अर्धवट कोणी मला समजून गेला

Submitted by जयदीप. on 27 August, 2014 - 12:45

अर्धवट कोणी मला समजून गेला
एक चप्पल का बरे बदलून गेला

पावसाळा संपला होता तसा तो...
ठेवली छत्री कुठे विसरून गेला!

कवडसा मी पाहिला तेव्हा कळाले
आत माझ्या आरसा पाहून गेला

वाटतो आहे तिखट जो गोड होता ...
तो पुढे होता तुझ्या मागून गेला!

रिक्तसा निश्वास हे आयुष्य होते...
श्वास होता घ्यायचा राहून गेला!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users