माझी मराठी संस्कृती

Submitted by kavita gore on 25 September, 2014 - 05:50

माझी मराठी संस्कृती

आहेच गोड माझी मराठी संस्कृती
देते क्षणाक्षणाला जगण्याची स्फूर्ती,
सकाळी दाराबाहेर सुंदर रांगोळी
मनात रुजणा-या गाण्याच्या दोन ओळी,
सारवलेले अंगण,अन्  तुळशीचे वृंदावन
प्रेमाच्या धाग्यात गुंतलेले कोवळे मन,
संध्याकाळी देवघरात लागणारा दिवा
अन् आजी -आजोबा काका- काकी
या  नात्यांमधला गोडवा,
माजघरातील मातीची चूल
अन् चार पावलांवर दुडू दुडू धावणार मुल,
नाकात नथ अन्  डोक्यावर पदर
नव्वारी साडीतली ती लाजरी नजर,
सदरा -धोतर, फेटा अन् मस्तकी टिळा
शेतातली काळीमाती बोलावते मला,
अन्यायाविरुद्ध लढण्याची
शिवरायांची शिकवण
अन् अख्या महाराष्ट्राला जाग   करणा-या
बाळासाहेबांची आठवण,
मराठी संस्कृती म्हंटल कि आठवत…
माझ आठवणीनी भरलेल गाव
गावाकडे नेणारी वात्सल्याची धाव,
गावच्या मंदिरातली ती गणरायाची मूर्ती
देते क्षणाक्षणाला जगण्याची स्फूर्ती,
मग आहेच ना  गोड
माझी मराठी संस्कृती.

कविता गोरे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्त