आता कशाला शिजायची बात - लाजो - 'खळ्यात-मळ्यात'

Submitted by लाजो on 8 September, 2014 - 00:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खळ्यात - मळ्यात

--

मायबोलीवरची ही स्पर्धा बघुन मला आमच्या ~ माळीदादा आणि * माळीणताईंची आठवण आली...

~ अगं कारभारणी, जेवण द्येत्येय्स की न्हाई, अगं कवाची भूक लागलिया बघ... पोटातलं कावळंबी आता कोकलुन कोकलुन दमलं..

* अवं... आता काय सांगु तुम्हास्नी, ग्यास संपलाया की हो घरातला... त्या शिरप्यान आणुन न्हाय दिला बदलीचा शिलेंडर अजुन... वर तुमच्या त्या जंगल-तोड विरुद चळवळी मुळं लाकड बी न्हाय मिळतं आता...आन हल्ली लेकरांसाठी घरात कात्रज चं दुध येतया...ना गाई ना म्हशी..शेण नाही की गवर्‍या नाईत, चुलं तरी म्या पेटवु कशी..अन जेवण म्या शिजवु कशी?

~ अर्रर्र... अस्सा प्राब्लम झाला व्हय गं तुझा... चल तर मग बिगी बिगी मळ्यात ... Happy

* आँ Uhoh ....अवं काय पण काय बोलता... अत्ता मळ्यात?? Blush

~ ए, बये... चल गुमान... तेव्हढं तिखट मिठ घे वाईच बरोबर... Happy

* बर बर.....हं चला Happy

~ हे बघ कारभार्णे... ह्या आपल्या मळ्यात एव्हढा भाजी-पाला असताना कशाला हवा तो ग्यास आणि कशाला शिजवायची बात... आज आपण दोघं जेऊया मळ्यात..... Happy

mala07a.jpg

--

मळ्यातल्या भाज्या -

बाळ गाजरं, बाळ मुळे, बाळ पालक, कडधान्यांचे मोड, ब्रोकोलीचे तुरे, सेलेरी चे तुरे, टॉमेटो, काकडी, अ‍ॅव्हाकाडो (हो...आमचा शेतकरी प्रयोगशिल आहे, त्यामुळे मळ्यात अ‍ॅव्हाकाडो ची लागवड करतो आहे Wink ), भोपळी मिरची, इतर आवदतिल आणि कच्च्या खाता येतिल अश्या कुठल्याही भाज्या, कोथिंबीर, लसणीची पात, कांद्याची पात (ऐच्छिक) लिंबाचा रस, मिठ, तिखट्/मसाला, ऑऑ आणि मिरेपूड.

mala14.jpg

क्रमवार पाककृती: 

कृती:

१. भाज्या मातीतुन काढुन स्वच्छ धुवुन घ्या.

२. अ‍ॅव्हाकाडो चे साल काढुन मॅश करा. त्यात थोडा लिंबाचा रस, बारीक चिरलेली भोपळी मिरची (लाल्/हिरवी/पिवळी), कोथिंबीर आणि लाल तिखट/ मिरच्यांचा ठेचा (मी मिडल इस्टर्न स्पाईस ब्लेंड - हरिसा पावडर वापरली आहे), मिठ घालुन एकजीव करा.

३. टॉमेटोचा गर काढुन आणि बारीक चिरा. काकडीच्या बिया/गर काढुन बारीक चिरा. यावर थोडा मसाला (मी ड्राईड मिंट चा चुरा घातला थोडा) भुरभुरवा. मिठ साखर घालु नका - पाणी सुटेल.

४. एका पसरट बोल मधे (किंवा माणशी एक छोट्या बोल मधे) तळाला स्प्राऊट्स घाला. त्यावर टॉमेटो आणि काकडीचे तुकडे घाला.

५. यावर अ‍ॅव्हाकाडो चे मिश्रण नीट पसरा. वेळ असेल तर बोल थोडावेळ फ्रिज मधे ठेवा.

mala00.jpg

६, आता आवडीच्या भाज्या, कडधान्यांचे मोड इ इ यावर रचा. सोबत ड्रेसिंग हवे तर वाटीत ऑऑ + मिरेपूड + मसाला घ्या. मी थोडासा मळ्याचा इफ्फेक्ट द्यायचा प्रयत्न केला आहे. माती साठी मसुरा ऐवजी होलग्रेन बिस्किटांचा थर देखिल लावता येइल (याचा फोटो मग टाकते).

mala06.JPG

७. खाताना आवडत्या भाजीचा तुकडा थोडा ड्रेसिंग मधे बुडवुन मग अ‍ॅव्हाकाडो+ काकडी+ टॉमेटो सोबत खा Happy

mala05b.jpgअजुन एक प्रकार

यात अ‍ॅव्हाकाडो न वापरता घट्ट दही डिपींग साठी वापरले आहे.

mala11.JPG

दह्यातले पाणी काढुन टाका. त्यात आलं + पुदिना + कोथिंबीर + जीरे पूड + मिठ घालुन एकजीव करा.

भाज्यांवर थोडा चाट मसाला भुरभुरवा.

सोबत हवे तर हिरव्या चटणीचा ठेचा घ्या.

mala12.JPG

--

~ कार्भारणे, चुलीला एक दिवस सुट्टी द्या आणि प्रदुषण कमी करायला मदत करा.... Happy

* अधुन मधुन आसं ह्यल्दी खा आन शरीरालाबी तंदरूस्त करा... Happy

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे आणि खाल तेव्हढे
अधिक टिपा: 

१. या सोबत कुठलीही मल्टीग्रेन बिस्किटे / ब्रेड स्टिक्स, बगेत इ इ खाता येतिल.
२. आवडी नुसार वेगवेगळी कॉम्बीनेशन्स बनवता येतिल... क्रिम चीज, फेटा/रिकोटा वगैरे वापरता येइल. रोस्टेड कॅप्सिकम + क्रिम चीझ , लसणीची पात + क्रिम चीझ, लसणीची चटणी + दही ही कॉम्बीनेशन्स पण मस्त लागतिल.
३. बेबी एशिअन ग्रीन्स वापरुन यात टोफू + रेड चिली + लसुण असे डिप आणि ड्रेसिंग साठी सोया सॉस्/स्वीट चिली सॉस वगैरे वापरता येतिल. फ्राईड क्रंची नुडल्स सोबत सर्व्ह करायचे.
४. मी कांदा, कांदा पात वापरली नाहिये पण ती देखिल वापरता येइल.
५. आपल्या आवडीचे कुठलेही हर्ब्स वापरता येतिल.

माहितीचा स्रोत: 
असचं इथुन तिथुन...
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! किती कल्पक आहेस तू लाजो!
पण काकडी टोमॆटोचे गर काढून टाकू नका की.. ते कुठल्यातरी डिपमध्ये मिक्स करून पोटात जाऊ दे. Happy

तै साहेब हे घ्या ____/\____

लिहायची पद्धत बेस्ट आणि डोकॅलिटीपुढे तर आम्ही काही बोलायलाच नको Happy

अरे देवा!! कीती ग हा प्रयोगशील पणा.. आमच्या डोक्यात येत नाही असं कधीच! असं न्यारं नेमकं वेगळं आन छान कसं सुचतं तुम्हा लोकांना देव जाणे...
कातील आहे हे!

लाजो, आता 'डिपाडी डिपांग' गाणं पण गा Wink

फोटो मस्त दिसताहेत.
या स्पर्धेत एकाहून एक सरस 'डीप' च्या कृती मिळाल्या आहेत. आता करून खाण्याचा धडाका लावायला हवाय.

खूप सुरेख, रसनेसोबत दृक् परिणामही किती सुंदर साधला गेला आहे. शेफ हेस्टन ब्लूमेंथालच्या, चवीसोबत इतर जाणिवांना आव्हान देणाऱ्या काही रेसिपी पाहिल्यात, त्यांची आठवण झाली.

गो ऑस्सी गो!
लाजो आणि मास्टरजी एडीपाड़ी डिपांग की काय स गाण आहे ना ते गाताहेत असे दृश्य डोळ्यांसमोर आले! Lol

भारी Happy

एकदम मस्तच.

लाजोची रेस्पी म्हणजे डोकेबाज असणारच. साध्या गोष्टीतून एकदम वेगळीच संकल्पना मांडलीस. हेस्टन ची शिष्या झालीयेस काय? Happy

आणि नशीब मळ्यातली रेस्पी आहे - उसाच्या फडातली नाही.

_/\_

सुरेख! खरंच गार्डन फ्रेश! Happy

अ‍ॅव्होकाडो कधी बघितलेही नाहीये, तरी एक प्रश्न- त्याचा इतका सहज गर होतो, फक्त हाताने स्क्वॉश करून?

Pages