मेट्रो

Submitted by मंदार शिंदे on 7 October, 2014 - 16:22

मुंबईच्या चकाला (अंधेरी) स्टेशनवरुन वर्सोव्याला जायचं होतं.
नविन रिलायन्स मेट्रोच्या घाटकोपर-वर्सोवा रुटवरच चकाला स्टेशन असल्यानं मेट्रो प्रवासाचा चान्स मिळाला.
चकाला स्टेशनवर लोकलच्या मानानं कमी असली तरी बर्‍यापैकी गर्दी होती.
तिकीटासाठी रांगेत उभं रहावं लागलं नाही. टच्‌-स्क्रीन किऑस्कवर ती सोय केली होती.
डेस्टीनेशन वर्सोवा सिलेक्ट केल्यावर मशिननं दहा रुपये मागितले.
दहाची नोट मशिनमधे टाकली की एक प्रिंटेड रिसीट आणि एक प्लास्टिकचं टोकन बाहेर!
एन्ट्री गेट आपोआप उघडझाप होणारं. गेटवर टोकन ठेवलं की गेट उघडणार.
(रिलायन्स मेट्रोचं प्रीपेड कार्ड असेल तर टोकन घ्यायची पण गरज नाही. शंभर रुपयांचं रिचार्ज, एक वर्षाची व्हॅलिडिटी. गेटवर टोकनऐवजी कार्ड ठेवलं की गेट उघडणार आणि चकाला स्टेशनची एन्ट्री तुमच्या नावावर. मग जिथं उतरणार त्या स्टेशनवर एक्झिटला कार्ड ठेवलं की त्या स्टेशनपर्यंतचं भाडं कार्डवरुन परस्पर कट. मस्त ना?)
मग एन्ट्री झाल्यावर सिक्युरिटी चेक.
त्यानंतर कुठंही कसलंही चेकींग, कसलीही रांग नाही.
प्लॅटफॉर्मवर मेट्रो आली की दरवाजे आपोआप उघडतात. आत गेलो की बंद होतात.
आतमधून मेट्रो पूर्ण एसी! मुंबईत!!
बाहेरुन वेगवेगळे डबे दिसले तरी आतून सलग पॅसेज. बेंच फक्त दोन बाजूंना, मधे उभं राहण्यासाठी रिकामी जागा. उभं राहताना आधारासाठी बार, सर्कल, हँडल...
पुढचं स्टेशन कुठलं येणार, याची स्पीकरवरुन अनाऊन्समेंट. शिवाय दरवाजावर त्या स्टेशनच्या नावाचा इंडिकेटर. ज्या बाजूचा दरवाजा उघडणार तिकडचा वेगळा इंडिकेटर.
वर्सोवा लास्ट स्टेशन. दहाव्या मिनिटाला बाहेर.
एक्झिट गेटवर प्लास्टिक टोकनसाठी कॉईन-बॉक्ससारखी फट. त्यात टोकन टाकलं की गेट उघडणार. पुन्हा कुठलं चेकींग, टी.सी. काहीच भानगड नाही.
हेच अंतर बाय रोड जायला म्हणे अर्ध्या-पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागतो. मेट्रोनं फक्त दहा मिनिटं.
शिवाय ती दहा मिनिटंसुद्धा एसीमधे!
मुंबईचा लोकल प्रवासपण असा करता आला तर...?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईचा लोकल प्रवासपण असा करता आला तर...?
>>>
मध्यमवर्गीय चाकरमान्यांना आर्थिकद्रुष्टया परवडेल का?
लोकं लटकत जातात इथे .. सामावून घेतली जातील का?
स्वच्छता टिकून राहील का?
परप्रांतीयांचा प्रश्न - अनधिकृत झोपडपट्टीचा प्रश्न - भिकारी आणि गर्दुल्यांचा प्रश्न - चुटकीसरशी सुटेल का?

आमेन!
कालच संध्याकाळी साडेसहा वाजता जेबी नगर वरून मेट्रो पकडली ,लेडीज डब्यात इतकी गर्दी होती . चढणार्या बायका अक्शरशः " अरे , चलो अंदर ,चलो अंदर " ओरडत चढल्या Sad

अंधेरी वरून ट्रेन पकडली की सेकण्ड क्लास मध्ये हेच द्रुश्य असत