घर्षणाने या ढगाची झीज कर

Submitted by जयदीप. on 2 November, 2014 - 23:32

घर्षणाने या ढगाची झीज कर..
शेर माझा एकदा तू वीज कर!

शब्द दे तू वेदनेला नेमके
हुंदक्याच्या आशयाचे चीज कर!

जा, स्वतःला भेट मित्रासारखा
एकटेपण आज तू काबीज कर!

ना धजावे हात खुडण्याला कधी
त्या फुलांच्यासारखे काळीज कर

जाग यावी पैलतीरावर मला
तू इकडच्या जागण्याला नीज कर!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users