रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १

Submitted by आनन्दा on 12 September, 2014 - 09:17

सामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली.

प्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू -
आपल्या शरीरात अनेक विजातीय घटत कायम येत असतात. अनेक अनावश्यक गोष्टी चयापचय क्रियांमधून साठत असतात, या विजातीय गोष्टी अनेक प्रकारच्या असू शकतात.. बक्टेरिया, किंवा इतर एकपेशीय जीव, विषद्रव्ये जसे की शिसे वगैरे. अगदी शरीरात विनाकारण साठणारी चरबी देखील याच विजातीय द्रव्यांमध्ये येते. शरीरामध्ये नेहमी ही विजातीय द्रव्ये शोधून बाहेर टाकण्याचे काम चालू असते.
मोडर्न मेडिसिनच्या दृष्टीने रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे रोगजंतूंसोबत लढण्यची शरीराची शक्ती. एक प्रकारे ते बरोबरच आहे. कारण ते देखील एक विजातीय द्रव्यच आहे, आणि शरीर देखील त्याच्याबरोबर लढाच करत असते. आणि त्यामध्ये शरीरातील अनेक यंत्रणा कार्यरत असतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की रोग होतो एव्हढेच मोडर्न मेडिसीन म्हणते.

आरोग्याच्या समांतर शाखांचा दृष्टीकोन मात्र थोडा वेगळा आहे. होमिओपॅथी मध्ये रोगग्रहणक्षमता (susceptibility - संवेदनशीलता) अशी एक संज्ञा आहे. माझ्यादृष्टीने त्याची व्याख्या म्हणजे रोग वेळेवर ओळखण्यची क्षमता. आपण लहानपणी शिकलो त्याप्रमाणे आजारांचे २ प्रकार असतात. (मॉडर्न मेडिसीनप्रमाणे)
१. रोग - जो रोगजंतूंमुळे होतो - उदा. न्युमोनिया, टायफॉईड, इ.
२. विकार - जे शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे होतात.

समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. त्यामुळे उपाय पण त्यावरच केला जातो.

कमिंग बॅक टू रोगग्रहणशक्ती - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे शरीराची विजातीय द्रव्ये योग्यवेळी शोधून बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते, याचाच परिणाम शरीरात रोग निर्माण होण्यात होतो.
आयुर्वेद म्हणतो अयोग्य आहार-विहारांमुळे शरीरात दोष वाढीस लागतात. हे वाढलेले दोष बाहेर टाकण्यासाऱही स्थिती जर शरीराकडे नसेल - म्हणजे
१. अशक्तपणा - पोटात अपचन झालेले अन्न आहे, पण जुलाब करून ते बाहेर टाकण्याची शक्ती शरीराकडे नाही.
२. आत्यंतिक प्रमाणात बिघडलेले राहणीमान - यांमध्ये पहिले दोष बाहेर काढण्यापूर्वीच नवीन पुन्हा शरीरात तयार होतात - जसे की रोज जागरण करणे - जागरणामुळे शरीरात पित्त निर्माण होते. म्हणजेच विजातीय द्रव्ये. ही द्रव्ये शरीरातून बाहेर टाकण्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा जागरण झाले तर मग शरीरात पुन्हा पित्त निर्माण होईल. मग हे पित्त त्याच जुन्या साठ्यात साठवले जाईल.
किंवा ईतरही काही कारणे असतील.

आता गम्मत अशी आहे की केव्हा ना केव्हा तरी शरीराची म्हणजे त्या दोषाच्या शरीरगत स्थानाची(जसे की पित्ताशय) साठवणक्षमता संपणारच. मग अश्यावेळेस शरीरासमोर २ पर्याय शिल्लक राहतात -
१- तीव्र शाररीक क्रिया - जसे की उलटी द्वारे हे पित्त बाहेर फेकून देणे
२. - जर पर्याय १ काही कारणाने शक्य नसेल, काही कारणाने उदा. एखादा माणूस माझ्यासारखा उलटी होऊच देत नाही, तेव्हा मग ते शरीरातच कुठेतरी स्थानबद्ध करणे. (पुन्हा एकदा सांगतो - मी आयुर्वेदाच्या दॄष्टीकोनातून पित्त म्हणतोय. त्यामागे कोणती केमिकल असतात ते मला माहीत नाहीत, पण कोणतीतरी असतात हे नक्की)

शरीर हा दोष स्थानबद्ध करायला निघाले आहे, याचाच अर्थ माझी या दोषाबद्दलची संवेदशीलता आता कमी होत चालली आहे. आता हे साठवायचे कुठे असा प्रश्न आहे - त्याचे उत्तर शरीराच्या बाबतीत सोपे आहे. असा दोष साठवण्याचे २ निकष आहेत
१. शरीराच्या त्या भागाची तो दोष साठवण्याची क्षमता असली पाहिजे.
२. शरीराच्या त्या अवयवाकडे त्या दोषाबद्दल कमी संवेदनशीलता असली पाहिजे - म्हणजे शरीराने पुन्हा सांगेपर्यंत त्या अवयवाने तो दोष बाहेर टाकण्याचा प्रयत्न करता नये.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोटावर साठवली जाणारी चरबी.

परंतु इथेच तर सारी मेख आहे - कारण शरीराच्या कोणत्याही अवयवाची असा दोष साठवण्याची क्षमता अमर्यादित नसते, केव्हातरी त्या स्थानावरचा घडा भरतोच, आणि मग शरीराचा तो अवयव असहकार पुकारतो. उदा. डोकेदुखी - डोके किंवा त्याचे नियंत्रण करणारे स्थान, जिथे हे पित्त साठलेले आहे, ते शरीराला सांगते की माझी क्षमता संपली. एकतर हे पित्त बाहेर टाका, किंवा दुसरीकडे हलवा. शरीर त्याप्रमाणे काहीतरी कृती करते आणि मग डोकेदुखी थांबते.
म्हणूनच आयुर्वेदाकडे २ प्रकारच्या चिकित्सा आहेत.
१ शमन - यामध्ये हा तात्कालिक प्रकारचा दोष शांत केला जातो. काही प्रकारची औषधे घेऊन, जसे की पित्ताची मात्रा, हा दोष तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करून शांत केला जातो.
२. उत्सर्जनः- यामध्ये असा दोष शरीरातून त्याच्या मूळ स्थानी आणून मग उस्तर्जन केला जातो. उदा - पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.
मूलतः या उत्सर्जन चिकित्सेमध्ये औषधोपचारांनी विजातीय द्रव्ये बाहेर टाकली जातात. सामान्यपणे अशी अपेक्षा असते की अश्या प्रकारे शरीरेशुद्धी झाल्यावर शरीराची संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होईल आणि त्यामुळे शरीराचे काम सुरळीत चालू लागेल. तसे झाले नाही तर बहुधा पुन्हा पंचकर्म चिकित्सा करतात.

या सर्व विवेचनामध्ये एक गोष्ट अजून आलेली नाही, ती म्हणजे रोगग्रहणशक्ती - रोगग्रहणशक्तीची माझ्यापुरती व्यख्या अशी, की विजातीय द्रव्य तत्काळ बाहेर टाकण्याच्या शरीरात असलेल्या यंत्रणेत झालेला बिघाड.
आता आपण रोगजंतुजन्य रोगांकडे येउ -
प्रत्येक रोगजंतुचे आपले असे स्थान असते, तो रोगजंतु फक्त त्याच अवयवाला संसर्ग करू शकतो. मग होते असे, की जर एखादा दोष जर त्या स्थानात अगोदरच ठाण मांडून बसला असेल, तर त्या रोगजंतुला आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते. जसे की घश्याला होणारा संसर्ग - वातपित्तकर खाण्यामुळे जर घसा दूषित झाला असेल, तर त्याला व्हायरल इन्फेक्शनसाठी आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते.

म्हणजे असे बघा, पोटात बाहेरून खाण्यापोटातकोणता तरी जीवाणू आला, जर शरीराची संवेदनशीलता चांगली असेल, तर शरीराला जो जीवाणू लगेच कळेल, आणि तत्काळ शरीर कृती करून तो जीवाणू बाहेर फेकेल. पण तसे जर झाले नाही, शरीराची तेव्हाची संवेदनशीलता जर कमी असेल, तर मग तो जीवाणू शरीरात कुठेतरी स्थानबद्ध केला जाईल. स्थानबद्ध केलेला जीवाणू कालांतराने आपली संख्या वाढवून पुन्हा शरीराला अपायकारक होतोच, आणि त्यावेळी तो जास्त संख्येने असल्यामुळे त्याचा प्रतिकार करणे देखील कठीण जाते. आणि मग अश्या वेळेस शमन चिकित्सा करून तो बरा करावा लागतो.
जसे की - उदाहरण आपण टायफोईड चे घेउ - टायफोईड हा आतड्यांमध्ये वाढणारा जीवाणू आहे. त्याला वाढीसाठी जडान्न, किंवा पोटात दीर्घकाळ साठून राहिलेले अन्न उपयोगी पडते. जेव्हा टायफोईड्चा जंतू शरीरात प्रवेश करतो तेव्हा हर आपण आपण मिताहारी, आणि हलका, सुपाच्य आहार घेत असू, आणि आपली संवेदनशीलता जागृत असेल, तर त्यावर वेळीच उपाय होईल, आणि त्या जंतूंना वाढीस संधी मिळणार नाही.
परंतु तसे जर झाले नाही तर,
जर त्या जंतूंना बाहेर टाकले गेले नाही, तर मग ते त्यांच्या स्थानात, म्हणजे आतड्यात स्थानबद्ध होतात. पोटात त्या जंतूंना वाढीस अनुकूल स्थिती मिळाली, तर मात्र ते जोमाने वाढीस लागतात. अश्या वेळेस शरीरची स्थिती देखील त्या जंतूंना बाहेर टाकण्याला अनुकूल नसते, त्यामुळे शमन चिकित्सा करावी लागते. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे टायफॉईड चा उलटणारा ताप. ताप बरा होता होता जर काही कुपथ्य झाले, तर मग टायफॉईड चा दुप्पट जोमाने उलटतो, आणि मग त्याला आवर घालणे कठीण होते. )
आता आयुर्वेदानुसार याची चिकित्सा कशी होते ते पाहू, शरीरातून रोग बाहेर टाकणे शक्य नाही, म्हणजे मग तो शरीरातच संपवला पाहिजे. तो कसा संपवणार? आयुर्वेद म्हणतो, की रोग संपवायचा असेल, तर त्याचे शरीरातील स्थान नष्ट करा, म्हणजे आतडी काढून टाकायची की काय? Smile तर तसे नव्हे. शरीरात जे त्रिदोषांच्या असमानतेमुळे रोगाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे ते पुन्हा समस्थितीत आणून त्या रोगाचे स्थान उद्वस्त करणे. उदा. टायफॉईडच बघू, त्याचे स्थान आहे आतड्यातले न पचलेले अन्न - या परिस्थितीत खालील उपाय संभवतात -
१. लंघन - शरीराला कमीत कमी - अगदी गरजेपुरतेच अन्न द्यायचे, ते देखील अतिशय हलके, सुपाच्य. त्यालाच पथ्य म्हणतात. प्रत्येक आजाराप्रमाणे त्याचे पथ्य बदलू शकते.
२. पाचन - शरीरातील न पचलेले अन्न पचन करून ते बाहेर टाकणे,आणि रोगात निर्माण विजातीय द्रव्यांचे शमन करणे यासाठी वेगवेगळी औषधे, काढे वगैरे दिले जातात.
या दोन उपायांनी शरीरातील रोगाचे स्थानच उध्वस्त झाल्यावर रोग तिथे फार काळ राहू शकत नाही.

आयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे -
ज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं |
ज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं |
बहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे.

तर ही झाली संवेदनशीलता, रोगग्रहणशक्ती, आणि,आयुर्वेदाची पद्धती/ तत्वज्ञान..
पुढील भागात होमिऑपॅथी, आणि योगोपचारांकडे आणि इतर बाजूंकडे एक नजर टाकू.
===============================================================================
डिस्क्लेमर - मी काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही, पण घरात तसे वातावरण असल्यामुळे थोडाफार अभ्यास आहे, त्यामुळे यात त्रुटी नक्कीच राहू शकतात. जाणकारांनी त्या दूर कराव्यात, अशी त्यांना विनंती.
===============================================================================
मी मॉडर्न सायन्सेसचा प्रतिवाद करण्याऐवजी समांतर चिकित्सापद्धती मांडण्याचा मार्ग स्वीकारला आहे, या चिकित्सापद्धतींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, पण या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत आहे.
चु. भु. दे. घे.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@नंदिनीताई
ही समांतर औषध पद्धती फक्त पोट साफ ठेवण्या पुरती उपयोगी आहे.
ही समांतर औषध पद्धती फक्त पोट साफ ठेवण्या पुरती उपयोगी आहे.

आता झापडे कोणी लावली आहेत ते तुम्हीच ठरवा. बाकी तुम्ही केलेल्या व्यक्तिगत पातळीवरील टीकेमुळे मी तुम्हाला उत्तर देणारच नव्हतो, (घरामधेय पसरलेले ज्ञानकिरण शोषून घेऊन लिहिलेले लेख नव्हेत.)पण तुम्ही पुन्हा बोललात म्हणून मला दखल घ्यावी लागतेय.
धन्यवाद, यापुढे मी तुमच्याशी वाद वाढवणार नाही.

पेशंटकडे पे०अर असतेल तर?

का बुवा ?

तुम्ही होमिपथी उपचार केले ना ¿ मग तुमच्याकडेही काही रेकॉर्ड असेलच की.

मी तेच सांगतोय, की मी डॉ. नाही. मी ज्या माणसाला बरे वाटलेले पाहिले आहे त्या माणसाकडे ते रेकॉर्ड असले पाहिजे.

त्तुमच्याकडेच रेकॉर्ड नाहे मग छातीठोकपणे दावा का करताय ?

अधे ते रेकॉर्द goLà करा मग lihàa.

तूमचा हा लेख आरोग्य विभागात आहे की làlit लेखात ? Proud

आररॉग्य विभागात àsel तr puràve रेफेर्न्स लाग्तील.

अन्यथा हा ललित लेख maañaavaa लागेल

Proud

कोणी तांत्रिकदृष्ट्या गफलतयुक्त गझल रचली किंवा गझलेबद्दल एखादे चुकीचे मत ठोकून दिले तर त्याचे खानदान, शिक्षण, अक्कल, अनुभव वगैरेचा उद्धार न करताही आणि अतिशय मैत्रीपूर्ण भाषेतही त्याचे मतपरिवर्तन करता येते. गझलेत केलेली चूक ही आरोग्यास वगैरे घातक नसते. पण जे आरोग्यास घातक ठरू शकते त्याही बाबतीत किंचित सौम्यपणे काही सुचवण्या करणे, चर्चा करणे, मतपरिवर्तनाचा प्रयत्न करणे वगैरे अगदीच अशक्य असते का?

==================

संशोधनाअंती योग्य सिद्ध झालेल्या उपचारपद्धतीवर विश्वास ठेवणे सुरक्षित वाटते.

तसेच, कायदेशीर डॉक्टरांचे मत विश्वासार्ह मानणे हेही सुरक्षित वाटते.

तुम्हाला ललित लेख मानायचा असेल तर माना बापडे. मी काय करू. बाकी लेखाखालचे डिस्क्लेमर आपण वाचलेले दिसत नाही. बाकी मला पुरावे मिळाले तर मी देइनच, परंतु खरेच मोकळेपणाने विचार करायचे असेल तर मी वर दिलेले ते पुस्तक नक्की वाचा. ती तर ऑटिझमची केस आहे. आणि त्या बाईने प्लासिबो पासून सारे प्रयोग करून पाहिले आहेत.

कोणी तांत्रिकदृष्ट्या गफलतयुक्त गझल रचली किंवा गझलेबद्दल एखादे चुकीचे मत ठोकून दिले तर त्याचे खानदान, शिक्षण, अक्कल, अनुभव वगैरेचा उद्धार न करताही आणि अतिशय मैत्रीपूर्ण भाषेतही त्याचे मतपरिवर्तन करता येते. गझलेत केलेली चूक ही आरोग्यास वगैरे घातक नसते. पण जे आरोग्यास घातक ठरू शकते त्याही बाबतीत किंचित सौम्यपणे काही सुचवण्या करणे, चर्चा करणे, मतपरिवर्तनाचा प्रयत्न करणे वगैरे अगदीच अशक्य असते का?
बेफि अभिनिवेश हा कोणत्याही चर्चेला घातकच. तो एकदा चर्चेत उतरला की मग त्याचा केवळ वितंडवादच होतो. याच कारणास्तव मी मॉडर्न मेडिसिनवर टीका टाळली आहे, कारण त्याचे महत्व वादातीत आहे, आणि मी ते इतरत्र एका ठिकाणी लिहिले देखील आहे. मला हवा आहे तो समांतर पद्धतींबद्दल पूर्वग्रहमुक्त दृष्टिकोन, पण आधुनिक शास्त्राच्या पुरस्कर्त्यांकडून तो मिळणे एकंदरीत कठीणच आहे, हे वास्तव आहे. त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही, कारण त्याची देखील काही कारणे आहेत, त्यांची चर्चा मी पुढील काही भागात करेनच.

म्या कशाला मानु ?

तुम्हीच हा लेक आरोग्य व ललित अशा द्९न गटात Taàkalaay.

ये घोड चतुर नै करना. एक पे रहना.. घोडा bolanaà नै तो चतुर बोलना

आनंदा साहेब,
मी माझ्या पदवी अभ्यासक्रमाच्या वेळेस आयुर्वेद किंवा होमियोपाथीचे मामुली अध्ययन करण्याचा प्रयत्न केला. परतू होमियोपाठीचे तत्वज्ञान आधुनिक भौतिक आणी रसायन शास्त्राच्या विरोधात गेल्याने मी त्याचा नाद सोडला. म्हणजे एखादा पदार्थ विरळ केला तर तो जास्त परिणाम कारक होतो हे काही पटेना. आयुर्वेदाचा अभ्यास केला तर मला असे वाटू लागले कि यातील काही तत्वज्ञान आजच्या कालाशी सुसंगत नाही. म्हणून त्या दोन्ही गोष्टी मी सोडून दिल्या. तरीही आजही मी त्या पद्धतींकडे डोळे उघडे ठेवून पाहण्याचा प्रयत्न करीत आहे.
मी पुण्याच्या कमांड रुग्णालयात असताना मुतखडा या रोगाचे साठ रुग्ण आणी पित्ताशयातील खड्य़ाचे पन्नास रुग्ण (जे लष्करी सेवेत होते)पाहिले. यांना शस्त्रक्रिया करायची नव्हती म्हणून त्यांनी मला विचारले कि आम्ही आयुर्वेदिक होमियोपाथीक ई. औषधे घेऊन पाहू का?मी अशा रुग्णांचा तीन वर्षे पर्यंत सोनोग्राफीने पाठपुरावा केला. यांनी आयुर्वेदिक आणी होमियोपथीचे औषध पुण्यातील अत्यंत ख्यातनाम डॉक्टरांची औषधे घेतलेली होती ज्यात डॉ. हबू , वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी, चंद्रशेखर जोशी, खडीवाले वैद्य ई चा सहभाग होता.
दुर्दैवाने एकही रुग्णाचा एकही खडा गेलेला मी पाहीला नाही. त्यामुळे माझ्यापुरते या दोन रोगात या इतर पथीचा फायदा होत नाही असे मी म्हणतो. माझा अभ्यास मोठा आहे असा माझा मुळीच दावा नाही. पण माझ्या समाधानापुरता आहे. त्यामुळे माझ्या काकांना मुतखडा झाल्यावर त्यांची ७५ व्या वर्षी कमांड रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आणी दोन दिवसात ते घरी गेले. आता ते सहस्त्रचंद्र दर्शनाच्या जवळ आले आहेत
अशा तर्हेचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे तरच त्याबद्दल काही खात्रिने सांगता येईल.
मी जेथे व्यवसाय करतो तेथील आयुर्वेदिक आणी होमियोपथीचे डॉक्टर आपल्या मुतखड्या साठी येत असतात. अजून तरी त्यांना स्वतःच्या औषधांचा परिणाम झालेला मी पाहिलेला नाही. ( ते माझ्याकडे परत परत येतात कारण मी कोणत्याही डॉक्टर कडून पैसे घेत नाही)
मी अमुक तमुक माणसाला (मोठ्यामोठ्या स्पेशालीस्ट नि काही होणार नाही असे सांगितले असता) बरे करून दाखविले असे किस्से बरेच समांतर लोक सांगतात. असे सांगून कोणत्याही पाथीचा फायदा होणार नाही त्यांचा होत असावा पण तो धन्द्याचा भाग आहे . ठोस आणी सबळ पुराव्याने सिद्ध करणे आवश्यक आहे

मी दिलेली लिंक पहा.
वैदू लोकांसाठीचा कायदा काय सांगतो ते आहे त्यात.

चर्चा करताहेत इथे! एल ओ एल.

मला हवा आहे तो समांतर पद्धतींबद्दल पूर्वग्रहमुक्त दृष्टिकोन, पण आधुनिक शास्त्राच्या पुरस्कर्त्यांकडून तो मिळणे एकंदरीत कठीणच आहे, हे वास्तव आहे.

..................

माफ करा.

१ अ‍ॅलोपथीमध्ये रोग व औषधे याबाबतीत संबंध प्रस्थापित करायला पॅथॉलॉजी , मायक्रोबाओलॉजी , औषधशास्त्र, मेडिसिन , सर्जरी , फोरेन्सिक मेडिसिन आणि सोशल मेडिदिन हे विषय मदत करतात.

२. आयुर्वेद व होमिओपथीवाल्याना हे सर्वचा सर्व विषय त्यांच्या पॅथीमध्येहीशिकव्वले जातातच.

मग आपले शास्त्र शास्त्रेय कसोटीवर उतरवायला हे लोक मागे का पडतात ?

मॉडर्म मेडिसिन चेच विषय अभ्यासुन वर पुन्हा मॉडर्न मेडिसिन आ.हाला स्मजुन घेत नाही म्हणुन रडारड कशासाठी ?

अभ्यासक्रमांची तथ्यता तपासणे म्हणजे टीव्ही सिरियलींमध्ये एकसंघ तार्किकदृष्ट्या योग्य कथा शोधण्यासारखेच आहे.....

खरे वैद्य असतात, ते योग्य निदान करतात, त्यांचा अभ्यास परिपूर्ण असतो. अनेक वर्षे संशोधन केले आहे भारतातील दिग्गज व्यक्तींनी! आयूर्वेदास आज बाहेरच्या देशातही मान्यता मिळू लागली आहे.आणि कॅन्सर सारख्या ब-या न होण्याच्या स्टेजवरच्या रुग्णासही केमो आणि अत्यंत वेदनापूर्ण उपचारपद्धतीतून सुटका देऊनही बरे होता येणे शक्य होत आहे...

हे काहीजणाना पटणार नाही त्यासाठी त्यानी चालणा-या दुकानांच्या बाहेर डोकावून बघायला हवे.

खरेसर माझ्या होमिओपॅथीच्या लेखात विविध ठिकाणी चालू असलेली संशोधने, दबल ब्लाईंड टेस्ट्स वगैरेचा उल्लेख येइल. तसेचे होमिओपॅथीच्या डायल्युशनच्या सिद्धांताला आता हळु।अळू पुष्टी कशी मिळत आहे त्यावर पण लिहीन. फक्त आता मला थोडा वेळ लागेल, कारण केवळ लेख लिहून भागणार नाही तर सोबत पुरावे देखील द्यावे लागतील. तरीही जर आपल्याला विशेष रस असेल तर वर लिहिलेले पुस्तक वाचा. किंडलवर ४०० रू ला मिळते.

संमि तुमच्या प्रश्नावर मी माझ्या लेखमालेच्या शेवतच्या भागात बोलेन जेव्हा मी या शास्त्राच्या प्रसारापुढील समस्या या विषयावर माझे मत मांडेन. तूर्तास तुमचे हे असे मत असण्यास तथाकथित आयुर्वेविक आणि होमिओपॅथिक डॉ.च कारणीभूत आहेत असे मान्य करतो आणि म्हणूनच मी इब्लिस यांचा राग समजू शकतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आनंदा साहेब
होमियोपथी च्या अभ्यासक लोकांनी आधुनिक वैद्यक शास्त्राच्या दुष्परिणामा (साईड इफेक्ट्स) वर बारा महिने बत्तीस काळ टीका करणे सोडून दिले पाहिजे. हि झापडे काढल्याशिवाय होमियोपथीचा खरा विकास होणार नाही. आपण साधी स्वयंपाक घरातील सुरी पहिलीत तर तिचे केवळ चांगलेच फायदे असतात का? नीट लक्ष दिले नाही तर त्याने पण हात कापतोच ना? मग औषधाचे दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) होणारच नाहीत असे कसे म्हणता येईल. प्रत्यक्षात जर काहीच परिणाम होणार नसेल तरच दुष्परिणामा (साईड इफेक्ट्स) होणार नाही. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसर्याची रेषा लहान करून दाखवणे हा कोतेपणा झाला आणी त्याने कोणीही मोठा होत नाही. जर हा पोथीनिष्ठ पणा टाळला तरच समांतर पद्धतींचा खरा विकास होऊ शकेल असे मला वाटते.

Pages