गर्द झाडे, सावली अन् गारवा ...

Submitted by जयदीप. on 26 October, 2014 - 23:10

गर्द झाडे, सावली अन् गारवा ...
भासते मग का हवेची वानवा?

एरवी तर तो तुला नाही दिसत..
रात्र झाली की कळावा काजवा!

पावसाळा संपला केव्हातरी
पावसाळी आजही आहे हवा!

एक पक्षी बोलला माझ्यातला...
दक्षिणेला चालला आहे थवा!

मान्य करतो कैद मी, सुटका नको...
पिंजरा घे हा जुना अन् दे नवा!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users