व्हॉटसऍप, फेसबुक आणि श्रद्धा

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 1 October, 2014 - 07:17

व्हॉटसऍप आणि फेसबुक.... किती जवळ आले आहेत ना सगळे... म्हणजे मनात काहीही आल (अगदी बुल शीट), काहीही पाहिलं तर करा थोडी जुळवाजुळव आणि पाठवा व्हॉटसऍप वर नाहीतर करा स्टेटस अपडेट... वाचणारे आणि पाहणारे आहेतच भरभरून.... म्हणजे कुठल्याही गोष्टीची शहानिशा करायची नाही आणि दाबायच फोरवर्ड बटन. (तेच सोप्प जात... बाकी शहानिशा करायला फालतू वेळ आहे कुणाकडे? फालतू लांबलचक लिहिलेलं वाचायला वेळ काढतो तेच फार मोठ झाल....)

खर तर हे सार लिहायचं प्रयोजन म्हणजे हल्लीच आलेला एक फोरवर्ड मेसेज...तो म्हणजे..." नवरात्रीचा सुविचार - नऊ दिवस चामड्याच्या चपला न वापरता अनवाणी फिरण्यापेक्षा चमडीगिरी सोडा, देवी अपोआप पावेल..." वरवर पाहायला गेल तर विशेष काहीच नाही...पण त्यादिवशी माझी ऑफिसमधली सखी तोंड पाडून बसली होती... काय झाल विचाराव तर तिला रडूच कोसळल... म्हणाली, "तुला माहिती आहे ना माझा नवरात्रीचा ९ दिवस उपवास असतो ते... आणि मी अनवाणी चालते ह्या ९ दिवसात" "हो तर" ( कशी विसरेन मी.... HR शी खूप भांडली होती ती त्या संदर्भात...) " मग हे काय लिहिलंय? मी काय चमडीगिरी केली ग, आता माझी श्रद्धा आहे देवीवर त्याला अस काहीही लिहाव ...?" खरच तीच म्हणण १००% खर होत. तिला समजावलं, "अग वेडे ते तुझ्यासाठी कुठाय ते तर जे चमडीगिरी करतात ना त्यांच्यासाठी लिहील आहे. तू का मनावर घेतेस? " ती, "तू काहीही समजवायचा प्रयत्न करू नकोस, जे अस वाईट वागतात ते असे चप्पल न घालता फिरत नाहीत... उलट भल्या लोकांच्या पायात काटे कसे रुततील त्याचा प्रयत्न करतात" मी निःशब्द... (आता जणू काही हा मेसेज मीच लिहिला आहे अस समजून हि सारा राग माझ्यावर काढते कि काय?) देवी आणि तिची भक्त... त्या भक्तीच्या पुढे मी किती समजावणार..आणि कस...? थोड्या वेळाने ती स्वतःच शांत झाली.

ती शांत झाली पण माझ्या डोक्यात असंख्य गोष्टी देऊन गेली... तीच एकच वाक्य आणि माझ्या डोक्यात आलेला "नवीन लेखनाचा धागा", तिच्यासारख्या अनवाणी चालणार्या किती तरी बायका माझ्या दररोजच्या जीवनात मी न्याहाळत होते. किंबहुना अस काही लिहायचं ठरवलं कि अशी जास्तच उदाहरणे दिसू लागतात.

आज सकाळीच ट्रेनच्या गर्दीत १ फुट (?) उंचीच्या स्यानडलचा पाय एका देवीभक्तीच्या अनवाणी पायावर पडला, ती ओरडली पण "एवढीही सहनशक्ती नाही का?" या प्रश्नावर त्या बापडीने पुढे विषय वाढवलाच नाही. (इतर वेळी मात्र एकमेकींच्या झिंज्या ओढेपर्यंत भांडण वाढली असती) तरीही ती मला काही चमडीगिरी करणार्यातील वाटली नाही.

आमच्या घरी कामाला येणारी मंगला काकू... तीही एक अशीच श्रद्धाळू. कष्ट करून पोरा बाळांना आणि दारुड्या नवर्याला सांभाळणारी... तिचा आणि चमडीगिरीचा दूरवर संबंध नाही उलट नवर्याचे व्यसन सुटावे म्हणून तिने हा सारा घातलेला घाट. उलट जे वाईट वागतात त्यांनीच सुधाराव म्हणून जे बिचारे चांगले असतात ते स्वतःला आणखीन उपवासाचे कष्ट देतात.

या सगळ्यांचा अतिरेक म्हणून कि काय आमच्या बॉस ची बायको ऑफिसमध्ये आली होती चक्क पायात काहीच न घालता. माझ्या सखीने त्या HR ला असा काही लुक दिला कि काय वर्णन करू त्याच्या चेहऱ्याच... आता ह्या एवढ्या मोठ्या लेव्हल च्या स्त्रीला काय हो गरज... (तशी ती कारच्या बाहेर उतरून अनवाणी पावलाने काट्या खळग्यातून चालायचा योग हा विरळा.)

या सगळ्यावरून एवढच लिहायचं आहे ते म्हणजे कुठलाही मेसेज फोरवर्ड करताना आज आपण "भावना" या प्रकारचा विचार करतो का? हिंदू धर्मात श्रद्धेला अपार महत्त्व दिल आहे... त्याचा थोडासा विचार तरी नको का करायला? तस असेल तर सगळच झुठ आहे म्हणाव लागेल... अगदी "पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडूनिया गाठ..." हे बोलसुद्धा... नाही का?

…मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा वगैरे ठीक आहे.पण अनवाणी चालण्याने रस्त्यावरची घाण, थुंकी,पावसाने झालेला चिखल यातून अनवाणी चालण्याने घाण नाही का वाटत.

तुमच्या श्रद्धा तुमच्यापाशीच असतील तर ठिके. गणपतीला, नवरात्रात दर दिवशी व्हॉटसॅपवर येणारे विविध पुजांचे फोटो, फेसबुकावर सतत गळत असणारे विविध बुवाबापूमहाराजांचे फोटो, श्रद्धेचा प्रचार-प्रसार-बाजार हे काय असते?
कुणाला कंटाळा येऊ शकत नाही का?

>> " जे अस वाईट वागतात ते असे चप्पल न घालता फिरत नाहीत... उलट भल्या लोकांच्या पायात काटे कसे रुततील त्याचा प्रयत्न करतात" <<
एवढी व्रतं पाळूनही दुसर्‍याला वाईट म्हणणे सुटतच नाही तर काय उपयोग त्या व्रतांचा?
बर तुम्ही ठराविक नियम पाळता तो तुमचा प्रश्न आहे पण न पाळणारे कसे वाईट हे नाक उडवून सांगायला कशाला पाहिजे?
तथाकथित श्रद्धावान लोक (जपजाप्य, उपासतापास व सर्व कर्मकांडे करणारे आणि मिरवणारे) वाईट वागतच नाहीत असं काही नसतं.

उंचीच्या स्यानडलचा पाय एका देवीभक्तीच्या अनवाणी पायावर पडला, <<
मुंबईच्या गर्दीत कुणाच्या पायावर कुणाचा पाय पडला तर स्यान्डवाल्याची चूक नसते. असं होतंच असतं. तुम्ही अनवाणी चालता म्हणजे जगावर उपकार करत नाही की जगाने तुमच्या अनवाणी पायांकडे लक्ष देऊन गर्दीतही तुम्हाला वाचवावे.

माझा असा अंदाज आहे की तो मेसेज मुख्यत्वे पुरुषांना उद्देशुन अाहे. नवरात्रात चप्पल न घालता, उपास तपास करणारे अनेक पुरुष बाकी वर्षभर बायकां-मुलींशी कसे वागतात किंवा चमडेगिरी कशी करतात यावर ती टिप्पणी होती. त्यात दुखावले जाण्याची काहीच गरज नाही. उलट योग्य सुनावले आहे. असली थोतांडे करण्यापेक्षा खरेखुरे सुधारा...
नऊ दिवस चप्पल न घातल्याने देवीला काही फरक पडणार नाही आणि तुमच्यात तर मुळीच नाही.

चमडीगिरी सोडा==> तुम्ही चुकीचा अर्थ घेतला आहे असे जाणवते.
छेडछाडीचे प्रकार किंवा शेरेबाजी (महिलांवर / मुलींवर) करणे ह्याला 'चमडीगिरी करणे' असे संबोधले जाते.
काही लोक / टवाळखोर मंडळी असे प्रकार करणे सो़डत नाही त्यांना संबोधून असे लिहीले आहे (असे माझे वै.म.)

त्यांच्या मैत्रिणीला सोडा..खुद्द धागाकर्तीलाच त्याचा अर्थ माहीती नाहीये असे दिसतेय. कारण त्यांनी कामाला येणारी बाई, बॉसची बायको अशी स्टिरीओटाईप उदाहरणे दिली आहेत. त्यांना एकही पुरुष दिसला नाही त्यात

माझा असा अंदाज आहे की तो मेसेज मुख्यत्वे पुरुषांना उद्देशुन अाहे. नवरात्रात चप्पल न घालता, उपास तपास करणारे अनेक पुरुष बाकी वर्षभर बायकां-मुलींशी कसे वागतात किंवा चमडेगिरी कशी करतात यावर ती टिप्पणी होती>>>> बरोबर. नवरात्रीमधले नऊ दिवस देवीची उपासना करण्या ऐवजी प्रत्येक स्त्रीला सन्मानानं वागवा असा त्या मेसेजच अर्थ आहे आणि तो उचित आहे.

तरीही ती मला काही चमडीगिरी करणार्यातील वाटली नाही.>>>> हरे राम!!!! धागाकर्तीला खरंच अर्थ माहित नाहीये.

चमडीगिरी करणे म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे महिलेशी अनैतिक वर्तन . नवीन धागा काढायच्या घाईत शब्दांचा घात करु नगा वो .
<<<स्यानडलचा पाय एका देवीभक्तीच्या अनवाणी पायावर पडला, <<
मुंबईच्या गर्दीत कुणाच्या पायावर कुणाचा पाय पडला तर स्यान्डवाल्याची चूक नसते. असं होतंच असतं. >>> नीधप तुमच्या पायावर असा कुणाचा पाय पडला तर तुमची रिअ‍ॅक्शन काय असती ?

नीधप तुमच्या पायावर असा कुणाचा पाय पडला तर तुमची रिअ‍ॅक्शन काय असती ?>>>>> अहो चप्पल घातलेल्या पायावर जरी कोणाचा पाय पडला तरी कळवळायला होतंच.पण गर्दीत it happens असंच म्हणायला लागते

नीधप तुमच्या पायावर असा कुणाचा पाय पडला तर तुमची रिअ‍ॅक्शन काय असती ?>>>>> अहो चप्पल घातलेल्या पायावर जरी कोणाचा पाय पडला तरी कळवळायला होतंच.पण गर्दीत it happens असंच म्हणायला लागते>>>
सभ्य लोकांत 'sorry' म्हणायची पद्धत असते, पण इथे "एवढीही सहनशक्ती नाही का?" "it happens" अशी पद्धत आहे.
आणखी काही पर्याय असतिल तर यादित अ‍ॅड करा...

चमडीगिरीच्या मेसेज बद्द्ल सहमत. ९ दिवस देवी-देवी करतात आणि बाकी वर्षभर विसरतात हे लोक्स

मुळातच सोशल मिडीया विशेषतः फेसबूकवर स्टुडंट लोकांचा भरणा आहे. अडनिड्या वयातील अर्धवट ज्ञान, विषयाच्या गांभीर्याची जाणीव नसणे, यातून बर्‍याचशा ग्रूप्सवरही अतिशय हीन दर्जाचे जोक्स, कैच्याकै प्रश्न आणि त्यावरचे कमेंट्स हरे राम!!
भरीला भर म्हणून राजकारणी पक्षांचे समर्थक, जात धर्म यावरील टिप्पणी... वारागणिक बाबा, बुवा, संत, देव, देवी यांचे फोटोज वर लाईक करा लक मिळेल नाही केलेत तर फोटोतील पपू रागावतील असे पोस्ट्स!! संवेदनाशील बातमीवर तयार केलेले पाचकळ जोक्स. उदा. नुकताच वाघाचा हल्ला झालेला फोटो फिरतोय...

फेसबूक हे अशा स्टेट्स आणि चॅंटींग व्यतिरिक्त ही वापरता येतं हे यांच्या गावीही नसतं...

अवांतर खूप झालं आता धाग्याशी निगडीत... आशूचँपने सांगितलेल्या अर्थाची पोस्ट आहे ती... त्यात मला काहीच गैर वाटलं नाही. उलट देवकी यांनी म्हटल्याप्रमाणे अवेळी आलेल्या पावसाने चिखलातून, थुंकी, खकार्‍यातून, काचा, गंजक्या पत्र्याचे तुकडे, खिळे यातून भेगाळलेल्या अनवाणी पायांनी चालणे म्हणजे... असो.
श्रद्धा व्यक्तीपरत्वे बदलते पण जर तिचा आपल्याला, आपल्या घरच्यांना, आजूबाजूच्यांना त्रास होत असेल तर खरंच अशा श्रद्धेचा अट्टाहास योग्य आहे का याचा विचार प्रत्येकानेच करावा. बाकी सोशल मिडीयावर व्यक्त होण्याबाबत!! प्रत्येक सोशल नेटवर्कींग साईटवर नियमावली असते. त्यापैकी कितीजणांनी ती वाचलेली असते, वापरात आणलेली असते ते अकाऊंट धारक जाणो आणि मदत समिती जाणो.

लहानपणी आमच्या बिल्डींगमधील एक मित्र फारच गोरा होता. बोले तो, गोरी चमडी !
त्यावरून आम्ही त्याला चमडी हे नाव पाडले होते.

त्यानंतर काही वर्षे जावी लागली, मला किंवा आम्हाला, योग्य त्या वयात येऊन, चमडीगिरीचा योग्य तो अर्थ समजायला ..

पण आजही हाक मात्र त्याला आम्ही चमडी असेच मारतो,
कारण त्याचा जो खरा अर्थ समजला, त्यानुसारही मेला तो तसाच आहे Happy

अवांतर - असे मेसेज जे बनवतात किंवा हिरीरीने फॉर्वर्ड करतात बहुतांश वेळा तेच मेले या चमडी कॅटेगरीतले असतात असा आजवरचा अनुभव !

अहो चप्पल घातलेल्या पायावर जरी कोणाचा पाय पडला तरी कळवळायला होतंच.पण गर्दीत it happens असंच म्हणायला लागते>>>>>>>>>> अग्निपंख, आपल्या पायावर कोणाचा पाय पडला की सहसा ती व्यक्ती सॉरी म्हणतेच.पण मग तिचा अवघडलेपण जाण्यासाठी it happens म्हणावच लागतं.मधले वाक्य न लिहिल्याने गैरसमज झाला .

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
मानल तर देव नाहीतर दगड... भारत देशात भक्तीला अनन्य साधारण महत्त्व दिल आहे, अस असताना कोणाच्या श्रद्धेवर टीका कशी करता येईल? प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते... तास नसत तर मंदिरासमोर कधी लाईन दिसलीच नसती.. देवाच्या जत्रेत-यात्रेत कितीतरी लोक हरवतात, च्न्गारून जातात तरीही यात्रा दरवर्षी भरतेच ना?
नीधप तुम्ही फारच modern विचारांचे आहात बहुतेक उपकाराचा प्रश्न येतोच कुठे?
लेख लिहिण्याचा उद्देश वेगळा आहे... जर चमडीगिरी पुरुषांना उद्देशून बोलले आहे तर तो मेसेज माझ्या वाचनात कसा आला?
मी लेख लिहिला ते माझ वैयक्तिक मत होत... बिचार्या भक्तांना काही बोलूच नका..
Happy

<जर चमडीगिरी पुरुषांना उद्देशून बोलले आहे तर तो मेसेज माझ्या वाचनात कसा आला?>

बरोब्बर.

कळायला लागल्यापासून आजवर कित्येकांना 'हसावे की रडावे तेच कळत नाही' असे म्हणताना ऐकलेले होते. मला कधीही त्या विधानाचा अर्थ समजू शकायचा नाही. एखाद्या गोष्टीवर हसावे की रडावे असे पार परस्परविरोधी प्रश्न कसे काय पडू शकतील माणसाला, असे वाटायचे. पण आज पटले. असे खरंच वाटू शकते.

सामान्य वाचक..... धन्य आहे.... कोणाची?... अहो प्रतिसादातून तरी नीट कळू द्या हो...

बेफिकीर.... हसायचं आणि रडायचं ? अहो तुम्ही बरच लिहिता इथे, प्रतिसादही देता... मग विरोधाभास दर्शवणारी एकही गोष्ट किंवा एकही मत तुम्ही अजूनपर्यंत कधीच वाचल वा पाहिलं नाहीत?

जर चमडीगिरी पुरुषांना उद्देशून बोलले आहे तर तो मेसेज माझ्या वाचनात कसा आला?><<< पण तो मेसेज ? तुमच्या मैत्रीणीला कुणीतरी फॉरवर्ड केला होता ना??

dreamgirl शी अगदि सहमत.
व्हॉटसऍप, फेसबुक आणि श्रद्धा यांचा तसाही काही संम्बंध नाही. फार मनावर घेवु नका. सोशल नेटवर्कींग साईटवर सगळेच 'भावना' समजुन लिहीणारे वा पाठवणारे नसतात .

पण तो मेसेज ? तुमच्या मैत्रीणीला कुणीतरी फॉरवर्ड केला होता ना??
>>>>
मैत्रीण म्हणजे पण पुरुष नाहीच.. Wink

अ‍ॅक्चुअली पॉईंट बरोबर आहे त्यांचा, जर हा मेसेज स्त्री-पुरुषांच्या कॉमन ग्रूपवर पडला नसेल आणि त्यांच्या मैत्रीणीला पर्सनल चॅटवर आला असेल तर पाठवणार्‍यालाच धन्य म्हणायला हवे.

तसेही चमडी हा शब्द मला पर्सनली असभ्य वाटतो, स्त्री-पुरुष कॉमन ग्रूपवरही हा मेसेज कोणी सेंड करायला नको.

खूप आभार ... ऋन्मेssष (कोपी पेस्ट नाही केल तुमच नाव) खरच मला प्रतिसादाचा अर्थ कळत नव्हता ... Happy

नसेल कळत बिच्चारीला. आमच्यात स्कीन स्पेशालिस्टला चमडी म्हणतात. चमडी नाही तर कातड्या. नवीन लेखक पाहून उगंच पाठी लागालेत सगळे.

इथले प्रतीसाद वाचून अर्थाचा अंदाज आला,आधी मीपण हा शब्द वाचून पहिला अर्थ कवडीचुंबक दमडी दमडीसाठी मरणारा माणूस असा काढला होता.
असे जंक मेसेज खोडून टाकावे. मेमरी पण बरीच वाचते आणि मित्र मैत्रिणींचे खरे मेसेज निवांत विना अडथळा वाचता येतात.