अजुनही तोच आहे...

Submitted by चिन्गुडी on 5 October, 2014 - 05:25

अजुनही डोळ्यातल्या खजिन्यात दडलेला तो आहे
मिटलेल्या पापण्यांच्या आत रुजलेला तो आहे....

रुंजी घालणार्‍या सहवासाच्या सुवासिक अनुभुतींना
पुनः पुन्हा साद घालणारा तो आहे...

न भिजता आलेल्या त्या पावसातल्या वचनांना पुर्ण करण्यासाठी
मला अश्रुत भिजवणारा ही तोच आहे

दुरावा नको म्हणताना...मला दुरावणारा
आणि त्या दुराव्यातही , मला जवळ ओढणारा तोच आहे

आपलं परकं... व्यवहार न मानता,
सर्वस्व पणाला लावुन केलेल्या प्रेमाचा अदभुत अविष्कारही तोच आहे...

हरवलेल्या काळजाच्या तुकडयातुन
भळभळणार्‍या जखमेची विव्हळही फक्त तोच आहे!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users