जग तुलाही जिंकता येईल हे

Submitted by जयदीप. on 25 September, 2014 - 22:37

धूर होउन संपणे सोडून दे
तू स्वतःला फुंकणे सोडून दे

मित्र यादी पाहणे सोडून दे
तू स्वतःला फसवणे सोडून दे

माणसे परखायला चुकतोस तू
मुखवट्यांना वाचणे सोडून दे

बघ जरा.... झाला कसा आहेस तू
आरशाला टाळणे सोडून दे

साजरे कर घेतलेले श्वास तू
राहिलेले मोजणे सोडून दे

प्रश्न जर मिटवायचे असतील तर
उत्तरे पडताळणे सोडून दे

जग तुलाही जिंकता येईल हे
शक्यता नाकारणे सोडून दे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसे परखायला चुकतोस तू
मुखवट्यांना वाचणे सोडून दे << छान संदेश >>

छानच

साजरे कर घेतलेले श्वास तू
राहिलेले मोजणे सोडून दे

प्रश्न जर मिटवायचे असतील तर
उत्तरे पडताळणे सोडून दे

जग तुलाही जिंकता येईल हे
शक्यता नाकारणे सोडून दे<<<<

व्वा !व्वा !

साजरे कर घेतलेले श्वास तू
राहिलेले मोजणे सोडून दे

प्रश्न जर मिटवायचे असतील तर
उत्तरे पडताळणे सोडून दे

जग तुलाही जिंकता येईल हे
शक्यता नाकारणे सोडून दे<<< व्वा

आत्ता पुन्हा वाचताना लक्षात आले >>आरशाला टाळणे सोडून दे << ही ओळही आशय अगदी थेटपणे व्यक्त करत आहे खयालात दर्द देखील पुरेपूर आहे . मी स्वतः ही वेदना आयुष्यात प्रत्यक्ष भोगून पाहिली असल्याने फार कासावीस व्ह्यायला झाले शेर लक्षात घेताना ..असो शेर छानच !! वा!!

शेवटच्या शेरात पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द ही असा योजून ओळी आशयासाठी कंटीन्यू राखत शेर पूर्ण केल्यास अधिक क्लीअर होईल का असा एक विचारही मनात आला आहे

तसेच श्वासांच्या शेरात तशी फारशी गरज नसताना मला घेतलेले आणि राहिलेले ह्या शब्दांची अदलाबदल करण्याची व मग शेर कसा होईल हे पाहण्याचीही हुक्की आली आहे हेही सांगावेसे वाटत आहे Happy

असो Happy