बिनकण्याचं

Submitted by गण्या. on 29 August, 2014 - 02:00

मी पुस्तकातला किडा
काळी अक्षरं खाणारा
भूक असो नसो
मी वळवळतो आणि खात राहतो
पानंच्या पानं, उगाच

पुस्तकात शिरण्याआधी
मेलेलं जनावरं हेच घर होतं
त्याबाहेर पडलो की
ठेचला जायचो
माणुसकीच्या पायदळी

म्हणून मग पुस्तकात शिरलो
आणि मग मी बदललो
माणूस झालो आणि
माझ्या पायाखाली ठेचले गेले
अनेक जीव जंतू
मेलेल्या जनावराच्या मासावर
पोसले गेलेले

वाईट वाटत नाही
मी पुस्तकाच्या गर्दीतला किडा
शब्द सांडले तरी
समर्थकांची फौज उभी राहते
मी करतो त्याचं
समर्थनच होतं हल्ली
भीती बिती मागे राहते
जगण्याची

आता ठेचतो किडे मुंगी
आणि भावकीतले किडे
त्यातले काही बनतात
पुस्तकी किडे
जगण्यासाठी लाचार
काळी अक्षरं खाणारे
बिनकण्याचे

पण भीती वाटते च्यायला
ही अक्षरं डोक्यात गेली
तर मग
नवा गडी नवी बाराखडी
लाव्ह्याची बंडखोरी
आणि एके ४७ च्या फैरी

पळायला पण जमायचं नाही
आरामाच्या जगण्यानं
कष्ट हराम झालेत
खांदेकरी मिळावेत
दोन इकडचे दोन तिकडचे
दोन शब्द बरे बोलावेत
पुस्तकी किड्यंनी
माझ्यासारखे

गण्या

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users