मौन मदहोश कर..

Submitted by सुशांत खुरसाले on 24 October, 2014 - 01:42

शब्द बेहोश कर, मौन मदहोश कर
खूपसे बोललो वायफळ आजवर

थेट मरणार नाही उन्हाने कुणी
पाज अलगद कवडशांमधोनी जहर

एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर

'आपले' लोक सगळे जमू लागले
कोण करणार आता कुणाची कदर

झाक डोळे ढगानेच चंद्रा तुझे
चांदणीचा ढळू लागल्यावर पदर

खूप श्रुंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर

थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर<<< व्वा

झाक डोळे ढगानेच चंद्रा तुझे
चांदणीचा ढळू लागल्यावर पदर <<< मोहक

खूप श्रुंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर<<< वा वा

थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर <<< व्वा

एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर

झाक डोळे ढगानेच चंद्रा तुझे
चांदणीचा ढळू लागल्यावर पदर

खूप श्रुंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर

थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर

एकसे बढकर एक !! वा मजा आया !!!

धन्यवाद !

एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर

थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर <<< हे २ जास्त आवडले

वाळलेली नजर << प्रतिमा मस्त शेरही छानच

फेसबुकावर एक शेर वाचला तेव्हा पासूनच उत्सुकता होती सगळी गझल वाचण्याची.!
मस्त....झक्कास!

धन्स..

फार सुंदर!

खूप श्रुंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर

क्या बात है!

शब्द बेहोश कर, मौन मदहोश कर
खूपसे बोललो वायफळ आजवर

अप्रतिम!