फडे

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

fadaa1.jpg

पुण्याला आमच्याकडे तीन गॅलर्‍या आहेत. एका गॅलरीत आम्ही झाडे लावलीत. कुंडीतील गाळ फरशांना चिकटून राहतो. इथली माती लाल आहे. आमच्याकडे अकोल्यात मातीचा रंग असा आहे की लगेच आठवण होते - काळ्या मातित मातित तिफण चालते. तो गाळ बघून मी केरसुनी घेतली पण केरसुनी ओलीचिंब होऊन आठ दिवस सुकवत ठेवावी लागली. एक खराटा होता त्यानीही गाळ निघत नव्हता. आई म्हणाली फडा घेऊन ये.

मी मंडईत हरेक गल्ली .. हरेक बोळ फिरलो पण कुठेच फडा मिळाला नाही. काही जणांना विचारुन पाहिले की इथे फडा कुठे मिळेल तर मुळात फडा म्हणजे काय हेच इथे कुणाला ठावूक नाकी. आमच्या शेजारी गेलो ते मराठवाड्याचे आहेत त्यांनाही हा फडा कसा असतो माहिती नव्हत. एक शेजारी रत्नागिरीचे आहेत त्यांनाही माहिती नव्हत. अनायाचे अकोल्याला जाणे झाले. गाडीतून खाली उतरत नाही तर समोरच एक फडेवाली बाई दिसली. तिला बघून खूप छान वाटल आणि तिच्याकडून तिथल्या तिथेच दोन फडे विकत घेतले. ४० रुपये जोडी.

आमच्याकडे टोपली, फडे, सुप ह्या तिन्ही गोष्टी आम्ही दिवाळीला आणि लग्नाकार्याला विकत घेतो. त्याची पुजा करुन मगच त्या वापरायला लागतो. माझी आई पोळ्या भाकरी कधीकधी वाटीभर भाजी देखील दुरडीत ठेवते. पुण्याला अशा दुरड्या मिळतच नाही.

अकोल्याहून पुण्याला मी फडे घेऊन गेलो. एका फटक्यात गाळ निघून गेला. आमच्या वरचे शेजारी कुतुहलाने हातातील फड्याकडे बघत होते. मग मी तिथल्या लोकांना फडा कसा असतो ह्याची ओळख करुन दिली.

आमच्याघरी केरसुनी हा अलिकडला प्रकार घरी आलेला आहे. अकोल्यात आम्ही फडेच वापरतो. केरसुनीचे कण कण कित्येक दिवस खाली सांडत असतात. फडा घर अंगण ओटे ओसरी नाहणी सगळ्या घराची स्वच्छतेला उपयोगी पडतो. त्यातुलनेनी केरसुनी अगदी नाजूक आहे. खरटा फक्त पाने गोळा करायचा उपयोगी आहे. असो. फडा विकत घेऊन त्याची पुजा करुन घरात लक्ष्मी आली असे म्हणतात. पण फडा हा पुलिंगी आणि लक्ष्मी ही स्त्रिलिंगी. पण तरीही फड्याला जुन्या बायका लक्ष्मी माणतात. आपण नाही का संत ज्ञानेश्वराला माऊली म्हणत तसेच आहे आहे. पण बुद्धीमान लोकांना ह्यावर विश्वास बसणार नाही. अशावेळी अंधश्रद्धाळू होणे मला आवडते. फडा घेऊन घरदार लखलख झाले मी तन मन प्रसन्न होते. दरवेळी लक्ष्मी म्हणजे पैसा सोने हेच नव्हे. मनाची शांती ही सुद्धा लक्ष्मीचीच देण आहे. पण अगेन.. हे बुद्धीमान लोकांना पटणार नाही. त्यांचे असे आहे ना की. .बळी गेलेली बकरी ही श्रद्धेमुळे बळी गेली म्हणून आंकात असतो. आणि पोटात मांस गेले की ते अन्न म्हणून गेलेले त्यांना चालते. पण दोन्ही गोष्टीमुळे शेवटी एक जीव जातो ना.. असो. ही शेवटची दोन वाक्य विसंगत जरी तरी लिहावीशी वाटली म्हणून लिहिली. मनातील फड्यानी ती काढून टाका.

fadaa2.jpg

विषय: 
प्रकार: 

हा अजुन जुना झाला की चुन्यानं वाड्यातल्या घराच्या भिंती रंगवायला पण उपयोग होतो. पुण्यातपण मिळतात साळुते, फक्त त्याला फडे म्हणत नसतील (साळुतेही म्हणत नसतील).

बाकी सश्रद्ध, अश्रद्ध, बुद्धीप्रामाण्यवाद, बुद्धीमान ह्यात खुप गोंधळ झाला आहे बी तुझा (आणि तो गोंधळ घालणे) तुझा हक्क आहे असेही मला वाटते).

लेख छान.

तेच तर आमच्याकडे जिमखान्यावर घरी पण यायच्या नाहीतर पोस्ट ऑफीस समोर. इतका काही हार्ड टु गेट रीजनल स्पेशालिटी असलेली वस्तू नाही आहे. आता रुंबा चा जमाना आहे.

लेख चांगला आहे.
पण मंडईत केरसुणी मिळाली नाही हे अशक्य! मंडईच्या वाटेवरच तर कितीतरी विक्रेते बसलेले असतात. भाजीचे, फळांचे स्टॉल जे लावतात ते हीच केरसुणी वापरतात. खुद्द मंडईत एक भागच आहे या वस्तू- झाडू, केरसुण्या, खराटे, सुपल्या, सुपं मिळायचा. हां, बोलीभाषा निराळी असल्यामुळे गोंधळ झाला असेल. त्यासाठी हा जो फोटो वर लावला आहेस तोच मोबाईलवर सेव्ह करून मंडईत दाखवायचा. लगेच योग्य दुकान सापडलं असतं!
पुढच्या वेळी लक्षात ठेव, फोटो बरोबर ने. पण पुण्यात मिळालं नाही असं म्हणू नकोस! Wink

कोल्हापुरात साळुता म्हणतात हे वर लिहिल आहेच.
गजाननने वर मुडगा देखील सांगितलय.

बायका एखाद्या हट्टी पोराला निलाजरा ह्या अर्थाने "मुडग्यासारखं झालयस" असे बोलताना ऐकले आहे लहाणपणी. Happy
शाळा शेणाने सारवणार्‍या पोरांना हा साळुता आधार वाटत असे गावाकडे. डायरेक्ट हाताने सारवायच्या ऐवजी साळुत्याने शाळा सारवायची.

पण मंडईत केरसुणी मिळाली नाही हे अशक्य! >>> अहो , बी केरसुणी नाही तर फडे मिळाले नाहीत म्हणतोय.
खरतर हे प्रकरण आधी पाहिलं होतं पण त्यालाच फडे म्हणतात हे बी मुळे कळलं. मला वाटायचं माणसाला प्रत्येक वस्तु तोकडी करण्याची सवय आहे तशी केरसुणीही तोकडी केली असेल . Proud

असले झाडू पुण्यात न मिळायला काय झालंय. हल्ली जास्त कुणी वापरत नाहीत म्हणून सगळीकडे नसतील , तुळशीबाग / मंडई /बोहरी अळी इ. मधे मिळायला हवेत.
बाकी हा लेख आला नसता तर या झाडूच्या आठवणीने कोणी उसासे सोडेल यावर विश्वास बसला नसता Happy

मला हल्ली वाटायला लागल की पुणे शहर नावालाच मोठ आहे. ज्या गोष्टी मला हव्या असतात त्या इतक्या सहजपणे मिळतच नाही. मला शुद्ध कापसाच्या वाती आणि मोफत दुर्वा मिळाली ह्यावेळी Sad लोक भाव तर अजिबात करत नाही.

>>बाकी वाती काय हल्लि नायलॉनच्या असतात का? Lol

म्हणजे 'जेनेटिकली मॉडिफाइड नसलेल्या कापसाच्या' म्हणायचं असेल! Happy

( वरच्या वाक्यानंतर दातविचकी काढायची होती, पण आजकाल मायबोलीवर भावनादर्शकमुंडकीपण जपूनच टाकावी लागतात. :P)

भावनादर्शकमुंडकीपण >> Wink तू चामुंडेसारखी भावनादर्शकमुंडकी गळ्यात घालून डोळ्यासमोर आलीस. नको टाकूस भावनादर्शकमुंडकी Happy

भाव करायच्या दोन पद्धती आहेत. एक दर कमी करून मागणे. आहे त्या दरात जास्त माल मागणे. मोफत दुर्वांत भाव करायचा म्हणजे आणखी दुर्वा त्याच मोफत भावात मागायच्या.

>> आणखी दुर्वा त्याच मोफत भावात मागायच्या.
असं असं.

बरं झालं, मलाही समजलं आणि इथेही चार पोस्टी जास्त पडल्या. नाहीतर पुन्हा बीला वाटेल की त्याचा धागा म्हणून लोक लिहीत नाहीत.

नागपूर ला असतांना फडे दिसायचे. पुण्यात नाही आणि इथे उसगावात तर साधा झाडू पण दिसत नाही .. Sad
धन्यवाद जुनी आठवण अगदी फ्रेश झाली .

तुझ्या शेजारच्या मराठवाड्यातल्या लोकांना फडा शब्द कसा काय माहीत नाही. बाकी किती दिवसांनी फडा बघितला. साळुता, माळी हे नवीन शब्द कळले.

मी एक शब्द लिहिना नाही आणि सगळा अर्थच बदलला. परत लिहितो आणि मिसलेला शब्द हायलाईट करतो:

मला हल्ली वाटायला लागल की पुणे शहर नावालाच मोठ आहे. ज्या गोष्टी मला हव्या असतात त्या इतक्या सहजपणे मिळतच नाही. मला शुद्ध कापसाच्या वाती आणि मोफत दुर्वा मिळाली "नाही" ...ह्यावेळी अरेरे लोक भाव तर अजिबात करत नाही.

बी, तुला शोधता येत नाही म्हणून पुण्यात वस्तू मिळत नाही असे नाही. मंडईत आणि आजूबाजूच्या परिसरात सगळ्या पारंपरिक वस्तू मिळतात.
तुमच्याकडे म्हणतात तोच शब्द प्रत्येक वस्तूला पुण्यात का वापरतील लोक? पुण्यात काहीतरी वेगळा शब्द असेल हे तुझ्या लक्षात येतंय का?
आम्ही पुण्यात याला केरसुणी म्हणतो. लक्ष्मीही म्हणले जाते, लक्ष्मीपूजनाला पुजलेही जाते. दिवाळीच्या आधी हे विकायला दारावर लोक अजूनही येतात. अर्थात नवीन वाढलेल्या पुण्यात नाही तर गावभागात, पेठांमधे येतात.
पूनमनेही तेच सांगितलेय पण पुण्यात काहीच्च मिळत नाही ही रेकॉर्ड चालूच आहे तुझी.

नवीन आहे ते जोडपे म्हणून कदाचित ह्या जुन्या गोष्टी नसतील पाहिल्यात.>> नवे जोडपे जुन्या झाडूची चौकशी कशाला करायला जाईल. जादुई दिवस असतात हे. संसार मुरला की मग पायपुसणे झटकणे, कोळीष्टके काढणे, घराची उस्तवार महत्वाची वाटू लागते.

लेख चांगला आहे.
पण मंडईत केरसुणी मिळाली नाही हे अशक्य! मंडईच्या वाटेवरच तर कितीतरी विक्रेते बसलेले असतात. भाजीचे, फळांचे स्टॉल जे लावतात ते हीच केरसुणी वापरतात. खुद्द मंडईत एक भागच आहे या वस्तू- झाडू, केरसुण्या, खराटे, सुपल्या, सुपं मिळायचा. हां, बोलीभाषा निराळी असल्यामुळे गोंधळ झाला असेल. >>>>+१

शुध्द कापसाच्या वाती म्हणजे आपल्या नेहमीच्याच वाती ना? कि अजुन काहितरी वेगळे असते?

Pages