माबोवरील उपेक्षित पण वाचनिय लेखनाच्या लिन्क्स

Submitted by हर्ट on 7 November, 2014 - 10:11

नमस्कार!!!! वाचू आनंदेच्या ह्या ग्रुपमधे समस्त मायबोलीवरच्या वाचनिय लेखनाची इथे फक्त लिंक द्यावी जेणेकरुन नजरेतून सुटुन गेलेल्या लेखनाची उपेक्षा होणार नाही. अलिकडे मला असे जाणवले की जे आवडीचे मित्र लिहितात त्यांनी लिहिलेले आपण वाचतो. ज्यावर खूप खूप प्रतिक्रिया आलेल्या दिसतात ते आपण वाचतो. पण आपल्यामधे असेही काहीजण असतात जे फारसे लिहित नाहीत, नवीन आलेले असतात, फारसे कुणाच्या परिचयाचे नसतात - त्यामुळे त्यांनी लिहिलेले नजरेआड होते. असो.

मी खाली दोन लिंक्स देत आहे. फक्त लिंक देऊन इतरांना कळवा. मायबोलीवरील वाचनाचा आनंद इतरांपर्यंत पोहवचा. लेखनाची कृपया इथे चर्चा नको. त्या त्या नोडवर तुमचा अभिप्राय तुम्ही लिहू शकता. धन्यवाद.

http://www.maayboli.com/node/51452

http://www.maayboli.com/node/51465

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

आवडले असतील तर स्वतःच्या निवडक दहात नोंदवा ना.
मायबोलीने सुविधा ऊपलब्ध करू दिलेल्या असतांना, नुसत्या भाराभर चिंध्याटाईप धागे काढून मायबोलीकरांच्या माथी कश्याला मारत आहात?

लेख वाचनिय आहे हे ठरवणार कोण ? विनोदीलेखनात बरेच लेख आहेत जे गंभीर स्वरुपाचे आहे आणि बरेच गंभीर स्वरुपाचे लेख आहे जे खर तर विनोदी लेखनात असायला हवे Lol

माझं मत म्हणाल तर, मला श्री बेफिकीर, अभिषेकजी, विनीताताई, ॠन्मेषजी ईत्यादींची लेखनशैली आवडते.

त्यांच्या लेखनाचे अनेक धागे माबोवर मिळतील.

झरबेरा, मला इथे उपक्षित पण वाचनिय अशा लेखनाच्या लिंक्स असाव्यात हे अपेक्षित आहे. चिनूक्सच्या लिखाणाला नेहमीच भरघोस प्रतिसाद असतो.

प्रथम, ह्या धाग्याचे उद्दीष्ट ते नाही आहे. मी वर जसे म्हणालो की काही लेखन ह्या ना त्या कारणाने लोक वाचत नाही. ते नजरेस आणून देणे हे होय.

जे लेखन चार पाच जणांनीच फक्त वाचले आहे ते निवडक दहामधे नोंदवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.

लेख कोणी फारसा वाचला नाही म्हणून लेखक केव्हाच हम्मऽऽ इ॰ सुस्कारा सोडून मोकळे झाले असतील आता आणखी एक दीऽऽर्घ सुस्कारा हऽऽम्मऽऽ.

हर्पेन, स्वत:च स्वतःच्या साहित्याची लिंक इथे देऊ नये. मुख्य उद्देश इतकाच आहे की जे साहित्य चांगले आहे ते जर उपेक्षित झाले असेल तर त्या नोडची इथे लिंक देणे.

बी, अरे मजा केली जरा.

पण

व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्ती नुसार इथला वाचक आपापल्या आवडीच्या क्षेत्रातले लिखाण त्या त्या विभागात जाऊन चाळतच अस्तो. इथे हा धागा सगळ्यांसाठी असताना उगाच एक्मेकांच्या माथी नको त्या / नावडीच्या विषयातल्या लिंका ते पण कसलीच पुर्वपीठीका न सांगता नुसत्या का बरे डकवायच्या असे मनी आल्याशिवाय राह्यले नाही.

मजा कळली हर्पेन.

लिंक दिल्यानी कुणी आपल्या माथी मारत आहे असे आपण समजू नये. एकदा टिचकी मारुन बघावे. जर ठिक वाटले तर वाचावे. एक अपाय इतकाच आहे की काहीजण डुप्लिकेट आयडी घेऊन चेष्टेखातर उगाच नको त्या लिंक इथे देतील.

उपेक्षितची व्याख्या काय तुझी?
प्रतिसाद संख्या? मग किती प्रतिसादांच्या आत प्रतिसाद असतील तर उपेक्षित?

माझं मत म्हणाल तर, मला श्री बेफिकीर, अभिषेकजी, विनीताताई, ॠन्मेषजी ईत्यादींची लेखनशैली आवडते.
>>>>>>>
आपण माझ्या नावाबरोबर इतर नावे घेतलेली पाहता आपण माझी मस्करी करत आहात की त्यांची हे समजेनासे झालेय. पण हे आपले प्रामाणिक मत असेल तर माझे पाय दोन फूट हवेत Wink

असो, धाग्याबद्दल बोलायचे झाल्यास उपेक्षित लेखांची लिंक हा प्रकार चांगला आहे, कारण बरेचदा आपण वेळ कमी आणि वाचायला जास्त असल्यास लेखकाचे नाव किंवा प्रतिसाद संख्या बघून किंवा शीर्षकावरूनच ठरवतो यापैकी अमुक तमुक लेख चांगला असेल तर हा पाहिला वाचूया आणि दुसरा वेळेअभावी राहतो जो खरे तर चांगला असू शकतो. आणि असा एखादा लेख वेगाने खाली गेला तर मग तो गेलाच. अश्यांना इथे मानसन्मान देण्यात काही हरकत नाही. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार द्यावे. पण सोबत शीर्षक, लेखकाचे नाव, वा जमल्यास एका वाक्यात आशयही दिल्यास उत्तम

माझं मत म्हणाल तर, मला श्री बेफिकीर, अभिषेकजी, विनीताताई, ॠन्मेषजी ईत्यादींची लेखनशैली आवडते.
>>

तुम्ही माझे लिखाण वाचलेले दिसत नाही अन्यथा तुम्ही असे अपूर्ण विधान करू धजला नसतात::राग:

आता इथे एकच सीन आठ्वतो टाईमपास वाला"मै क्या बोल रहा हुं ,तुम क्या बोल रहे हो ,लेकीन मै इसके भाषाके बारेमे बोल रहा हुं" Proud
वरिल दोन जणांनी नावं लिहिण्यापेक्षा बी सांगतायत तश्या लिंका दिल्या तर बरं होईल. Happy
ह्या मी दिलेल्या लिंका-- हे दोनच माझ्यामते उपेक्षित पण वाचनिय असावेत.

http://www.maayboli.com/node/50102

http://www.maayboli.com/node/465

रॉहु नक्कीच त्याचबरोबर बाबुराव सारखे महान लेखक देखील मायबोलीवर होउन गेले आहेत. त्यांचे देखील नाव नाही आहे

सिनी काय हो हे Proud

लोकहो, कोणी आपले उपेक्षित लिखाण लपवण्यातच धन्यता मानत असेल तर त्याला वर काढू नका Wink

<माझं मत म्हणाल तर, मला श्री बेफिकीर, अभिषेकजी, विनीताताई, ॠन्मेषजी ईत्यादींची लेखनशैली आवडते.>

विनिताताई कोण?

बी ,अगदी मनापासुन धन्यवाद .माझ्या कवितेचि इथे लिन्क दिल्याबद्दल.
वाचु आनन्देचा शोध मला अलिकडेच लागला सुशांतजीन्चा लेख भारतीताईना वि पु . करताना सापडलेला .
म्हणून लगेच प्रतिक्रिया दिली .तुमचे आभार मानण्यास उशिरा झाल्याबद्दल क्षमस्व .