फडे

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

fadaa1.jpg

पुण्याला आमच्याकडे तीन गॅलर्‍या आहेत. एका गॅलरीत आम्ही झाडे लावलीत. कुंडीतील गाळ फरशांना चिकटून राहतो. इथली माती लाल आहे. आमच्याकडे अकोल्यात मातीचा रंग असा आहे की लगेच आठवण होते - काळ्या मातित मातित तिफण चालते. तो गाळ बघून मी केरसुनी घेतली पण केरसुनी ओलीचिंब होऊन आठ दिवस सुकवत ठेवावी लागली. एक खराटा होता त्यानीही गाळ निघत नव्हता. आई म्हणाली फडा घेऊन ये.

मी मंडईत हरेक गल्ली .. हरेक बोळ फिरलो पण कुठेच फडा मिळाला नाही. काही जणांना विचारुन पाहिले की इथे फडा कुठे मिळेल तर मुळात फडा म्हणजे काय हेच इथे कुणाला ठावूक नाकी. आमच्या शेजारी गेलो ते मराठवाड्याचे आहेत त्यांनाही हा फडा कसा असतो माहिती नव्हत. एक शेजारी रत्नागिरीचे आहेत त्यांनाही माहिती नव्हत. अनायाचे अकोल्याला जाणे झाले. गाडीतून खाली उतरत नाही तर समोरच एक फडेवाली बाई दिसली. तिला बघून खूप छान वाटल आणि तिच्याकडून तिथल्या तिथेच दोन फडे विकत घेतले. ४० रुपये जोडी.

आमच्याकडे टोपली, फडे, सुप ह्या तिन्ही गोष्टी आम्ही दिवाळीला आणि लग्नाकार्याला विकत घेतो. त्याची पुजा करुन मगच त्या वापरायला लागतो. माझी आई पोळ्या भाकरी कधीकधी वाटीभर भाजी देखील दुरडीत ठेवते. पुण्याला अशा दुरड्या मिळतच नाही.

अकोल्याहून पुण्याला मी फडे घेऊन गेलो. एका फटक्यात गाळ निघून गेला. आमच्या वरचे शेजारी कुतुहलाने हातातील फड्याकडे बघत होते. मग मी तिथल्या लोकांना फडा कसा असतो ह्याची ओळख करुन दिली.

आमच्याघरी केरसुनी हा अलिकडला प्रकार घरी आलेला आहे. अकोल्यात आम्ही फडेच वापरतो. केरसुनीचे कण कण कित्येक दिवस खाली सांडत असतात. फडा घर अंगण ओटे ओसरी नाहणी सगळ्या घराची स्वच्छतेला उपयोगी पडतो. त्यातुलनेनी केरसुनी अगदी नाजूक आहे. खरटा फक्त पाने गोळा करायचा उपयोगी आहे. असो. फडा विकत घेऊन त्याची पुजा करुन घरात लक्ष्मी आली असे म्हणतात. पण फडा हा पुलिंगी आणि लक्ष्मी ही स्त्रिलिंगी. पण तरीही फड्याला जुन्या बायका लक्ष्मी माणतात. आपण नाही का संत ज्ञानेश्वराला माऊली म्हणत तसेच आहे आहे. पण बुद्धीमान लोकांना ह्यावर विश्वास बसणार नाही. अशावेळी अंधश्रद्धाळू होणे मला आवडते. फडा घेऊन घरदार लखलख झाले मी तन मन प्रसन्न होते. दरवेळी लक्ष्मी म्हणजे पैसा सोने हेच नव्हे. मनाची शांती ही सुद्धा लक्ष्मीचीच देण आहे. पण अगेन.. हे बुद्धीमान लोकांना पटणार नाही. त्यांचे असे आहे ना की. .बळी गेलेली बकरी ही श्रद्धेमुळे बळी गेली म्हणून आंकात असतो. आणि पोटात मांस गेले की ते अन्न म्हणून गेलेले त्यांना चालते. पण दोन्ही गोष्टीमुळे शेवटी एक जीव जातो ना.. असो. ही शेवटची दोन वाक्य विसंगत जरी तरी लिहावीशी वाटली म्हणून लिहिली. मनातील फड्यानी ती काढून टाका.

fadaa2.jpg

विषय: 
प्रकार: 

शुध्द कापसाच्या वाती म्हणजे आपल्या नेहमीच्याच वाती ना>>> बी, तुला फुलवाती, निरांजनामधल्या वाती, लामणदिव्यामधल्या वाती, नंदादीपामधल्या वाती यापैकी नक्की कुठल्या वाती हव्या होत्या? या सर्व वाती शुद्ध कापसाच्याच असतात.

दूर्वा मोफत कशाला हव्यात? देवाला वहायच्या होत्या ना? मग पैसे देऊन विकत घ्याव्यात. भल्यापहाटे बायामुलं कुठूनकुठून दूर्वा तोडून आणतात त्या मोजून् त्याच्या जुड्या बांधतात त्यांना त्या कष्टाचा मोबदला मिळायला नको?? आपल्या गावी मोफत दूर्वा मिळत असतील तर त्या सर्वत्र मिळायलाच हवा असा अट्टहास का???
चेन्नईमध्ये भाजी घेतली की कढीपत्त्याची एक भली मॉठी टहाळी फ्री देतात, मुंबईपुण्यात देत नाहीत. सिम्पल.

Lol मग पुण्यात किती टक्के कापसाच्या वाती मिळाल्या? आणि उरलेले टक्के काय मटेरियल होते?

बी या कारणावरून तक्रारी करतोयस! कमाल आहे तुझी!

१०० % कापूस म्हणजे काय?

आम्ही पुण्यात नेहमी जिथे वाती विकत घेतो तिथे तरी कापसाच्या वाती असतात.
दोर्‍याच्या वाती पण मिळतात.

नन्दिनी+१०००००

बी अरे फुकट मिळालेल्या वस्तुन्ची किम्मत रहात नाही रे. माणसाचे कष्ट पण असतात ना त्या मागे? हातावरचे पोट असणारी ती माणसे-बाया. त्यान्च्याकडुनही फुकटाची अपेक्षा करतोस, कमाल आहे!

हॉटेल किन्वा सिनेमाहॉल मध्ये घासाघीस करु शकशील का?

कापसाच्या वाती तेलात पटकन भिजतात.

सुती कापड आणि टेरीकॉट कापड मधे जसा फरक आहे ना तसा फरक असतो दोन्ही वातीमधे. आम्ही नेहमी कापसाच्या वाती वापरतो पुजेला म्हणून हा फरक लगेच कळतो. ह्या वाती तळहातावर लगेच मळून नीट करता येतात. नक्कीच फायदे जास्त आहेत १०० टक्के कापसाच्या वातीचे.

माझी तक्रार नाही मी फक्त सांगत आहे.

बर बाबा सगळं काय ते तुलाच माहितीये. तू पुण्यात येऊन अडाणी पुणेकरांवर उपकारच केलेस म्हणायचे..

प्लीज गैरसमज नको. तुम्हाला जसे वाटले ना तसे मला मुळीच म्हणायचे नाही. प्रत्येक ठिकाणी काही चांगले काही वांगले मिळत असतेच.

सर्व मित्रांचे अभिप्राय खूप खूप आवडले. वाचत रहा!!!!

कपाशीच्या बोंडातून सरकीच्या बिया हाताने वेगळ्या करून जो मऊसूत कापूस तयार होतो त्याला १००% कापूस म्हणतो आहेस का बी तू? (आणि इथे मिळालेल्या वाती 'मेडिकेटेड' कॉटन च्या/सारख्या होत्या- असं म्हणतो आहेस का?)

वाती कापसाच्याच मिळतात त्यात काही भेसळ असते हे कधीही मी बघितलं नाही. मी नेहेमीच फुलवाती आणि तेलाच्या दिव्याच्या वाती विकत घेते. मी इथला डोंबिवलीतला अनुभव सांगतेय.

सबंध महाराष्ट्रात अकोला शहर हे कापसासाठी प्रसिद्ध आहे. आमच्याकडे आम्ही पराटी, सरकी किंवा रुई (रु सुद्धा म्हणतात) म्हणतो. कवि विठ्ठल वाघांनी कापसाला पांढरे सोने म्हंटले आहे. आमच्याकडे कापूस विपुल प्रमाणात पिकतो. आमच्याकडच्या गाद्या, उशा, दुलया, लोड इतर कुठेच मिळणार नाही. आमच्याकडे जुना कापूस आणि नवा कापूस असे दोन कापसाचे प्रकार मिळतात.

पुण्यात ह्या कापसामधे काहीतरी मिळावलेल होत. मला पारख आहे कापसाची कारण बालपणापासून कापसाचे पिक पाहिलेले आहे. घराजवळच मिल्स होते कापसाचे. एकदा तिला आग लागली तो आगीचा डोंब देखील आठवतो. चार दिवस ती आगा विझली नव्हती. पक्षी होरपळून मेलेत. अकोल्यात कापशी म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे. तिथला तलाव प्रसिद्ध आहे.

मी स्वतः कापूस वेचलेला आहे. आमच्याकडची कुडाची घरे पराटीपासूनच बनलेली असतीत.

बी च्या म्हणण्यात अगदीच तथ्य नाहीये असे नाही. आजकाल मेडिकेटेड कापुस देखील बाजारात चोरुन विकला जाऊन, त्याच्या वाती बनवतात. ( खुद्द दुकानदारानेच सान्गीतलेय हे) मात्र तसा पटकन ओळखु येतोच असे नाही. जून्या घरी आम्ही घरासमोर अन्गणात सरकीचे बी पेरले होते, असला मस्त कापुस आला होता. पण चिमण्या फार झडप घालायच्या त्याच्यावर, घरट्याकरता.

चांगली माहीती दिलीय.
(तुमचं अकोल्याला नेहमी जाणं होत असेल तर येताना भरपूर फडे घेऊन येणं शक्य होईल का ? मायबोलीवर छोटी जाहीरात देऊन त्यात विक्रीला ठेवता येइल. दिवाळीला चांगली विक्री होईल असं वाटतं)

त्याला रॉ कापसाच्या वातींबद्दल म्हणायचे असेल. सरकीचा झाडावरुन काढलेला कापूस वेगळा दिसतो. बाजारातल्या वाती ब्लीच्ड सर्जिकल कॉटन पासून बनवलेल्या असतात असं त्याला म्हणायचं असेल.

बी म्हणतात ना माझ्या धाग्याला प्रतिसाद मिळत नाहीत, आता बघा फडे काय दुर्वा काय कापूस काय कुठुन कुठे चाललाय!!! आता खुश असतील प्रतिसाद बघुन. ( स्मित )

या धाग्याचे नाव फडे असे आहे का? मी ते "फंडे" असे वाचले.
मला वाटले नव्या धाग्याचा विषय कसा निवडयाचा, त्याचे वेगवेगळे 'फंडे' वाचायला मिळतील पण धागा वाचुन अमळ निराशा झाली.
Super sad

आमच्याकडे माहेरी आणली जाते केरसुणी लक्ष्मीपुजनाला मग,दोन एक दिवस आई दारापुढचा छोटा पॅसेज झाडते प्रथा म्हणून आणी न.न्तर ती कामवालीला देते.. याने मातिचे, सारवलेले घर सरसर झाडली जातात पण, फ्लॅटस मधे याचा तितकासा उपयोग नाही..
(बाकी वैदर्भिय लोक आपल तेच खर करण्यात आणी मानण्यात धन्यता मानतात असा माझा का.ना विशयी अनुभव आहे)
बी पुढच्या वेळेस कापुस विदर्भातुन " बोलावुन घे"

नाही प्राजक्ता तुमचा आणि इथे इतरांचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मला पुण्याला कमी वगैरे लेखायचे नाही आहे. जी गोष्ट मला अकोल्यात अगदी सहजपणे मिळते ती पुण्यात मिळत नाही. प्रयत्न करुनही मिळत नाही. म्हणून मी हा लेख लिहिला. आमच्याकडे बारोमास हे फडे मिळतात. फक्त दिवाळी द्सर्‍यालाच नाही. कित्येक गोष्टी अकोल्यात नाही मिळत ज्या पुण्यात मिळतात. म्हणून मी अकोल्यालाही कमी लेखत नाही.

नाही प्राजक्ता तुमचा आणि इथे इतरांचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मला पुण्याला कमी वगैरे लेखायचे नाही आहे. जी गोष्ट मला अकोल्यात अगदी सहजपणे मिळते ती पुण्यात मिळत नाही. प्रयत्न करुनही मिळत नाही
>>>
ऊदाहणार्थ ??

Pages