सांग कसे ते कण्हतानाही गात असावे

Submitted by जयदीप. on 18 October, 2014 - 03:05

सांग कसे ते कण्हतानाही गात असावे...
दगडाखाली आयुष्याचे हात असावे!

दगडांवरती रेघोट्यांची नक्षी आहे...
रस्ता बनवत पाणी खाली जात असावे

उडतो आहे पक्षी तुटलेल्या पंखांचा
खूळ नवेसे त्याच्याही डोक्यात असावे..

डोहामध्ये..पडल्यावरती वलये इतकी ..
काय कळेना पानाच्या स्पर्शात असावे!

खोदत आहे आयुष्याला केव्हाचा तो
खाण कशाची आहे.... त्याला ज्ञात असावे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा…

गेल्या अनेक दिवसात इकडे-तिकडे वाचलेल्या गझलांमधली सर्वात आवडलेली गझल…

मतल्यात सानी मिसऱ्यामध्ये 'असावे' ही रदीफ 'असावे'त अशी वाचली.

उत्तम जयदीपराव…

शुभेच्छा.

कैच्या कै लिवता राव.....इतकं भारी नका लिवत जाऊ.....जीव वरखाली होतो आमचा......भन्नाट रचना आहे अगदी