श्री. एकविरा देवीची खोळ पडली.

Submitted by प्रभा on 13 September, 2014 - 13:36

आमच्या येथे म्हणजे अमरावतीला मध्यंतरी एक ऐतिहासिक घटना घडली.येथील अंबादेवी व एकवीरा देवी प्रसिद्धच आहेत. काही दिवसापुर्वी म्हणजे २७ ता. ला श्री. एकवीरा देवी मंदिरात जोरात आवाज झाला. काय झाले म्हणुन सगळे बघायला आलेत व देवी पडली म्हणुन ओरडु लागलेत.. गुरुजींना बोलावल. शास्त्री आलेत.. नीट पाहिल तेव्हा कळल कि देवीची खोळ पडली. . त्यातुन १६ चांदीचे डोळे निघालेत .म्हणजे ८ वेळा शेंदुराचा लेप दिला असावा असा सर्वांचा अंदाज. सध्या जे वयोव्रुद्ध आहेत त्या कुणालाच लेप दिल्याच माहिती नाही. आतमधे मात्र एकदम वेगळीच देवी आहे. काळ्या पाषाणाची. सहजासनात बसलेली, चतुर्भुज हातात त्रिशुल, गदा व तलवार आहे एक हात आशिवादाच्या स्थितीत आहे.. नविन, मुळरुपात नवरात्रा पुर्वी प्रगट्ली म्हणुन मंदिरात आनंदोत्सव साजरा झाला.. हा काय प्रकार आहे कळत नाही.. लेप का दिला असेल? माते तुझा महिमा अगाध. एवढच म्हणु शकतो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या मूर्तीचे आत्ताच नव ( शेंदूर नसलेल ) छायाचित्र देता येइल का तुम्हाला? अमरावतीत काही काळ माझ बालपण गेलय. या जुळ्या मंदीराशी लहानपणीच्या अनेक आठवणी जुळलेल्या आहेत. मूर्तींना शेंदूरलेपन का करतात कुणास ठाउक. मूर्तींचे सारे सौंदर्य, शिल्पकारांची कला यांच्या अनुभवाला आपण मुकतो. या मंदीरात एक हात जोडून उभी अशी मारुतीची मूर्ती आहे. मी फार पूर्वी पाहीली होती तेव्हा सहज लक्षात येत होत की अरेच्या ! हे तर शिल्पकारानी मारुतीच बालरूप घडवल आहे. चेहर्‍यावर अगदी निरागस हसू व भाव असणार अस छोट्या मुलासारख दिसणार मारुतीच रूप क्वचितच कुठे पहायला मिळेल. पण नंतर अनेक वर्षांनी शिल्पकाराचा हा सगळा कलाविष्कार शेंदूराच्या आड लपून गेला होता.

त्यातुन १६ चांदीचे डोळे निघालेत .म्हणजे ८ वेळा शेंदुराचा लेप दिला असावा असा सर्वांचा अंदाज.
?????
काही समजले नाही हे

मूळ मूर्ती आता दिसू लागली का ? छानच झाले.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळावरचे कोरीवकाम पण असेच दिसू लागले. तोपर्यंत त्यावर चुन्याचे थरावर थर दिले जात असत.

ऋन्मेषा,
१६/२=८
असं गणित आहे.

तुझं गणित पण कच्चं आहे रे बाबा!

एकदा शेंदूराचा कोट दिला की दोन चांदीचे डोळे चिकटवायचे असं लोक करतात.

एकवीरेला किती हात असतात? गूगलवर इमेज पाहिली त्यात ८ दिसत आहेत.

शेंदूर का लावायचा असतो? समजा काही कारणाने लावला तरी अधून मधून काढून कोमट पाण्याने स्वच्छ करायला काय हरकत आहे? एवढी पुटं चढल्यावर त्याचा साचा तयार होऊन गळून पडला असणार.

शेंदूर एक अर्चन द्रव्य म्हणून लावले जात असेल किंवा दगडाच्या मुर्तीवर तेल अर्पण केले जात असेल तर मुर्तीवर तेलाचा परिणाम होऊ नये म्हणून लावला जात असेल. पण शेंदुरातल्या शिश्याचा परिणाम होत नसेल का?

अश्विनी, दगडाला शेंदूर लावल्याशिवाय त्याचा देव होत नाही.
'अमुक तमुकला शेंदूर लावणे ' हा वाक्प्रचार ऐकला नाहीस का?

साती मॅडम, दोनाचा पाढा बे साती Light 1 चौदा पर्यंत शिकलो आणि मी शाळा सोडली Wink
मला बे आठी सोळाचेच काहीतरी प्रकरण असणार हे समजले होते पण शेंदूराचा लेप दिल्यावर चांदीचे दोन डोळे लावतात याची कल्पना नव्हती.

सोळा डोळे निघाले, आठ वेळा लेप, म्हणजे थर किती जाडीचा असावा. मूळ मुर्तीचा आकार आणि सौंदर्य लोप पावल्यातच जमा. आमच्या इथे शेंदूराचा मारुती पाहिला आहे, साधासाच उभट गोलाकार वाटतो, पण आता वाटते कदाचित त्यामागेही छानशी मुर्ती लपली असावी.

शेंदूराचा भडक रंग, अंधारातही दिसण्याचा गुणधर्म. त्यावर हवामानाचा परीणाम न होणे ही कारणे असावीत.
शिवाय विषारी असल्याने किडा मुंगी लागणार नाही. तेलात भिजवून लावला कि वॉटर प्रूफींग पण झाले.
तसा सहज उपलब्ध असणारा इतर कुठला भडक ( फ्ल्यूरोसंट ) रंग नसावाच.

येथील आधीची मुर्ती साधारण माहुरच्या देवी सारखी -लाल रंगाचा मोठा पण गोल चेहरा होता- सर्वत्र फोटोही तसेच आहेत.. पण आता खोळ पडल्यानंतरची देवी ही काळ्या पाषाणात कोरलेली चतुर्भुज , तीन हातात आयुध व एक हात आशिर्वादाच्या स्थितीत आहे.. चेहरा अगदी नाजुक उभट -कोल्हापुर, तुळजापुरच्या- देवीसारखा दिसतो. . म्हणजे त्या देवी पेक्षा एकदमच वेगळा आहे. खोळ पड्ल्या नंतर ती शिरवली. पण त्यातुन १६ डोळे निघाले. म्हणजे ८ वेळा लेप दिला असावा असा अंदाज. आमच्या सारखे नववृद्ध सोडा [ साठी ओलांड्लेले] पण येथील जे वयोवृद्ध नागरीक आहेत त्यांनाही लेप दिल्याच स्मरत नाही. म्हणजे ही बरीच जुनी घटना असेल, असे लेप का देत असतील तेही वारंवार? अगम्य. कदाचित सतत अभिषेका मुळे दगड झिजु नये किंवा संरक्षण. अस असेल. असो. फोटो मिळाल्यास नक्की देइन. जुना मुखवटा गोल असल्यामुळे आता सोन्याचा नविन बनवित आहेत ''. एकविरा माता कि जय ''

माझ्या लहानपणी आमच्या गावातल्या मारुतीच्या शेन्दराचे कवच असेच स्वतःच्या वजनाने निखळून पडले आणि नुसत्याच बेंगरूळ दगडाऐ वजी मूळ मूर्ती दिसू लागली. तेव्हा मारुती कोपला अशी हूल उठवण्यात आली. अरे मूर्खानो त्याला इतके वर्षे सफोकेशन होत होते त्याचे काय? पागल गधडे... एकदा काय हूल तर मारुती रुसून गेलाय. मग सगळे मूर्ख त्याला आणायला शिवेपर्यन्त डफडे वाजवीत गेले आणि 'घेऊन'आले ...

मी ही त्यात मनगटाने नाक पुशीत सामील होतोच !! ::फिदी:

शिवाय विषारी असल्याने किडा मुंगी लागणार नाही.
<<
हे पटले नाही.
दगडी मूर्तीला किडा मुंगी काय नुकसान करणार?

प्रभा, इथे बातमी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. योग्य त्या अधिकारी व्यक्तींपर्यंत अनौपचारिक रीत्या बातमी पाठवली आहे. Happy

एकदा काय हूल तर मारुती रुसून गेलाय. मग सगळे मूर्ख त्याला आणायला शिवेपर्यन्त डफडे वाजवीत गेले आणि 'घेऊन'आले ...
>>>>
ईंटरेस्टींग,
रुसला समजायला काय झालेले नक्की? आणि घेऊन आले म्हणजे काय जरा समजेल का ..

इथे मायबोलीवर मंजोंच्या भोवतेही डुप्लिएट आयडीची पुटं चढली आहेत.

त्यांची खोळ पडेल तेंव्हा किती डोळे गोळा होतील?

Proud

प्रभा,
इंटरेस्टिंग बातमी.
आमच्या इथे (सातार्‍यात) आमच्या घरासमोरच एक मारुतीचे देऊळ होते. तिथे सर्वसाधारण देवळात असतो तसाच मारुती होता ओबड-धोबड. पण एके वर्षी हनुमान जयंतीच्यावेळी शेंदूर लावताना अशीच शेंदराची पुटं निघून आली.
आतली मूर्ती इतकी रेखीव होती, की बोलता सोय नाही. मग त्या देवळातल्या लोकांनी शेंदूर लावणं बंद केलंय. ओईल पेंटने छान रंगवली आहे मूर्ती आता.
एकविरा देवीचे मूळ रूप पाहण्यास उत्सुक आहे. फोटो मिळाल्यास नक्की द्या इथे.

रुसला समजायला काय झालेले नक्की? आणि घेऊन आले म्हणजे काय जरा समजेल का ..

>>अहो कसलं काय अन फाटक्यात पाय. शेंदराची डिखळे निखळून पडली म्हणजे देव रागावले आणि कपडे काढून निघून गेले असा एकाने अर्थ लावला. पूर्वी खेड्यात काही घडतच नसे.एकदम चाकोरीबद्ध जीवन . शेतावर जाणे आणि येणे. पण चकाट्या पिटणारी मंडळी तेव्हाही होती. मग काहीतरी अफवा उठवणे हे यांचे काम... हाकामारी आली हा एक प्रकार त्यातलाच...

मग देव पाण्याने कोंडणे , रुसलेल्या देवाला आणायला शिवेपर्यन्त जाऊन त्याची समजूत घालून त्याला घेऊन येणे असे काहीतरी करीत राहणे. नन्तर प्रसाद वाटणे.असे बरेच देव रुसलेले म्या बगिटले हायेत. काहीतरी इवेन्टबाजी करणे हे प्रकार तेव्हाही असत पण कधीतरी वर्षा दोन वर्षात. या सगळ्या लफड्यात जास्तीत जास्त २०-२५ लोक असत Happy

रॉ-हूड, धन्यवाद
आणि चांगलेय, तसेही सणांचा मूळ हेतू काय तर समाजातील चार-चौदा लोकांनी एकत्र येणे. अन्यथा प्रत्येकाने आपापल्या घरी देव पुजूनच समाधान मानले असते. तसेच या प्रथांकडेही बघायचे जोपर्यंत यात काही अनिष्ट प्रकार घडत नाही.

काहीतरी इवेन्टबाजी करणे >> काय सही पकडलय राव तुम्ही..

एकविरा देवीचे मूळ रूप पाहण्यास उत्सुक आहे. फोटो मिळाल्यास नक्की द्या इथे. >> + 1

ओईल पेंटने छान रंगवली आहे मूर्ती आता.>> मूर्ती आणि देवळं जशी आहेत तशी राहिली तर लोकांना काय त्रास होतो? ऑइलपेण्ट इत्यादेने रंगवून मूळ सौंदर्याची का वाट लावतात लोकं? त्यापेक्षा पुरातत्व खात्याची मदत घेऊन मूळ स्वरूपातली मूर्ती आणी देवळे मूळ स्वरूपात जपण्याचा प्रयत्न का करत नाहीत?

प्रभा, देवीच्या मुर्तीचे वर्णन वाचुन उत्सुकता वाढलीय. फोटो टाका.

सोन्याचा मुखवटा चढवुन नंतर त्याचे रक्षण करत बसण्याची डोकेदुखी गळ्यात घालुन घेण्यापेक्षा मुखवट्यासाठीचे पैसे वापरुन काहीतरी विधायक कार्य केलेले बरे.

गावात मुलांसाठी शाळा तर असणारच, तर शाळेसोबत व्यवसाय शिक्षण देण्याची किंवा इतर कलांची ओळख वगैरे करुन देण्याची काहीतरी व्यवस्था केली आणि तिथे गावातल्याच जुन्या लोकांना, कलाकारांना, ज्यांनी एके काळी परंपरागत व्यवसाय केलेले पण आता बंद केलेत त्यांना शिकवायला सांगितले तर मुलांना निदान असे काहीतरी आपल्याकडे होत होते याची ओळख तरी होईल.

इथे शहरात पारंपारिक कारिगर या नावाने असे वर्कशॉप्स घेऊन त्यातुन लोक कमाई करतात, शहरी मंडळीही आवडीने असे वर्कशॉप्स अटेंड करतात. काही शिकता आले नाही तरी निदान माहिती तरी मिळते विविध गोष्टींची. तुमच्या परिसरातल्या मुलांना हे ज्ञान फुकट मिळेल. मग भले त्यांनी ते पुढे वापरले नाही तरी चालेल पण निदान ओळख तरी होईल.

साधनाशी सहमत,

एकविरे चे मंदीर अमरावतीला सुद्धा आहे का? मला वाटलं लोणावळा - कार्ला येथे एकच स्वयंभु मंदीर आहे.

प्रसिध्द लोणार ( खार्या पाण्याच सरोवर) येथे सहा फुटी झोपलेला मारोती आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात त्याची खोल उतरवली शास्त्रसंमत पध्दतीने पण काही मिलालं नाही Happy आता ती मूर्ती मारोतीची आहे हे कलतंय. १३० वर्षात मुर्तीवर काही खोल वेगैरे उतरवण्याची घटना घडली नाहीये. साधारण किती वर्षानी ही घटना घडू शकते?

लोणारचा मारुती का? मी आधी चुकून एकवीरा समजले Wink

मध्ययुगीन किंवा थोडी नंतरची मूर्ती वाटते आहे. फोटो समोरून नसल्याने आणखी काही कळत नाहीये

Pages