या घरास अंगण नाही

Submitted by जयदीप. on 21 September, 2014 - 06:11

या घरास अंगण नाही
या मनास कुंपण नाही

ते रिते रितेसे असते
त्या घरास घरपण नाही

ते तळ्यात पाहत बसते
त्या नभास दर्पण नाही

दुःख हिंडल्यावर कळते
की सुखास वणवण नाही

खूप शोधल्यावर कळले
त्या मनात हा खण नाही

खेळ संपल्यावर कळते
'मी' कशास कारण नाही?

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली

हे ,ते , या , त्या , असे शब्द तुमच्या गझलेत वरंवार येतात तुमच्या गझलेत त्यांची गझलभर पेरणी मला व्यतिशः कमी रुजते . आपण याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावात अशी विनंती

मला दर्पण सर्वाधिक आवडला

छान

दर्पण, कारण छान.

हा, ही, ते, त्या, हे असे एकाक्षरी शब्द गझलेत येवू नयेत असे नाही. मात्र, बहर छोटा असेल तर ते जरा खटकते. तसेच, या एकाक्षरी शब्दांतून काही निराळा अर्थ काढता येत असेल तर मात्र ते अधिक खुलून दिसतात. अर्थात हे सर्व सांभाळणे तसे अवघडच. तरीही तुमचा प्रयत्न छान. बहर मोठा घेतला असतात तर पटकन लक्षात आले नसते. असो. पुलेशु.

मनापासून आभार सर्वांचे

Happy वैभव सर : प्रयत्न करीन या पुढे शक्यतोवर असे शब्द (एकाक्षरी) न येऊ देण्याचा

जोशी सर : धन्यवाद Happy बहर मोठा असता तर जाणवले नसते +१