रिमझिम रिमझिम - रुनझुन रुनझुन

Submitted by बेफ़िकीर on 11 September, 2014 - 05:55

बजता है जलतरंग, प्रीतकी छतपे जब, मोतियोजैसा जल बरसे
बुंदोंकी ये लडी, लायी है वो घडी, जिसके लिये हम तरसे

बादलकी चादरे ओढें है वादियाँ, सारी दिशाए खोयी है
सपनोंके गाँवमे, भीगीसी छाँवमे, दो आत्माए सोयी है

आयी है देखने, झीलोंके आईने, बालोंको खोले घटायें
राहे धुवां धुवां, जायेंगे हम कहां, आओ यही रहजाये

रिमझिम रिमझिम - रुनझुन रुनझुन - भीगी भीगी रुतमे - तुम हम हम तुम

सावनके सुहाने मौसममे!

जेमतेम पावणे दोन किंवा सव्वा दोन दिवस सुट्टी मिळू शकणार्‍या आजच्या काळातही निसर्गाने आपल्यासाठी काही भन्नाट ठिकाणे राखलेली आहेत. ही आहेत पावसाळ्यात जाण्याची ठिकाणे! एक रात्र किंवा दोन रात्री राहायचे असल्यास योग्य अशी गगनबावडा (कोल्हापूरपासून गोव्याकडे ५० किमी) व सादळे मादळे (कोल्हापूरपासून पुण्याकडे १५ किमी) ही दोन ठिकाणे देत आहे. तर त्याच दिवशी परत यायचे असले तर कास पठार चिक्कार झाले. मात्र हे सगळे बाजूला ठेवून जर फक्त लाँग ड्राईव्हची मजा घ्यायची असेल, कुठेही उतरून भिजायचे असेल, जिभेचे चोचले पुरवायचे असतील आणि शहाण्या मुलासारखे सहा सात तासांनी घरी परतायचे असेल तर खाली तीन वेगळी ठिकाणे दिलेली आहेत. मुळशी-घुसळखांब रस्ता, मुळशी-ताम्हिणी रस्ता आणि पुणे-वेल्हे फाटा - वेल्हे - पानशेत - पुणे रस्ता!

करा पावसाळी सफर! एकटे जा, दुकटे जा नाहीतर ग्रूपने जा! फक्त बेशिस्त नको वागायला, आपल्यालाही आणि इतरांनाही मजा येत नाही मग!

ह्या सर्व रस्त्यांवर व ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट चवीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळते. तसेच उपहाराचे पदार्थ व उत्तम चहाही मिळतो. अजून ही ठिकाणे त्या लोकांच्या नजरेला पडलेली नसावीत ज्यांना फक्त अचकट विचकट नृत्ये, कर्कश्श आरडाओरडा, छेडछाड व अतीउत्साही वर्तन ह्यातच स्वारस्य आहे.

गगनबावडा आणि सादळेमादळे येथे राहण्याची उत्तम सोय आहे. मुळशी-ताम्हिणी मार्गातही एक दोन बर्‍यापैकी स्टेची हॉटेल्स आहेत. मुळशी-घुसळखांब हा रस्ता मात्र खास लाँग ड्राईव्हसाठीच, म्हणजे त्याच्यापुरताच! तसाच पुणे-वेल्हेफाटा-वेल्हे-पानशेत-पुणे हाही रस्ता!

आईये बारिशोंका मौसम है
आज फर्माईशोंका मौसम है

वक्त बेवक्त घरसे मत निकलो
हर गली आशिकोंका मौसम है

क्युं लगाते हो प्यारपर पहरे
उम्र है साजिशोंका मौसम है
====================================

गगनबावडा

गगनबावडा १

IMG00480-20110814-1719.jpg

गगनबावडा २

IMG00495-20110814-1735.jpg

गगनबावडा येथील हॉटेलमागील दृष्यः

IMG_0040.JPG

गगनबावड्याच्या वाटेवरील कालवा:

DSCN0881.JPG

इक ऐसा घर चाहिये मुझको:

DSCN0886.JPG

ढगांनी भरलेली गगनबावड्याची दरी:

DSCN0981.JPG

बावडा घाटातील शिवमंदीरः

DSCN0989.JPG

भर पावसातसुद्धा निष्पर्ण राहतो मी:

DSCN0990.JPG

भुईबावडा खिंडः

DSCN1082.JPG

================================================

सादळे मादळे

हॉटेलमधील जुन्या धाटणीची भांडी:

DSCN1149.JPG

सादळे मादळे दरी:

DSCN1175.JPG

सादळे मादळेच्या दुमजली बंगल्यातून दिसणारे मागच्या बाजूचे दृष्यः

DSCN1176.JPG

सादळे मादळे हॉटेलच्या दोनपैकी एक बंगला जेथे आम्ही सहसा राहतो. दुसरा बंगलाही असाच आहे पण त्याला दरीकडची बाजू नाही:

DSCN1187.JPG

बंगला आतून :

IMG00517-20110815-1958.jpg

बंगल्याची वरच्या मजल्यावरील बेडरूम - हिची लहानशी गॅलरी दरीवर असल्यासारखी आहे. :

IMG00524-20110815-1959.jpg

=====================================

कास पठारः

IMG00597-20110828-1249.jpg

======================================

मुळशी - घुसळखांब रस्ता

सभोवतालः

IMG_2665.JPG

मुळशी धरणातून आलेला कालवा:

IMG_2666.JPG

घाट चढल्यावर दिसणारे दृष्यः

IMG_2673.JPG

घाटातील धबधबे:

IMG_2681.JPGIMG_2682.JPGIMG_2690.JPG

घर हो तो ऐसा:

IMG_2691.JPG

या फिर ऐसा:

IMG_2689.JPG

======================================

ताम्हिणी - मुळशी रस्ता

ढगाच्छादीत रस्ता:

IMG_2774.JPG

क्षणात पिवळे:

IMG_2785.JPG

क्षणात हिरवे:

IMG_2786.JPG

==========================================

पानशेत - वेल्हे - पानशेत रस्ता

पानशेत कालवा:

IMG_2707.JPG

पुणे - पानशेत रस्त्यावरील वेल्हे फाट्याने पुढे गेल्यावरचा रस्ता:

IMG_2714.JPG

धानेप कालवा:

IMG_2730.JPGIMG_2731.JPGIMG_2732.JPG

वेल्हे - पानशेत घाटः

IMG_2736.JPGIMG_2738.JPGIMG_2740.JPG

इथे शेवटी ते पाणी आपल्या अगदी जवळ येऊन गप्पा मारून हसून जातं:

IMG_2743.JPG

===========

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामा ! रामा ! रामा ! बेफिकीर अहो माणसाने दुसर्‍याला जळवावे तरी किती?:अरेरे:

धुवाधार पावसात या घाटातुन जावे. एकदा अनूभवलेय मुळशीला जायच्या आधी. म्हणजे पौड रस्त्यावरुन पुढे. आणी लोणावळ्याहून पुण्याला परत येताना. फोटो आणी ठिकाणे तर जबरी आहेत. हॉटेल पण झक्कास.

मला नाही वाटत की मला तरुण पणात इथे जाण्याचा योग येईल, तेव्हा हे क्षण आता परत म्हातारपणात जाऊन अनूभवणार आहे.( पावसातुन घाटात उतरायचे):फिदी:

मस्त! माझाही अतिशय आवडता एरिया आहे. पावसात कमीच जातो आम्ही कारण रस्ते खराब असतात..पण हे फोटो बघून वाटतंय पावसातच जायला पाहिजे!

एक से एक सुंदर फोटोज.
सादळ्या-मादळ्याचे बंगल्याच्या पुढच्या बाजूचे फोटोही टाका शक्य असेल तर. खुप देखणे बंगले आहेत ते.