पाऊस....., कुठे ओघळला असेल तोही

Submitted by नभ on 9 October, 2014 - 00:29

पाऊस....., वादंग म्हणून ऊठलेला,
शमला असेल तोही, बनुनी थेंबाचा टिपूस तारा
कुठे ओघळला असेल तोही

नको असताना खास येतो,
सोबती चार क्षणास जुळतो,
हवे असतांना साथ त्याची तव,
का तरी त्यासी ‘क्षणांत’ शोधतो
उगीच वाट सावरतांना घुटमळला असेल तोही,
पाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........

थैमान भिवंडर उसवून गेले मर्मबंधने आज,
वळून मागे काय शोधसी, भुलावलेली सांज ?
सांगता न तो जरी, तरी झुरत असेल विरही,
पाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........

याद अशी हि विखार झाली,
गजबजले तरी क्षुब्ध मैफीली,
उदास वाट चालतांना, कुठे दमला असेल तोही
पाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........

पालवी भिजली मनाची माती,
चिखलली सारी प्रेमाची नाती,
मी धरिला नयनात तसा का सागर धरिला तुही,
पाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........

न सांगता कळतात कसे रे मनातूनी हे मन,
एकमेकांस साधतात का अबोलीने स्पंदन,
गहिवरले हे नयन उसासे साद घालती तरीही
पाऊस….., वादंग म्हणून ऊठलेला..........
कुठे ओघळला असेल तोही......

Group content visibility: 
Public - accessible to all site users