सगळीच माणसं दिसतात...

Submitted by मंदार शिंदे on 7 October, 2014 - 17:28

सगळीच माणसं दिसतात कशी वैतागलेली
डोकी फुटलेली अन्‌ हातात दगड घेतलेली

कणाकणात असतो म्हणे देव वसलेला
मग का इथं मशिदी तिथं मंदीरं बांधलेली

प्रत्येकाचा शेवट तर मातीत ठरलेला
मग अमरत्वाची कसली ही भूल पडलेली

काय अर्थ असल्या खोट्या जगण्याला
वर्षं नुसतीच वाया गेली की हो जगलेली

Group content visibility: 
Public - accessible to all site users