तळाशी जायचे धाडस कुठे होते

Submitted by बेफ़िकीर on 26 October, 2014 - 13:44

सुशोभित विकृती मिरवायचा धंदा
असो तेजीत पण बोलायचे मंदा
म्हणालो वेगळे वागू जरा यंदा

तळाशी जायचे धाडस कुठे होते

परतल्यावर तुला क्षणभर न घालवते
उमाळे, ताण, नजरा, घाम वागवते
तुझ्यापेक्षा तुझे ब्लाऊज पेटवते

तळाशी जायचे धाडस कुठे होते

जगी प्रत्येक स्त्री तक्रार का करते
कधीही स्त्री समाधानी कशी नसते
समजते तर पुरुष दुनियेत का असते

तळाशी जायचे धाडस कुठे होते

कहर उपभोग देते आपली कविता
हवेसे रोग देते आपली कविता
किनारी भोग देते आपली कविता

तळाशी जायचे धाडस कुठे होते

=======================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users