हा स्वत्वाचा तपास मानू आता

Submitted by बेफ़िकीर on 7 October, 2014 - 15:32

गझल - हा स्वत्वाचा तपास मानू आता

हा स्वत्वाचा तपास मानू आता
चल देहाला लिबास मानू आता

जेथे तेथे 'मी'च आडवा येतो
हे कळणेही विकास मानू आता

लिहायचे ते लिहिता आले नाही
आयुष्याला समास मानू आता

टोल फक्त मरणाचा द्यावा लागे
जन्माला बायपास मानू आता

केव्हाची आनंदी वाटत आहे
मनस्थितीला उदास मानू आता

ह्या वाटेवर एकटाच आहे मी
माझ्याइतके कुणास मानू आता

सर्व फुलांचे देठ सारखे होते
हा कोणाचा सुवास मानू आता

उगीच काहीतरी बघू जमते का
अंधाराला भकास मानू आता

पूर्वी आई दार उघडण्या जागे
त्यास पोरका प्रयास मानू आता

शिकायचे ते शिकून झाल्यावरती
'बेफिकीर'ला कशास मानू आता

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहायचे ते लिहिता आले नाही
आयुष्याला समास मानू आता

ह्या वाटेवर एकटाच आहे मी
माझ्याइतके कुणास मानू आता.. सुंदर

अवांतर- .. मानूया का .. अशी रदीफ वाचून पाहिली. Happy

सगळे शेर उत्तम
एक दोन ओळी कमी आवडल्या

एक शेरही सुचला (अर्थात काफियानुसारीच आहे म्हणा )

सगळ्या श्वासांचे करेल जी सोने
त्या घटिकेला मिडास मानू आता

पूर्वी आई दार उघडण्या जागे
त्यास पोरका प्रयास मानू आता

गझल छानच नेहमीप्रमाणे, खूप दिवसात तुमची एखादी कविता वाचली नाही..

जेथे तेथे 'मी'च आडवा येतो
हे कळणेही विकास मानू आता

टोल फक्त मरणाचा द्यावा लागे
जन्माला बायपास मानू आता

शिकायचे ते शिकून झाल्यावरती
'बेफिकीर'ला कशास मानू आता

बेस्ट....

अफलातून... नेहमीप्रमाणे !

लिहायचे ते लिहिता आले नाही
आयुष्याला समास मानू आता

लिहायचे ते लिहिता आले नाही>>>>>अरेच्चा ! अस तुम्हालाही वाटत होय ? Happy

धन्यवाद !