ब्लर इमेजेस

Submitted by गण्या. on 31 August, 2014 - 03:08

हे सभ्यतेच्या लेकरांनो

तुमच्या वखवखलेल्या केमे-यांचं

आणि अधाशी ओबी व्हॅन्सचं

काही वाटत नाही आताशा

ती येईल दारातून बाहेर

थोड्या वेळासाठी..

शुद्द् नसेल तिला कपड्यांचीही

आणि विस्कटलेल्या यौवनाची

पण शुद्धीत असलेल्यांचं काय

कॅमेरे रोखतील आपल्या नजरा

योग्य त्या ठिकाणी

आणि पॉपकॉर्न खात

मिटक्या मारत शोधतील सारे

ब्लर्ड इमेजेसमधे काही न काही

गण्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users