जहाल नाही

Submitted by जयदीप. on 8 November, 2014 - 12:06

जहाल नाही
मवाळ नाही
मतास नेऊ
अशा ठिकाणी

उदास नाही
मिजास नाही
मनास नेऊ
अशा ठिकाणी

जडत्व नाही
गुरुत्व नाही
स्वतःस नेऊ
अशा ठिकाणी

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users