माझ्या प्रकाशित बालकविता

Submitted by डॉ.सतीश अ. कानविंदे on 3 November, 2014 - 09:37

बोबडकांदा
(२४ ऑगष्ट १९९७ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज' मध्यें प्रकाशित)

थदले मला तिलवतात
बोबलतांदा बोबलतांदा
मला त्यांता लाद येतो
तलतो मद मी त्यांता वांदा

एतदा मी आईला म्हतलं
"दे ना मला थोलं थोबलं"
आई म्हनाली "नीत बोल
थोलून दे हे बोलनं बोबलं"

लादावलो मी थूप तेव्हां
लुतून बतलो तोपल्यात दाऊन
आईतं लत्थ नव्हतं तेव्हां
थदलं थोबलं तातलं थाऊन

ताई आनि दादा थुद्दा
तिलवून मला हैलान तलतात
"बोबलतांद्या,बोबलतांद्या"
अथीत मला हात मालतात

तोनावल मादा विथ्वात नाही
तुमीत आता मला थांदा
तुमालाही वाततं ता हो
आहे मी एत बोबलतांदा?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिंटूचा अभ्यास
(१२ एप्रिल १९९२ च्या महाराष्ट्र टाइम्स मध्यें प्रकाशित)

पिंटूची पाटी
छोटी छोटी
अक्षरं त्यावर
काढतो मोठी

पेन्सिली हव्यात
दिवसाला चार
म्हणतो "अभ्यास
करतो मी फार"

दोनच आकडे नी
अक्षरं तीन
काढून त्याला
येतो शीण

पाटी पेन्सिल
दफ्तरात भरून
"झाला" म्हणतो
"अभ्यास करून"

अंतराळवीर कावळा
(६ मार्च १९८८ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज'मध्यें प्रकाशित)

कावळ्याने ठरवले अंतराळात जायचे
ग्रह आणि ता-यांना जवळून पहायचे

उंचच उंच उडाला अंतर काही संपेना
ग्रह तारे तर सोडाच आपली पृथ्वीही दिसेना

घाबरला मग खूप, आता करायचे काय?
दमला होता फार पण टेकणार कुठे पाय?

तेवढ्यात एक उपग्रह जवळून गेला
कावळ्याने लिफ्टसाठी खूप प्रयत्न केला

कावळ्याचा हा प्रयत्न एकदमच फसला
तेव्हां आपला मृत्यू त्याला समोरच दिसला

तरीपण जोर करून अंतराळात गेला
हवेवाचून लगेच तडफडून मेला.

very sweet poem. i liked it so much.
mi mhanoon pan pahili. far awdali. bobad kandyachi kavita Happy

धन्यवाद भारती आणि दक्षिणा.प्रत्येक कवितेसाठी नवीन धागा वापरा असे भारतीने सुचविले आहे. नवीन धागा कसा घ्यावा याबद्दल मला माहीती दिल्यास बरे होईल कारण मला ते अजून जमत नाहीय.तोपर्यंत प्रतिसादमध्येंच कविता टाकतोय.

चिडूबाई
(७ मार्च १९९३ च्या महाराष्ट्र टाइम्स मध्यें प्रकाशित)

चिडूबाई चिडली
उग्गाच रडली
धावत सुटली
धपकन पडली

खोडकर बाळू
पुढ्यात बसला
तिचाकडं पाहून
फिस्सकन हसला

चिडूबाई उठली
बाळूला पाडलं
चांगलंच त्याला
बुकलून काढलं

तुम्ही जसा हा धागा काढलात ना तसाच नवा धागा काढायचा Happy
या धाग्यात हेडर मधे जशी एक कविता टाकलीये तशी प्रतिसादातली कविता कॉपी करून तिक्डे टाकायची Happy
फार अवघड नाहीये Happy

हे बघा -
http://www.maayboli.com/node/1508

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. नवीन धागा काढून नवीन कविता टाकलीय.
तसेच 'कविता' या सदरामध्येंही "प्रतिभा' या दिवाळी अंकात (या वर्षीच्या)छापून आलेली 'ओळखलंत कां डॉक्टर मला?' ही कविता टाकलेली आहे. तीही जरूर वाचावी.