गुगल क्रोम किंवा दुसरा कुठलाही डिफॉल्ट ब्राऊजर सतत रिफ्रेश होतोय.

Submitted by साधना on 8 September, 2014 - 11:42

गेला आठवडाभर कॉ म्प्युटर त्रास देतोय. कुठलीही साईट बघत असताना अचानक ब्राऊजर रिफ्रेश होतो आणि जे पाहात असते ते सगळे स्क्रिनवरुन नाहीसे होते.

नेटवर सर्च मारुन लोकांनी सुचवलेले सगळे उपाय करुन झाले. क्रोम अनइंस्टॉल करुन फायरफॉक्स वापरले तरी काहीही फरक नाही. कधी एक मिनिटात ब्राऊजर रिफ्रेश होतो तर कधी १५ मिनिटांनी रिफ्रेश होतो . नेट वापरणे मुश्किल झालेय.

तज्ञ मंडळी मदत करा आणि प्लिज सोप्प्या भाषेत मदत करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ५ व्यवस्थित आहे आणी तसेही ती की आहे ते पेज रिफ्रेश करते. इथे माझा क्रोम सरळ आहे ते बंद करुन सर्च ओपन कर्तेय. Sad

स्कॅनिंग केले दोनदा. नो वायरस फाऊंड

क्लीन बूट करून स्कॅन केला पाहिजे.
<<
<<
म्हणजे काय करायच असत.
सविस्तर लिहा म्हणजे आम्हा अडाण्यांना थोडी माहीती मिळेल.

तुम्ही एकादा प्रोग्राम सुरु केला की तो रॅममधे जातो.
काही प्रोग्राम्स टीएसार (टर्मिनेट अँड स्टे रेसिडेंट) असतात.
बेसिकली, व्हायरस मेमरीत बसलेला आहे.
स्कॅनर व्हायरसची हार्ड ड्राइव्हवरची फाइल 'क्लीन' करतो.
कॉम्प्युटर बंद करताना मेमरीतला व्हायरस पुन्हा हार्डडिस्कवर नवी फाईल लिहितो.
कित्येकदा, तुमच्या हार्डडिस्कवरची जुनाट अँटीव्हायरसची .exe इन्फेक्टेड असते.
उपचार,
क्लीन बूट.
सीडीवरून (रीड ओनली) बूट करा. अर्थात विंडोज लोड करा. यामुळे व्हायरस मेमरीत लोड होऊ शकत नाही.
सीडीवरूनच स्कॅन करा.
लेटेस्ट, अन ऑथेंटिक अँटीव्हायरस वापरा. मी एव्हीजी वापरतो. लोकं पैकं देऊन इतरअँटीव्हायरस वापरतात.
या सर्व कार्यक्रमातून व्हायरस सापडायला अडचण नसावी.

Mala ha problem ala hota. Atach १० minute purv१०३६० total security chi speed up utility waparalee. Fast zale mc ani browser