…शेतीच व्यसन काय बरं नाय !!!

Submitted by सुरज डोंगरे on 5 September, 2014 - 06:07

वर्तमानपत्रात तुम्हाला किमान एका तरी शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी दिसेल…शेतात मर मर मरूनही अखेर का मरतो हा शेतकरी…. का करतो तो आत्महत्या ?
कोण जबाबदार आहे त्या निष्पाप जीवांचा ?
स्वतः कास्तकार की सरकार ?
असे असंख्य प्रश्न डोक्यात ? उरात आलेले विचार शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न …

माह्या देशात शेतकरी होणं गुन्हा हाय.
…शेतीच व्यसन काय बरं नाय !

हाये रुसली माती माय,
अवकाळी पाऊसाचा भरवसा काय,
राब राब राबलो भर उनात,
तरी लेकरासाठी भाकर नाय.
..शेतीच व्यसन काय बरं नाय !

होऊन बी कर्जबाजारी,
कुठं सिंचनाची सोय हाय …
ज्या कापसासाठी केलं रक्ताचं पाणी ..
त्याले बी बाजारात भाव नाय….
…शेतीच व्यसन काय बरं नाय !

बदनाम केले दाही दिशात…
पॅकेज गेलेत लोकप्रतिनिधींच्या घश्यात….
‘दारुडा ‘..’कामचुकार’ नानाविध
बिरूद्या दिल्या माह्या पदरात
छळले या जुलमी शासनाने असे की
आत्महत्ये शिवाय आता पर्याय नाय
…शेतीच व्यसन काय बरं नाय !

-सुरज

Group content visibility: 
Public - accessible to all site users