वाळलेले झाड

Submitted by जयदीप. on 11 October, 2014 - 05:05

तरही गझल.

मूळ मिसरा : हे असे आभासवाणे चांदणे आता नको
- संगीताजी (संगीता जोशी)

रात्रभर आकाशगंगा वाहणे आता नको
हे असे आभासवाणे चांदणे आता नको

मी तुला दिसलो कधी तर टाळ तू नजरानजर...
पण तुझे ते आैपचारिक हासणे आता नको!

या जगाला वाटते मी झिंगतो आहे किती...
पावले माझ्यापरीने टाकणे आता नको!

वाळलेले झाडसुद्धा सावली देते म्हणे!
पालवीचे स्वप्न येथे पाहणे आता नको..

धूळ उडवत वाहने जातात या रस्त्यातली
बाजुला ताज्या फुलांचे उगवणे आता नको

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा बेस्टच

कुठून मिळाली ही ओळ तरहीसाठी इतरत्र कुठे उपक्रम वगैरे चालू आहे का

शेवटचा काफिया जरा अधिक बांधीव जमला असता असे वाटते (वैयक्तिक आवड्निवड )
असो
शुभेच्छा
_________________________

संगीताजी <<< संगिता आज्जी असे म्हटले तरी चालते म्हणे Lol (उगाच टाईम्पास म्हणून केलेला विनोद बरका ! मनावर घेऊ नये Happy )