पुखराज या कवितासंग्रहाची अर्पणपत्रिका

Submitted by काळेकाकू on 1 October, 2014 - 07:23

कुछ ख्वाबों के खत इन में,
कुछ चांद के आईनें, सूरज की शुआएं हैं
नज्मों के इस लिफाफों में
कुछ मेरे तजुर्बें हैं, कुछ मेरी दुवाएं हैं
निकलोगे सफर पे जब, ये साथ में रख लेना...शायद कहीं काम आयें

याचा स्वैर अनुवाद....
सुखस्वप्नांचे संदेश काही आणि चंद्राचे ऐने बिलोरी
सहस्ररश्मीच्या किरणांनी बांधून दिले गं तुझ्या करी
या कवितांच्या ओळींमध्ये अनुभवांचे संचित माझ्या
शुभाशीषांचा हातही यातून ठेवतो गं माथी तुझ्या
जगण्याच्या यात्रेत बाळा, सोबत घेई ही शिदोरी
होईलही उपयोग काही क्वचित जर भासेल जरुरी....

Group content visibility: 
Public - accessible to all site users