चष्मा

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 October, 2014 - 13:31

लहानपणापासून...
डोळ्यांवर चढवलेला
बाळबोध संस्कारांचा चष्मा !

दिवसेंदिवस नंबर वाढतच गेलेला..
लेसर ट्रीटमेंट वापरून
मुळापासून उच्चाटन करण वगैरे...
राहुदेत एकवेळ !
पण निदान, निदान फ्रेम तर बदलशील ?
फॅशन म्हणून नकोय पण
चेहरेपट्टीला शोभायला नको ?

तुझी जगाकडे पहायची दृष्टी
नाही बदललीस तरी
जगाची तुझ्याकडे पाहण्याची दृष्टी ?
जगात वावरायच तर...
इतक तरी भान ठेवायला नको ?

आऊट डेटेड ठरूत हं दोघेही !
तुझ्या असल्या मुलखाच्या हट्टी स्वभावाने..

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्या कवितांचे सध्या पेव फुटलेले आहे. एक कल्पना घ्यायची, ती फुलवायची आणि एका गचक्यावर आणून सोडायची! पण त्या पेववाल्या गर्दीत ही कविता अचानक सुखद वाटून गेली. त्याची कारणे:

दिवसेंदिवस नंबर वाढतच गेलेला..

निदान फ्रेम तर बदलशिल ?

ह्या ओळींमुळे!

अवांतर - 'बदलशिल' - मुक्तछंदात र्‍हस्वदीर्घ का पाळले जात नाहीत? त्यात काही छंद-वृत्ताची भानगड नसते.

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

>>>>अवांतर - 'बदलशिल' - मुक्तछंदात र्‍हस्वदीर्घ का पाळले जात नाहीत? त्यात काही छंद-वृत्ताची भानगड नसते. <<<<<

हलगर्जीपणा हो ! दुसर काय ? Sad

धन्यवाद !!