जरा जगू दे जीवना...

Submitted by मयुरेश साने on 19 September, 2014 - 04:04

जरा जगू दे जीवना
तिला स्मरू दे जीवना

तुझा पुरावा पाहिजे
जरा हसू दे जीवना

मरून हिरवा गार मी
असा ऋतू दे जीवना

खरा खुरा माणुस हवा
खिसा नसू दे जीवना

नको सुचाया श्वासही
असे मरूदे जीवना
.....मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा जगू दे जीवना
तिला स्मरू दे जीवना......वाह वा वा !

मरून हिरवा गार मी
असा ऋतू दे जीवना..... ये ब्बात !