदार्थ विकत मिळतात.

इथे भरपुर मोठे आणि कार्यरत असे महा. मंडळ आहे.मराठी ग्रंथालय आहे.

जर आणता येत असेल तर महिनाभराचा थोडाफार किराणा घेऊन या म्हणजे आल्याआल्या एकदम खरेदी नको.

बी,

http://www.maayboli.com/node/6716 या लेखात युकेमध्ये राहण्याच्या सोयींविषयी नीट माहिती दिली आहे.

जर तुम्ही सिन्गापुरविषयी असा लेख लिहिलात तर उत्तमच!

मी गेल्या ६ वर्षांपासून सिंगापोरमध्ये राहतेय. नोकरीच्या ठिकाणाजवळ किंवा अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर भाड्याने घर मिळू शकते.
सोबत तसे काही आणायची गरज तर नाही कारण काही भेटत नाही असे काही नाही आहे. तरी कुकर, पोळपाट -लाटणे, २-३ ताट - वाटी, एखादी कढई, २-३ भांडी असे घेऊन या. म्हणजे लगेच धावपळ नको. आणि आपले घरी बनवलेले मसाले वगैरे लागत असल्यास ते घेऊन या.
ग्रोसरी खूप सहज मिळते आणि फार कठीण पण नाही.
मी सध्या थोडे दिवस भारतात मुक्कामी आहे. तुम्हाला अजून काही माहिती हवी असलयास बिनधास्त संपर्क करा.