Submitted by दुसरबीडकर on 7 September, 2014 - 08:26
पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो..
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!!
म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!
सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!
नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!
इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली सगळे खयाल आवडले इतक्या
आवडली
सगळे खयाल आवडले
इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..<<< ही ओळ सर्वाधिक आवडली
पाऊस लेखणीने<<< असा एक स्पेसबार द्या मधे
धन्यवाद व शुभेच्छा
म्हणतात कैक आधी जोडी खिलार
म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!
वा वा.
शुभेच्छा.
मनपुर्वक आभार
मनपुर्वक आभार वैवकु,समिरजी..विस्तृत प्रतिसादासाठी..!!
वैभवजी तो शब्द तसाच घेतला आहे..पावसाची लेखणी या अर्थाने..!
इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस
इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
>> सुरेख ओळ... डॉक, तरहीसाठी घ्यावीत ही...
इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस
इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
>> सुरेख ओळ... डॉक, तरहीसाठी घ्यावीत ही.<<< +१
वाह!
वाह!
तरहीला जरा बदलावे
तरहीला जरा बदलावे लागेल.
इतक्या सुरेल दु:खा घेऊ नकोस ताना
गुस्ताखी माफ!
गझल शिक्षकाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
आवडली
आवडली
पण ही तरही आता कुठे चालू
पण ही तरही आता कुठे चालू असते
गझल आवडली गणेश
गझल आवडली गणेश
सुंदर
सुंदर