परिपूर्ण एकटेपणा

Submitted by बावरा मन on 22 September, 2014 - 08:27

जी ए कुलकर्णी यांच्याबद्दल आणि त्यांच्या एकांतप्रियतेबद्दल बद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत . मुंबई पुणे सारखी जागा सोडून त्यांनी धारवाड या छोट्या जागी राहणे पसंद केले . त्याना भेटायला अनेक लोक राज्याच्या कानाकोपर्यातून यायची . त्यांना ते फारस आवडायचं नाही . म्हणून ते बाजूला खेळणाऱ्या मुलाला बोलावून त्याला घराला बाहेरून कुलूप लावायला सांगत आणि स्वतहा आत बसून राहत . एका creative genius ची फ़क़्त एक लहर म्हणून त्याकडे बघतात का ? मुळात तुमचा हक्काचा एकांत मिळवण्यासाठी तुम्हाला जी ए सारख creative genius असणेच आवश्यक आहे का ? अनेकदा १० ते ५ नौकरी करणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांची पण ती गरज असतेच की . हि गरज दाबून बहुतेक लोक जगतात .

मी एका nuclease मध्यमवर्गीय कुटुंबातल अपत्य . एकुलता एक मुलगा . आई बाबा दोघेही नौकरीला . त्यामुळे मला लहानपणा पासूनच एकटे राहावे लागले . पण माझ आणि एकटे पणाच भन्नाट जुळून आल . एकटे पणा आणि त्यातून येणार स्वातंत्र्य मला जाम आवडल . नंतर नंतर तर मला आजू बाजूच्या गर्दीचा जाचच होऊ लागला . शाळेतून पटकन घरी पटकन कधी येतो अस मला व्हयाच . फ़क़्त गणित आणि विज्ञान मध्ये चांगले मार्क येणे म्हणजे हुशार अश्या भंपक कल्पना असणाऱ्या शाळेत असाही जीव घुसमट करायचा . नंतर शिक्षणासाठी बाहेर गावी आल्यावर मी होस्टेल मध्ये राहायला लागलो . पण एका रूम ची एवढी छोटी जागा ३ लोकांनी शेयर करायची हि कल्पना मला रानटी वाटली . म्हणजे तुम्ही कधीही काहीही करत असलात तर किमान चार डोळे , दोन खिडक्या आणि एक दरवाजा ते बघत असतो हे मला तरी inhuman वाटायचं . मुंबई मधल्या लोकल प्रवासासारख . होस्टेल मध्ये बरीच धमाल केली असली तरी मी माझी स्पेस कायम मिस करायचो . जेंव्हा मला पहिला जॉब मिळाला तेंव्हा मी लगेच flat भाड्याने घेतला . आणि तिथे एक टीवी . माझ्या पगाराचा निम्म्याहून जास्त हिस्सा भाड देण्यात जायचा पण प्रत्येकाला आपली स्पेस घेण्याची किंमत चुकवावी लागते .

आतापर्यंत माणुसघाणा म्हणून माझी बर्यापैकी बदनामी झाली होती . नातेवाईक 'तू आमच्याकडे येतच नाहीस ' म्हणून माझ्या नावाने ओरडायचे . पण सगळ्या नातेवाईक नि जमून काही धार्मिक विधी करायचे , एकमेकांची package विचारायची , कुणाची एकाची ठरवून क्रूर पणे खेचायची आणि इतर बर्याच निरर्थक गोष्टी फ़क़्त पिढ्यान पिढ्या चालू आहेत म्हणून करायच्या या गोष्टीं मध्ये मला रस नव्हता . म्हणजे मी एकटा असताना काही भव्य दिव्य करायचो अशातला भाग नाही पण मला माझी पुस्तक , माझा टीवी , आणि माझा परिपूर्ण एकटे पणा जास्त आवडायचा . आम्ही मित्र ट्रीप ला गेलो कि २ दिवस तरी घरापासून दूर राहायचो . तेंव्हा पण मित्रांसोबत धमाल करून झाली की मी एक तास तरी beach वर माझ एकटेपणा शोधण्यासाठी निघून जायचो .

लग्नानंतर माझ्या या मनमुराद एकटेपणावर गदा आली . तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात . नंतर नंतर या एकटे पणा पायी मी माझ्या जवळच्या मित्राना अतिशय क्रूर पणे कटवायला लागलो . आणि माझी मला च या अतिरेकाची जाणीव झाली . आणि मी माझ्यात थोडे बदल केले . पण ते फ़क़्त जवळच्या लोकांसाठीच .

आपल्या समाजात एकटे राहण्याबद्दल आणि हक्काने स्वतःची स्पेस घेण्यार्या लोकांबद्दल काही जबरी गैरसमज आहेत . म्हणजे एखादा माणूस एकटा राहात असेल तर आजू बाजू च्या लोकाना ह्याच्या आयुष्यात काही तरी tragedy असेल असा समज होतो . म्हणजे एकट राहणे हे by choice असूच शकत नाही अस काही वाटत असेल काय ? स्वतःच्या स्पेस बद्दल भारतीय समाजा इतका उदासीन समाज दुसरा नसेल . आपल्या लोकाना कायम उत्सवप्रिय , गलबल्यात राहाण्याच brainwashing झाल असत कि काय असा प्रश्न पडतो . म्हणजे खूप लोक परिस्थितीमुळे (आर्थिक आणि सामाजिक ) स्वतःची स्पेस नाही घेऊ शकत हे मान्य पण ज्याना शक्य आहे ते पण आपली मुलभूत गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात का हा प्रश्न आहे . आपण एकटे झालो म्हणजे समाजाच्या सुरक्षा चक्राबाहेर आलो . आपण लोकाना भेटायला नाही गेलो तर आपल्याला प्रसंगात कुणी येणार नाही या भावनेने अनेक लोक आपली स्पेस नाकारून पुन्हा लोकांच्या घाण्यात इच्छा नसताना घुसतात (वैयक्तिक sample survey मधून काढलेला निष्कर्ष : त्यामुळे बरोबर असेलच याची खात्री नाही ) एकटे राहणे ज्या समाजाच्या चौकटीत बसत नाही तिथे आपण misfit आहोत हि भावना कधी कधी बळावते . सतत स्वतःची स्पेस नाकारण्याचे काही वैयक्तिक / सामाजिक परिणाम होऊ शकतात का ? आपल्या समाजात स्वतःची स्पेस घेणाऱ्या लोकांवर ठप्पे मारणे समाज थांबवेल का ?
समाज नावाच्या जनावराशी मुकाबला करणे मुळातच अवघड . झु मधल्या प्राण्यांसारखे compartment करून श्रेण्या देणाऱ्या समाजात तर ते अजूनच अवघड .

मुळात स्पेस ची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते . वयाच्या तिसाव्या वर्षी माझी स्वतःची एक व्याख्या आहे ( ३ वर्षापूर्वी ती drastically वेगळी होती ) माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सहमत आहे तुमच्या मताशी. +१
मल ही असा वीकेन्द घालवयला आवदेल फ़कत बीअर येवजी मला फ़न्नता वह्ह्ह मस्त मज़्ज़ा येइल.
बरेच दिवस ज़ले असा फ़्रीदम नहि एन्जोय केला Happy

मस्त लेख. फक्त एक दुरूस्ती. धारवाड हे पुण्यासारखंच मोठं शहर आहे. सर्वच अर्थांनी.

बाकी, एकटेपणा आम्हालादेखील अतिप्रिय. Happy

अगदी माझ्यासारखंच. फक्त स्वताची space जपताना आपण कुणावर अन्याय करता कामा नये (specially जोडीदाराबरोबर) . म्हणजे आपल्याला आपला एकटेपणा जपायचाय म्हणून सगळी जबाबदारी त्याच्यावर / तिच्यावर सोपवायची हे चूक आहे .
मी हि माझा एकटेपणा असाच एन्जॉय करते . लोक मलाही नावं ठेवतात . फक्त माझी एकटेपणा एन्जॉय करायची पद्धत वेगळी आहे .

नाही पटला लेख.

टीव्ही हवाय, फास्ट नेट पण हवय. म्हणजे सभोवतालच्या समाजाशी e-संबंध हवेच आहेत. मग एकटेपणा कसला?

privacy म्हणायचे आहे का तुम्हाला?

माधव .. माझाही same प्रश्न आहे. TV , फास्ट नेट ह्यात एकटेपणा कसला ? वरचा लेख म्हणजे जबाबदार्या टाळण्याचा पळपुटेपणा वाटतोय .

तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात .

>> बायकोला लग्नाआधी तुमच्या स्पेसविषयीच्या गरजेची स्पष्ट कल्पना दिली होतीत का?

. माझ आणि माझ्या बायको च शेयारिंग अतिशय उत्तम आहे . Consultant असल्याने मी घरीच असतो आणि आम्ही दोघ अक्षरशः २४ तास एकत्र असतो आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही बोलत असतो . पण मला काही वेळ माझा एकट्याचा लागतो आणि ती मला देते . एकूण सगळ उत्तम आहे . पण मूळ लेखाचा मुद्दा तो नाही अस मला वाटत .

तंतोतंत माझीच परिस्थिती वर्णन केलीत. मी सध्या हॉस्टेलवर रहातो. पण जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा बाईक काढून लोणावळ्यातल्या डोंगरद-यांमधे माझे काही फिक्स स्पॉट आहेत जेथे कुणीच येत नाही, त्याठिकाणी जाऊन मस्त निसर्गाच्या सानिध्यात माझा एकांत, माझी स्पेस, मी एन्जॉय करतो. कधीकधी वाटतं कुठेतरी घनदाट जंगलातच घर बांधून रहावं. माझं दहावीपर्यंत मित्रांशिवाय पान हलायचं नाही, पण जसं वाचनाचं व्यसन जडलं , तसं तसं एकांतात विचार करत बसणं आवडू लागलं. या स्वभावामुळे बरीच माणसं तुटली याची कुठेना कुठे खंत आहेच, परंतु एकांतातला आनंद अवर्णनीय...

चांगलं लिहिलय बावरा मन. Happy
मी तुमच्या एकदम उलट होतो किंवा आहे असं म्हणता येइल पण मलाही एकांत जरा जास्त "ट्राय" करुन बघायचाय. मध्यंतरी असाच मी काही कारणानी एकटा होतो तर सरप्राईजिंगली एकदम छान्/रिफ्रेशिंग वाटलं.
एकांतीच आवड ही मला वाटतं जन्मजातच असावी कारण मला आठवतय तसं मी कधीही एकांतात रमलो नाही. इन फॅक्ट एक दोन मित्र होते तुमच्या सारखे जे स्वतःच्या स्पेसला (रीडः झोपेला) महत्व द्यायचे तेव्हा जाम वैताग यायचा.

अरे क्रिकेट खेळायला ५ जणं जमलेले असताना, मैदानाच्या समोर घर असताना भोxxच्या मला जरा झोपायचय काय म्हणतोस? इकडं दोनच्या टीमनी काय डबल बॅटिंग अन डबल बॉलिंग करायची? की नंबर लावून खेळायचं?

अशा स्वभावामुळे नातेवाईकांमध्ये तसं नाव बरं आहे माझं पण कधी कधी शीण येतो (आजकाल).

स्वतःला स्पेस नाकारल्याबद्दलच्या परिणामांबद्द्ल विचार करताय ते एका दृष्टिनी चांगलं आहे. इतरांच्या प्रेशरमुळे सतत जर तुम्ही स्वतःला हवी असलेली स्पेस नाकारायला लागलात तर कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकेल.
तुम्ही तुमच्या आप्तांशी नीट सॉर्टाऊट करुन घेतलय हे ही एक बरं आहे कारण मग सारखं आपल्या स्पेस मध्ये राहायचे सुद्धा वाईट परिणाम आहेत. आपल्या जवळच्या लोकांची (बायको/नवरा) आपल्याला वाटते त्यापेक्षा खुप जास्त गरज असते. ती गरज लक्षात येई पर्यंत कधी कधी खुप उशीर झालेला असतो.
I guess to strike the right balance is important. It is cumbersome but important. Happy

छान लेख, पटला, आवडला.

टीव्ही हवाय, फास्ट नेट पण हवय. म्हणजे सभोवतालच्या समाजाशी e-संबंध हवेच आहेत. मग एकटेपणा कसला?
privacy म्हणायचे आहे का तुम्हाला?
>>>>>>>
माझ्यामते हा एकांत म्हणजे प्रायव्हसी नक्कीच नाही. कारण ट्रेनच्या गर्दीतही आपल्या बरोबर कोणी ओळखीचे नसल्यास हा एकांत मिळतो. कारण त्याजगदुनियेची दखल घेण्यास तुम्ही बांधील नसतात.

तेच आपल्या ओळखीचे कोणी आपल्याबरोबर असेल तर हा एकांत संपतो. भले मग तुम्ही त्याच्याशी सतत गप्पा मारत राहायची गरज असो वा नसो, पण त्याचे अस्तित्व जाणवत राहते आणि त्याची दखल घेणे गरजेचे असते.

निसर्गवेडा... same पिंच . मला पण वाचनाचं वेड आहे . काही पुस्तके तर तुमचा life कडे बघण्याचा point of view बदलून टाकतात . मला पण असाच जंगलात किवा हिमालयात शांत एकांत जागेत जावून रहावसं वाटतं जिथे माणसांचा कोलाहल , disturbance नसेल .

@मोहिनी..पटतय...मी सुद्धा एकदाची ही कामं संपली की एक महिनाभर, अज्ञातवास पत्करून राहूनच येणारय एखाद्या जंगलात...

मस्त लिहिलंय. आणि हे असं असतं हे अगदी जवळून पाहिलंयही. नवरा आणि काही प्रमाणात लेकही सेम असेच एकटं रहायला आवडणारे.

टीव्ही हवाय, फास्ट नेट पण हवय. म्हणजे सभोवतालच्या समाजाशी e-संबंध हवेच आहेत. मग एकटेपणा कसला? >>>> नाही माधव.. या लोकांना इतरांची गरज भासत नाही. म्हणजे जेवढ्यास तेवढा लोकांशी संपर्क आला तर चालतो पण त्यापलिकडे मित्रमैत्रिणींची गरज भासत नाही. They can enjoy their own company.

मस्तच.......मला हा ले़ख वाचून खूपच बर वाट्ल.......... म्हणजे माझ्यासारखी अजुनही माणसे या जगात आहेत ज्याना कधीकधी फक्त स्वतःची कम्पनी एन्जॉय करावीशी वाट्ती .........:)

माझंही थोडंफार तुमच्यासारखंच आहे.
मित्र-मैत्रिणींना कटवण्याइतकं नाही तरी मला रोज किमान तासभर तरी अगदी एकटं रहावंसं वाटतं. म्हणजे घरात कुणी नको असं नाही पण त्यांनी मला काहीही सांगू-विचारु नये, डिस्टर्ब करु नये असं वाटतं. मोबाइलही तासभर सायलेंट ठेवते.
तसंच सकाळी उठल्याबरोबर जर घरात आवाज, बडबड, दंगा असला की अगदी इरिटेट होतं..
ज्ये.ना. असले तर त्यांना हे सगळं अति विचित्र वाटतं..
पण मला लोकांना भेटायचा वगैरे कंटाळा येत नाही, उलट आवडतंच. २-४ दिवस घरी पाहुणे आलेलेही आवडतात, फक्त त्यातून तासभर "टाइम प्लीज" घेऊन बाहेर पडावंसं वाटतं. सहसा हे पाहुणे झोपल्यावरच जमतं..
आणि असं सगळं असुनही लोक मला "सोशल" समजतात कारण हे सगळं त्यांना माहीतच नाही....:)

मुळात स्पेस ची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते . वयाच्या तिसाव्या वर्षी माझी स्वतःची एक व्याख्या आहे ( ३ वर्षापूर्वी ती drastically वेगळी होती ) माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे .>. अगदी अगदी. बीअर असेल तर तंदुरी चिकन हवे नसेल तर साबुदाणा खिचडी आणि दही. आणि एखादे दमदार पुस्तक. मी परवा एका वीकांताला असेच एकट्याने कोबाल्ट ब्लू वाचले. मध्येच तास भर काँक्रीट शांत झोप काढली. मला लोकांशी बोलायचे म्हनजे संकटच वाटू लागले आहे. भलभलत्या लोकांसाठी उगीचच वेळ द्यावा लागतो, ते घरी बोलवतात नाही येत म्हटले तर घरी येतात वर त्यांनी केलेले काहीतरी गचाळ घेउन येतात आपल्यासाठी, मग फुकट गप्पा मारा. कॉफी करून द्या त्यांना. जी ए तर थोर आदमी पण एकटेपणा हवा असतो कायम.

गौरी देशपांड्यांच्या विंचुर्णीचे धडे मध्ये पण त्यांना एकदम घरी गावी एकटे राहवे असे वाटू लागते मग त्या बस पकडून येतात वाटेत रम पिक अप करतात व सूर्यास्ताकडे ग्लास उंचावून तो रेशमी एकटा क्षण अनु भवतात ते फार छान लिहीले आहे. मुळातूनच वाचा.

@अमा - कसलं भारी . आणि अशा एकांतात कोबाल्ट ब्लु म्हणजे व्हिस्की मध्ये सोडा . गौरी देशपांडे ची कथा वाचावी लागेल लवकरच

मस्त लेख!
>> आपल्या लोकाना कायम उत्सवप्रिय , गलबल्यात राहाण्याच brainwashing झाल असत कि काय असा प्रश्न पडतो
अगदी!
मी एवढा विचार केलेला नाही पण एकंदर मलाही एकटेपणा आवडतो. म्हणजे उगाच चार लोकं करतात म्हणुन ते करण्यात मला रस नाही. प्रवासात तर हे फारच जाणवतं. मला पाहिजे तिथे, पाहिजे तितक्या वेळ निवांत बसता आलं नाही तर त्या ठिकाणी जाउन काय उपयोग?! जेंव्हा काही कलीग युरोपात कामाला जातात आणि 'एकटा होतो' या कारणासाठी इकडे-तिकडे फिरत नाहीत तेंव्हा मला खरच त्यांच कारण कळत नाही.