निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या मस्त रांगोळी... सुनबाई माहेरी गेल्यात, आता कृष्णकन्हैयाला घेऊन परततील, तोवर तुझी कलाकुसर दाखव आम्हला Happy

सगळ्यांना दस=याच्या हार्दिक शुभेच्छा. Happy

जिप्सी माझ्याकडचे झेंडू दिवाळीपर्यंत थांबले तर तुझी रांगोळी ढापेन. Happy

इकडे रंगबदलु झाडं आणि थंडीची चाहूल....आभाळ निळं आहे हीच काय ती जमेची बाब...पण तेही लवकरच काळवंडेल म्हणा.

अरे वा जिस्प्या मस्तच रे. ह्यावरून तू किती आनंदी आहेस हे कळते. Happy

कालच्या लोकसत्ताच्या वास्तुरंग मध्ये माझा लेख होता. अवजारांप्रति कृतज्ञता. माबोवर पण टाकलाय पहा. http://www.maayboli.com/node/51089

सुप्रभात निगकर्स!!! Happy

रांगोळीच्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!! Happy त्यातील झिपरीची पाने हि घरातलीच. इतर फुले सकाळीच दादरला जाऊन आणली.दारावरचं तोरणही दसर्‍याला आम्ही घरीच बनवतो.
रच्याकने, दसरा गेला आता दारावरची तोरणं निर्माल्य म्हणुन टाकुन देणार, फक्त एकच काम करायचं त्या तोरणामधील भाताच्या लोंब्या काढायच्या आणि गॅलरीत/खिडकीच्या ग्रीलला बांधुन ठेवायच्या. अगदी काही तासातच चिमण्या येऊन सगळा भात खाऊन जातात आणि फक्त तुस उरतात. मी दरवर्षी हेच करतो. यंदा शनिवारी तेलबैलाचा ट्रेक करून आलो आणि येताना शेतातुन आणखी थोड्या भाताच्या लोंब्या आणल्या होत्या. Happy निर्माल्यात फेकण्यापेक्षा चिमण्यांना तो भात खाऊ घालायला मला आवडतो, तुम्हालाही आवडेल. Happy

सुंदर रे.. चिमण्या भात कसा सोलून खातात त्याची एक क्लीप काढायला हवी होतीस. आता क्लीप्सचे मनावर घेच.

दिनेशदा, ब्रोकोली छान. तुम्ही विकत घेतली त्याचे फोटो आहे का.
शिंपी पक्षी रोज पाहते पण नाव माहीत नव्हते.
सर्व माहीती , फोटो छान.
सत्पपर्णी मी पाहीली नव्ह्ती नाव एकले होते. सप्तपर्णी का म्हणतात, एका फुलाला ७ पाने असतात.
जिप्सी, सुंदर रांगोळी.
तोरणामधील भाताच्या लोंब्या काढायच्या आणि गॅलरीत/खिडकीच्या ग्रीलला बांधुन ठेवायच्या. अगदी काही तासातच चिमण्या येऊन सगळा भात खाऊन जातात आणि फक्त तुस उरतात. मी दरवर्षी हेच करतो. ===
मीपण दरवर्षी हेच करते.

सप्तपर्णी का म्हणतात, एका फुलाला ७ पाने असतात.>>>>>कामिनी, फुलाला नाही. याच्या पानांच्या गुच्छाला सात पानं असतात. Happy

हो कामिनी, मी घेतलेल्याच ब्रोकोलीचा फोटो आहे तो.

जिप्स्या, यू ट्यूबवर कुठलीही क्लीप अपलोड करता येते. तिथेही काही एडीटिंगचे टूल्स आहेत. बघच एकदा.

ही ७ वर्षान्नी फुलते जिप्सी???>>>>>हो आर्या. कारवी दर ७ वर्षाने फुलते. तशी अधेमध्ये एखादी "चुकार" कारवी फुललेली दिसते पण संपूर्ण बहर हा सात वर्षानेच येतो. Happy २००७ सालानंतर आता यावर्षी Happy

भाताच्या लोंब्या काढायच्या आणि गॅलरीत/खिडकीच्या ग्रीलला बांधुन ठेवायच्या>>>>. कधी नव्हे तो यावेळी नवर्‍याने लगेचच तोरण काढून डस्टबीनमधे टाकून दिले.नाहीतर एक लोंबी कुंडीत टाकणार होते.(याच धाग्यावरील कोणीतरी हा उद्योग केला आहे.)बाकीच्या जिप्सी यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रीलला बांधणार होते.आता शेजारणीच्या तोरणावर लक्ष आहे.

ओहो! 'कारवी' हे आपल्या महाराष्ट्राचे 'फुल' आहे ना?>>>>>नाही आर्या. "तामण" आपल्या महाराष्ट्राचे राज्यफुल आहे. Happy

आता शेजारणीच्या तोरणावर लक्ष आहे.>>>>>देवकी Happy Happy

Pages