अपूरी कविता

Submitted by satishamane on 7 January, 2009 - 03:21

तुझं माझ्या आयुष्यात येणं, मला अगदीच अनपेक्षित होतं,
पण मला हवंहवंस वाटणारं, माझ्या आयुष्यातील महत्वाचं वळण होतं.......

डोळ्यांसमोर असतो सदा तुझाचं चेहरा, तुझाचं विचारांत मी नेहमी मग्न,
तुझात इतकं गुंतलो मी बघ ना, रात्रीही पडते तुझ्येच स्वप्न...

तुझं मला हो म्हणंण म्हणजे, माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण,
ज्या एका क्षणाभोवती घातलीय माझ्या भविष्याची गुंफण.....

त्या वळणापासून ते थेट माझ्या म्रूत्यूपर्यत, हवीय फक्त तुझीच साथ,
चालशील ना ग सोबत माझ्या घेऊन हाता मध्ये हात?.....

तुझ्याशिवाय आयुष्य ही कल्पना ही करवत नाही मला,
तेच तुला सांगण्यासाठी, मी ह्या कवितेचा प्रयत्न केला....

भावनांना शब्दांत बांधण्याची पूर्ण कोशिश केला,
पण भानाच इतक्या मोठ्या की ही कविता अपूरी पडली....

गुलमोहर: 

सतिशजी,
दुसरा प्रयत्न खुप छान जमला आहे ...
असाच सुप्त गुणांना वाव देत रहा...
शुभेच्छा...

आपला,
निल

भापो Happy

पण काही "मुर्ख चुका" (silly mistakes या अर्थाने) टाळता आल्या असत्या...
जसे की -
तुझाचं विचारांत -> तुझ्याच विचारात
तुझ्येच स्वप्न - > तुझेच स्वप्न

शिवाय,

भावनांना शब्दांत बांधण्याची पूर्ण कोशिश केला,
पण भानाच इतक्या मोठ्या की ही कविता अपूरी पडली....

हे शेवटचं कडवं एखाद्या लांबलेल्या टीव्ही मालिकेच शेवट घाईघाईने गुंडाळावा तसं वाटलं
यमकसुद्धा जुळत नाहीये राव...

पण भानाच इतक्या मोठ्या की ही कविता अपूरी पडली....
पण "भावनाच" असं म्हणायचं आहे का तुम्हाला ?

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

भावना पोचतेय.
मनातलं मनापासुन लीहीलय.
असं बाहेर पडलं की कसं मोकळं वाटतं ना?
छान आहे कविता.