फुरसत

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 January, 2009 - 04:25

जीवन हे आहे धकाधकीचे
मन पण सदा धगधगतच आहे.
जवळ असलेल सार काही
क्षितिजासमान भासत आहे.

आज नाही उद्या घोषवाक्य
मौलिक सुख सरकवत आहे.
तडजोडीचे बिजच जणु
तना-मनामध्ये रुजत आहे.

फुरसत ही लाख मोलाची
आयुष्याशी झगडत आहे.
विश्रांती हा शब्दच जणू
शांत शांत झाला आहे.

गुलमोहर: 

जागु तुझ्या या कवितेला मी मनापासून दाद देत आहे.

जागु,
खरच चांगली लिहली आहेस कविता
माझीही मनापासुन दाद.
************
आपला अमर..... Happy

जागु, मस्तच लिहिली आहेस. आपली सगळ्यांची आयुष्य अशीच झाली आहेत.

अगदी सत्य परिस्थिती आहे ही......फार छान मांडली आहे...

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

Good, once in a while stop and smell flowers, look at the sky for colours, and look around
what you have. Stop thinking about what you don't have.

-Harish

तिन्ही कडवी अगदी तंतोतंत सर्व मनांची दखल घेणारी. छान.