"अबोल"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 September, 2014 - 14:41

प्रार्थनेस काय ढोल पाहिजे
पोचला नभात बोल पाहिजे

चेह-यावरील दु:ख मोजण्या
घाव काळजात खोल पाहिजे

धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे

दोर काचतोय जीवना तुझा
सावरावयास तोल पाहिजे

बोल कागदावरी हवा तसा
एरवी कवी अबोल पाहिजे

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे<<< मस्त

दोर काचतोय जीवना तुझा
सावरावयास तोल पाहिजे<<< कल्पक

बोल कागदावरी हवा तसा
एरवी कवी अबोल पाहिजे<<< सहजसुंदर

गझल आवडली Happy

अप्रतिम !!

हे शेर तुफ्फ्फान आवडले

प्रार्थनेस काय ढोल पाहिजे
पोचला नभात बोल पाहिजे

बोल कागदावरी हवा तसा
एरवी कवी अबोल पाहिजे

खुपच सुंदर !!

Apratim!!!

चेह-यावरील दु:ख मोजण्या
घाव काळजात खोल पाहिजे

धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे

दोर काचतोय जीवना तनाहे
सावरावयास तोल पाहिजे>>>>>>>>>>>>>>>>> हे तीनही शेर मला खूप आपलेसे वाटतायेत. मला जे व्यक्त करता येत नाही ते तुम्ही खूप नेमकेपणाने मांडलय.
गजल आवडली नाही........... काळजालाच भिडली.